केक की सजावट | क्रीम केक सजावट सरल और आसान तरीका | Cake Sajavat

केक की सजावट | क्रीम केक सजावट सरल और आसान तरीका

 सजवा केक

आज आपण वाढदिवसाला काय करावे किंवा आयत्यावेळी कुठली युक्ती वापरावी हे आपण बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या पोस्टला.

मुलांच्या वाढदिवसाला काहीतरी स्वतःच्या हातानं स्पेशल करायचं असेल तर केकचे डेकोरेशन करा. मुलांना आणि स्वतःलाही खुश करण्याचा हा झटपट मार्ग आहे.अनेक वेळा आणीबाणीची प्रसंग स्वयंपाक घरात येतात. आयत्या वेळी काहीतरी करावं लागतं खास करून लहान मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला. लहान मुलांचा वाढदिवस आला की खूप धावपळ होते.

 कारण वेळ तितका नसतो आणि मुलांना देखील चांगले चांगले पदार्थ बनवून लागत असतात. आणि आपल्याला देखील इच्छा असते की मुलांच्या वाढदिवसाला आपल्या स्वतःच्या हाताने काहीतरी बनवावं. आपल्याला मनापासून इच्छा असते की वाढदिवसाच्या दिवशी मुलांसाठी काहीतरी स्वतःच्या हाताने करावं. परंतु….? हा पण फार त्रास देतो नाही का? खरंतर या 'परंतु' ला पर्याय शोधणारे खूप सोपे पर्याय असतात. आणि यासाठी स्वयंपाकातलं खूप जास्त ज्ञान असणेही गरजेचे नाही.

केक की सजावट | क्रीम केक सजावट सरल और आसान तरीका

चला तर आता वळूयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे

लहान मुलांसाठी वाढदिवसाला सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे केक. लहान मुलांसाठी नव्हे तर अगदी मोठ्यांसाठी देखील वाढदिवसाला केक असणे हे महत्त्वाचे असते. त्यामुळे आपण बर्थडे केक ची ऑर्डर दिलेलीच असते किंवा ऐनवेळी आपण केक आणतो. परंतु केकला स्वतःच्या हाताचा फील देण्यातही गंमत असते. आणि अर्थातच ही गंमत करणं काय खूप अवघड नाही.

यासाठी बाजारातून साधा स्पंज केक आणा (व्हॅनिला केक असला तर अति उत्तम). थोडं क्रीम घ्या आणि हे क्रीम चांगलं फेटून घ्या. त्यात थोडंसं साखरेचे पाणी घालून पुन्हा एकदा फेटून घ्या. क्रीम ला टोक येईपर्यंत ते फेटायला हवं. मिश्रण मग हाताला हलकं लागतं. आता हे मस्त केकवर लावून घ्यावं. चाकून मऊ आणि गुळगुळीत करून घ्यावं. नंतर त्याचे डेकोरेशन करावे.

केक कसा सजवावा?

केक कसा सजवावा?

१. जेम्स गोळ्या आणाव्यात आणि सगळ्या बाजूने केकवर लावाव्यात. हव्या तशा जेम्सच्या गोळ्या तुम्ही केकवर लावू शकता. केकवर या गोळ्या खूप छान दिसतात.

२. कॅडबरीच्या उभ्या तुकड्यांचा उपयोग देखील करता येतो. हे उभे तुकडे केकला बाजू बाजून उभे चिटकावेत.एकदम कंपाउंड सारखं तयार करावं खूप मस्त दिसतो केक.

३. दुसरा पर्याय देखील तुम्ही वापरू शकतात तो म्हणजे अननस, आंबा ,चेरी ,स्ट्रॉबेरी अशी फळ केक वर लावावी आणि वरून मध सोडावं याने देखील खूप मस्त केकचे डेकोरेशन बनलं जातं.

या अशा साध्या युक्तीने देखील केक खूप मस्त बनतो. आणि सुंदर दिसतो. आपल्या मुलांना देखील अशा युनिक पद्धतीचा केक खूप आवडेल आणि आपल्याला आपण केलेत आपण केलेल्या केकचा फीलही अनुभवता येतो.


रंगीबिरंगी डोनट्स

यासाठी मार्केट मधून डोनट्स आणावेत.चॉकलेट घ्यावं.तुम्ही इथे डार्क कंपाउंड किंवा व्हाईट कंपाऊंड वापरू शकता .एका उकळत्या पाण्याच्या भांड्यावर चॉकलेटचा भांड ठेवून चॉकलेट वितळून घ्यावे. तुम्ही हे आणखी मस्त दिसण्यासाठी चॉकलेट वितळताना त्यामध्ये थोडसं बटर टाकू शकता.

या वितळलेल्या चॉकलेट मध्ये तुम्ही डोनट ची वरील बाजू बुडवून घ्या .असेच सर्व डोनट्स तयार झाले की त्यावर हवे ते स्प्रिंकल्स घाला आणि फ्रीजमध्ये दोन तास सेट होऊ द्या.आपले घरगुती डोनट्स तयार आहेत.आणि हे डोनट्स खाऊन मुलं देखील खूप खुश होतील.

तुम्हाला जर ह्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल तर ती देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 

धन्यवाद 

केक की सजावट | क्रीम केक सजावट सरल और आसान तरीका


Post a Comment

Previous Post Next Post