होम मेड केळी चिप्स रेसिपी | Banana Bhips At Home In Marathi
होम मेड केळी चिप्स रेसिपी | Banana Bhips At Home In Marathi
नमस्कार आज आपण बघणार आहोत केळीचे चिप्स कसे बनवायचे? चिप्स म्हणलं की आपल्याला आठवतं ते केळीचे चिप्स किंवा बटाट्याचे चिप्स परंतु थंडीच्या दिवसात केळीला केळ आलेले असतात आणि कच्चे केळ असतात आणि चिप्स हे देखील कच्च्या केळ्यांपासून बनवलेले असतात त्यामुळे जास्तीत जास्त लोक थंडीच्या दिवसात केळीचे चिप्स बनवतात परंतु लोकांच्या घरी केळीचे झाड असतात कच्च्या केळी असतात परंतु केळीचे चिप्स कसे बनवायचे हेच त्यांना समजत नाही.
सर्वजण आपण विकत आणतो आणि घरी चिप्स बनवत नाही कारण आपल्याला त्याची रेसिपी माहित नसते आणि आपण जे विकतचे चिप्स खातो त्यामध्ये चांगले मसाले वापरलेले नसतात आणि चांगले तेल देखील तळण्यासाठी वापरलेलं नसतं त्यामुळे आपल्या घसा दुखतो आपण आजारी पडतो त्यामुळे त्या चिप्स पासून लांब राहिलेल्या जवळ पण जर आपण घरी बनवले चिप्स तर आपण नक्कीच खाऊ शकतो आणि ते हेल्दी देखील असतात कारण की घरी बनवलेले असतात चांगल्या तेलात बनवलेले असतात चांगले मसाल्यांचा वापर करून बनवलेले असतात त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांनीच केळीचे चिप्स घरी बनवले पाहिजे.
आणि एका केळापासून प्रचंड चिप्स बनले जातात आणि आपण कुठे प्रवासाला गेलो किंवा आपण कुठे गावाला किंवा लांब ट्रीपला लांब ट्रीपला जात असून तर आपण नक्कीच केळ्याच्या चिप्सला प्रेफर करतो कारण ते हेल्दी देखील असतात आणि खाण्यासाठी चांगले देखील असतात परंतु ते बनवायची कसे हेच बहुदा लोकांना माहीत नसते आणि केळ्याचे चिप्स देखील खूप कमी कमी साहित्यात बनतात आणि खूप सोपे आहेत बनवायला त्यामुळे आज आपण केळ्याचे चिप्स कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग सुरु करत आपल्या या आजच्या लेखाला.
आधी आपण केळाचे चिप्स बनवण्यासाठी काय काय सामग्री लागते ते बघुयात:
कच्चे, केळ ,मीठ ,हळद ,लाल मिरची पावडर ,तेल
आता आपण केळ्याची चिप्स कसे बनवायचे त्याची कृती बघूया:
प्रथम तर कढईमध्ये तेल तापायला ठेवाव
त्यानंतर कच्चं केळ घ्यावं आणि त्याचे चाकूच्या सहाय्याने वरचे कातडे काढून घ्यावेत
वरचे सर्व हिरवे कातडे काढल्यानंतर आतील केळाचा पांढरा भाग दिसला पाहिजे
आता तेल तापल्यानंतर डायरेक्ट कढाई मध्ये हे केळ किसून घ्यायचं म्हणजे कढाई वर किसनी धरायची आणि वरतून केळ किसत जायचं तेलामध्ये
गॅसची फ्लेम मिडीयम किंवा हाय ठेवायची एक ते दोन मिनिट नंतर गॅसची फ्लेम मिडीयम करायची आणि मस्त असं त्याला कडक होईपर्यंत तळत राहायचं
तळून झाल्यानंतर याला ताटामध्ये काढून घ्यायचं मस्त निथळून घ्यायचं
आणि आता त्यावर चवीनुसार मीठ टाकायचं मिरची पावडर टाकायची आणि जर तुम्हाला कलर चांगला हवा असेल तर थोडीशी हळद टाकायची आणि चिप्सला मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आपले मस्त अशी चिप्स तयार आहेत
मस्त क्रंची लागतात खूप मस्त लागतात आणि घरच्या घरी बनवलेले आहेत त्यामुळे हेल्दी देखील आहेत आणि कुठलाही वाईट गोष्टीचा किंवा खराब गोष्टी त्यामध्ये वापर केलेला नाहीये जसे की खराब मसाले किंवा खराब तेल त्यामुळे हे आपण आपल्या मुलांसाठी किंवा घरच्यांसाठी किंवा आपल्या घरातल्या वृद्ध व्यक्तींसाठी हे नक्कीच हेल्दी असतील
तुम्हाला जर चिप्स कसे बनवायचे याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर खालील लिंक वर क्लिक करा तुम्हाला सर्व डिटेल मध्ये व्हिडिओ दिलेला आहे
धन्यवाद
होम मेड केळी चिप्स रेसिपी | Banana Bhips At Home In Marathi
ssssssहोम मेड केळी चिप्स रेसिपी | Banana Bhips At Home In Marathi
- banana bhips at home in marathi
- banana chips recipe
- banana chips machine
- banana chips recipe in marathi
- banana chips
- are banana chips made out of bananas
- Banana Bhips At Home In Marathi
- होम मेड केळी चिप्स रेसिपी