कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य माहिती निबंध मराठी | कर्मवीर भाऊराव पाटील यांची माहिती
आज आपण पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही जर रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असाल तर तुम्हाला ही माहिती माहितच असेल परंतु जर तुम्हाला कर्मवीरांबद्दल भाषण करायची असेल किंवा निबंध लिहायची स्पर्धा असेल तुमच्या शाळेमध्ये तेव्हा तुम्हाला हा मी जो लेख बनवणार आहे. आज तो उपयोगी पडू शकतो.
रयत शिक्षण संस्थेमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा होतात .त्यामध्ये कायमच निबंध स्पर्धा होत असते किंवा वकृत्व स्पर्धा होत असते .परंतु आपल्याला माहिती असते, पण बोलता येत नाही किंवा लिहिता येत नाही .जर तुम्ही परीक्षेला किंवा वकृत्व स्पर्धेला जाताना हा लेख वाचून गेलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकेल आणि विशेषता 'म्हणून मला कर्मवीर आवडतात'हा निबंध स्पर्धेत विषय असतोच किंवा पाचवी ते दहावीच्या मराठीच्या पेपर मध्ये हा विषय नक्कीच दिलेला असतो .त्यामुळे मला अपेक्षा आहे की हा लेख तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल .चला तर मग सुरु करत आपल्या आजच्या लेखाला.
म्हणून मला कर्मवीर आवडतात
Udya आपला महाराष्ट्राच्या भूमीत गंगा मातेच्या रूपाने कृपावंत होऊन 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात कुंभोज या गावी एका महान मानवाला जन्म दिला .भाऊरावांच्या मोठेपणाचे दर्शन त्यांच्या बालपणातील अनेक प्रसंगातून दिसून येते. असेच एकदा भाऊराव व त्यांचे सवंगडी पाणी पिण्यासाठी आडावर गेले होते .तेथील लोकांनी अस्पृश्य मुलांना पाणी पिण्यास नकार दिला.
या गोष्टीचा भाऊरावांना राग आला तेथील लोकांना भांडताना ते म्हणाले या आडावर कुत्री मांजरे जनावरे पाणी पिऊ शकतात. तर हे हरिजन बांधव का चालत नाही .असे म्हणून त्यांनी तो रहाटच गदागदा हलवून तोडून टाकला.
असे हे बंडखोर भाऊराव कशालाही न घाबरणारे जन्मताच निसर्गाने त्यांना दोन गोष्टी दिल्या होत्या. एक म्हणजे देहयष्टी व गडगडणारा पहाडी आवाज याच आवाजाने अखिल महाराष्ट्रात शिक्षणाचा रयत रुपी पहाड त्यांनी उभा केला .
थोर माणसे काळाची गरज म्हणून जन्माला येतात आणि तेजस्वी व अलौकिक कार्य करून जातात.
असा हात दीप 9 मे 1959 रोजी अनंतात विलीन झाला.परंतु जाताना हजारों ज्ञानदीप पेटवून गेला.
सातारच्या अजिंक्यतारा च्या पायथ्याशी कर्मवीरांची समाधी आहे .तेथे अण्णांचा व वहिनींचा पुतळा आहे.तो आपल्या सर्वांना स्फूर्ती देत राहील, यात शंका नाही.म्हणून मी एवढेच म्हणेन की.
कर्मवीर भाऊराव पाटील
आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील दिनदलित ,उपेक्षित दुर्बल घटकांसाठी शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळ सुरू केली. मी तुम्हाला आज जी माहिती सांगणार आहे ती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल अशी मे अपेक्षा करते. कारण रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल एकदा तरी निबंध किंवा त्यांच्याबद्दल माहिती लिहावीच लागते किंवा त्याबद्दल भाषण करावा लागत. म्हणून ही माहिती तुम्हाला नक्कीच खूप उपयोगी ठरणार आहे .चला तर मग सुरु करत आपल्या आजच्या लेखाला
Karmaveer Bhaurao Patil Biography in marathi
अहोरात्र कष्ट करणारा युगपुरुष
हे कर्मवीरा तुझ्या विचारांचा
एकत्र धागा घेऊन मी शिवत आहे
फाटक्या मनामनाची जीर्ण लक्तरे
मानवी समुदायाच्या या अथांग सागरात अशी काही नर रत्ने जन्माला येतात की जी स्वतःच्या तेजाने देदीप्यमान चारित्र्याने कर्तृत्वाने सतत चमकत असतात व इतरांचे लक्ष वेधून घेत असतात .शिवरायांच्या या पवित्र महाराष्ट्र भूमीत ज्यांनी झोपलेल्यांना जागे केले उठलेल्यांना उभे केले उभे असलेल्यांना चालायला लावले व चालणाऱ्यांना पळायला लावले व पळणाऱ्यांच्या हातात अज्ञात व अंधकार नाहीसा करण्यासाठी ज्ञानाची ज्योत दिली. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे असे सांगणाऱ्या त्याग मूर्ती मानवाचा यांचा जन्म 22 सप्टेंबर १८८७ रोजी कुंभोज या गावी झाला. समाजात समतेची भावना निर्माण व्हावी म्हणून त्यांनी 4 ऑक्टोबर 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना वस्तीगृहाच्या स्वरूपात केली. त्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद व बोधचिन्ह आहे "वटवृक्ष"
मतीविना नीती गेली
नितीविना गती गेली
गती विना वित्त गेले
वित्तविना शूद्र खचले
हे सारे अनर्थ एका अविद्येमुळे घडले.
या उद्गारातील भावना अधिकच तीव्र झाली नसती जर कर्मवीर नसते तर गरिबांनाच काय तर श्रीमंतांनाही शिक्षण घेता आले नसते .लोक म्हणतात थोर माणसे इतिहास घडवतात पण कर्मवीरांनी इतिहासच बदलला त्यांनी तळागाळात रुतलेले हिरे वेचले हिऱ्यांच्या मदतीने देश घडवला कर्मवीरांचे शिक्षण व अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य हे इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणे इतपत गौरवपूर्ण आहे.
कमवा आणि शिका "earn and learn" या योजनेचे अण्णाच प्रवर्तक होते. अण्णा कोणतेही मोठी पदवी मिळू शकले नाहीत .परंतु भगीरथ प्रयत्नांनी अस्पृश्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवली. रयत शिक्षण संस्था ही जणू बहुजन समाज रुपी अर्जुनाला श्रीकृष्णाने दाखवलेले विश्वरूपी दर्शनाचा आहे.
न्यायासाठी जगणारा हा महापुरुष 9 मे 1959 साली अनंतात विलीन झाला. अण्णा कोणाकडूनही आर्थिक मदत घेत नसत. ते सतत म्हणत give me waste land, I will Turn it into a best land
काही माणसे जन्मतात मरतात .पण जाताना आपल्या पाऊल खुणा ठेवून जातात आपल्या अण्णाही गेले. पण जाताना आपल्या पाऊलखुणा ठेवून गेले.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगू शकता आणि या लेखामुळे तुम्हाला शाळेत किंवा कॉलेजमध्ये काही मदत झाली असेल तर मला नक्की कळवू शकता तुम्ही मला नक्कीच आनंद होईल आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी तुम्हाला नक्कीच ती माहिती देण्याचा प्रयत्न करेन
धन्यवाद!
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्य माहिती निबंध मराठी | कर्मवीर भाऊराव पाटील यांची माहिती
- कर्मवीर भाऊराव पाटील माहिती pdf
- कर्मवीर भाऊराव पाटील भाषण
- कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेचे बोधवाक्य
- कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय
- कर्मवीर भाऊराव पाटील निबंध
- कर्मवीर भाऊराव पाटील जयंती
- कर्मवीर भाऊराव पाटील - संपूर्ण माहिती मराठी