कवडीचं दही | कवडीचं दही ..लावायला जमतं का | kawadanchi dahi
कवडीचं दही
नमस्कार आज आपण बघणार आहोत कवडी दही विरजायचं कसं? परंतु कुठलीही गोष्ट शिकण्याआधी तिच्याबद्दल थोडीशी माहिती आधी जाणून घेतलेली बरी असते. म्हणूनच आधी आपण माहिती बघूया आणि मग त्याची कृती बघूया. चला तर मग सुरु करत आपल्या आजच्या पोस्टला.
आता उन्हाळा सुरू होईल. म्हणजे हळूहळू वातावरण तापू लागेल. आता उन्हाळ्या प्रमाणे आपल्याला देखील आपल्या आहारात बदल करावा लागेल.
उन्हाळ्यात पहिल्यांदी आठवण येते ती म्हणजे दही आणि ताकाची. सध्याच्या काळात कुठल्याही किराणा दुकानात प्लास्टिक डब्यात दही मिळतच म्हणा. पण मनापासून सांगायचं तर ते कधी केलेलं असेल? दही जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यात कोणती रसायने घातलेली असतील याची आपल्याला कल्पनाही नसते. आणि विकतच आणि घरचं यात फरक आहेच की नाही? अगदी किमतीच्या दृष्टीनेही. कधी धावपळ अडचण असलीस तर डब्यातल्या दही चा पर्याय जरूर वापरावा परंतु शक्यतो दही घरी विरजण हे केव्हाही उत्तम.
चला तर मग बघुयात हे दही बनवायचं तरी कसं?
चला तर मग बघुयात हे दही बनवायचं तरी कसं?
१.जे विरजण लावणार ते फार जुन पिवळे पडलेले असू नये
२. पांढरे शुभ्र दही दिसण्यासाठी वेगळं आंबट दही आणावं.
३. कच्च दूध बोटाला जेमतेम सोसवेल इतपत गरम करावे. अगदी कोमट.
४. अर्धा लिटर दुधाला चांगल आंबट दही एक मोठा चमचा पुरतं. त्याहून जर अधिक घेतलं तर आंबटपणा वाढतो.
५. असं अगदी कोमट दूध आणि दही एकत्र करून आपण जशी कॉफी उंचावरून ओततो तसं करावं.मिश्रण फेसाळ बनायला हवं.
६. हे मिश्रण मग भांड्यात ओतून झाकून ठेवावं उन्हाळ्यात साधारण चार तास घट्ट कवडी दही तयार होतं.
७. दूध शक्यतो म्हशीचं घ्यावं. साय असली तर उत्तम.पण वैयक्तिक आवडीनुसार ठरवावे.
८. समजा काही कारणांमुळे दूध पातळ ,पांचट मिळतंय आणि दही मनाजोग लागत नाही. तर त्यासाठी विरजणाच्या दुधात दूध पावडर चांगले मिक्स करून घ्यावी उत्तम दाट दही तयार होतं.
९. गरम करून साय काढलेल्या दुधाचे दही हे जरा सैल आणि किंचित पिवळसर दिसतं. पण कच्च्या दुधाचे दही पांढराशुभ्र राहतं हा स्वानुभव आहे. असं दही मात्र कढीला उपयोगी नाही किंवा विरजणालाही नाही.त्यामुळे घरातल्या गरजांचा विचार करून दही लावायला हवं.
मी तुम्हाला खूप सरळ साध्या व सोप्या पद्धतीने कवडीचे दही कसे बनवायचे हे सांगितले आहे.ते देखील पूर्णपणे मी पॉईंट नुसार तुम्हाला सांगितले आहे. आता आपण बघूयात दही वेगवेगळ्या पद्धतीने कसे करतात.म्हणजेच दह्याच्या वेगवेगळ्या चवी आपण बघणार आहोत आणि ते कसे बनवायचे हे देखील आपण बघणार आहोत.
कवडीचं दही चवीसाठी खास
चवीसाठी खास
दही वेगवेगळ्या चवीचे ही करता येतं. यासाठी वेगवेगळे फळांचे तुकडे, तुटी फ्रूटी, चेरी, चॉकलेटचा कीस, खजूर असं काहीही घालू शकता .अगदी केशर सुद्धा.
हे मिश्रण स्वच्छ धुतलेल्या सुगडात ओतून सेट करायला ठेवावं .बाजारात मिळणाऱ्या आईस्क्रीम पेक्षा असं दही अधिक पौष्टिक आणि उत्तम .मुलांना तर ते फार आवडतं वेळ असेल तर सारखेच कॅरमल करून ते विरजणांत घालून दही लावलं तर अप्रतिम मधुर लागतं. रंग पण अगदी कस्टर्ड सारखा येतो .चवीसाठी काही नसेल तर किंचित मध घातलं तर उत्कृष्ट चव येते.
जर तुम्हाला हा आजचा लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये मला नक्की कळवा आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की विचारू शकता.