कलिंगड पांढरा निघालं तर, फेकून का देता? | kalingad mahiti in marathi

 कलिंगड पांढरा निघालं तर, फेकून का देता? | kalingad mahiti in marathi

कलिंगड पांढरा निघालं तर, फेकून का देता?

चविष्ट पदार्थ पांढऱ्या कलिंगडाचेही होतात……

नमस्कार आज आपण खूप वेगळी रेसिपी बघणार आहोत आणि ती देखील खूप चविष्ट. आपण उन्हाळ्यात खूप वेळा कलिंगड आणतो परंतु जास्तीत जास्त वेळा ते पांढरे निघतो आणि आपण ते फेकून देतो परंतु फेकून न देता त्या कलिंगडाचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकतो हे आपल्याला माहीत नसते.म्हणून आपण ते फेकून देतो परंतु हा लेख वाचल्यानंतर तुम्ही पुन्हा कधीच पांढरे कलिंगड निघाल्यानंतर ते फेकून देणार नाहीत. चला तर मग सुरु करत आपल्या आजच्या लेखाला.

कलिंगड पांढरा निघालं तर, फेकून का देता? | kalingad mahiti in marathi


आपल्या या आगळ्यावेगळ्या रेसिपी चे नाव आहे तवसा पोळे

कलिंगड पांढरे निघणे हा काही दुर्मिळ अनुभव नाही.मात्र गारेगार कलिंगड पांढरा निघालं म्हणून टाकवतही नाही आणि खावत तर नाहीच नाही .मग प्रश्न पडतो की या पांढऱ्या कलिंगडाचे करायचं काय?तर त्याचं बरच काही चविष्ट करता येऊ शकत.

चला तर या रेसिपीला सुरुवात करूयात

आपण पॉईंट्स नुसार रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला ते समजायला देखील सोपे जाईल आणि वाचायला देखील सुटसुटीत वाटेल

चला तर मग आपल्या पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया 

पांढऱ्या कलिंगडाचे घावन कसे बनवायचे? 

१. घावनाच्या पिठात हे कलिंगड किसून घालावं पिठात पाणी घालायचं नाही कारण किसालाच पाणी सुटत दहा मिनिट पीठ तसंच ठेवायचं आलं किसून घालायचं चवीपुरतं मीठ ही घावन सुरेख होतात.

चला तर ता आपल्या दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात

पांढरा कलिंगडाची स्मुदी कशी बनवायची? 

२. कलिंगडाच्या फोडी करून घ्याव्या त ब्लेंडर मध्ये फोडी आणि ताज गोड दही घालून मिश्रण एकजीव करावं यात आवडीप्रमाणे हवं ते घालू शकता जसे की पुदिना चाट मसाला मिरपूड साखर काहीही अगदी सहज थंडगार स्मुदी तयार होते. पण ही स्मुदी केल्या केल्याच संपवावी फार काळ फ्रीजमध्ये ठेवू नये. यात दही नको वाटत असेल तर दूध किंवा नारळाचे दूध घातले तरी चालेल

चला तर आपल्या तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया

पांढऱ्या कलिंगडाची कोशिंबीर कशी बनवायची? 

३.स्मुदीचा पर्याय नको असेल तर कलिंगडाच्या फोडी करून त्याची कोशिंबीर ही होऊ शकते. भरीला त्यात काकडी डाळिंब दाणे उकडलेला बटाटा केळ काहीही घाला अगदी खारी बुंदी घातली तरी कोशिंबिरीला मजा येते

चला तर आपल्या चौथ्या आणि शेवटच्या रेसिपीला सुरुवात करूया

पांढऱ्या कलिंगडाची भाजी कशी बनवायची?

४. समजा हे पण नको वाटतं गोड सुद्धा आवडत नसेल तर सरळ कलिंगडाची भाजी करावी कलिंगडाच्या मोठ्या फोडी करून तूप जिरे हिरव्या मिरची यांच्या फोडणीवर त्या परताव्यात त्यात आवडीप्रमाणे मीठ साखर दाण्याचा कूट अथवा ओलं खोबरं घालावं भाजी फार शिजवायची नाही ही भाजी उपवासाला म्हणूनही खाता येते सध्याच्या उन्हाळ्यात हा प्रयोग करून पहा रसरशीत कलिंगडाचा गारवा असा वेगळा रूपात अनुभव नाही मस्त असतं

जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल किंवा कुठल्या रेसिपी बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की विचारू शकता मी तुमच्या कमेंट्स ला नक्की रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन

 धन्यवाद


Related searches

  • टरबूज खाण्याचे फायदे
  • कलिंगड जाती
  • कलिंगड बियाणे किंमत
  • केळी
  • टरबूज लागवड

 कलिंगड पांढरा निघालं तर, फेकून का देता? | kalingad mahiti in marathi


Post a Comment

Previous Post Next Post