अभ्यासात मन लागत नसेल तर नक्कीच वाचा | अभ्यासात मन लागण्यासाठी काय करावे?

अभ्यासात मन लागत नसेल तर नक्कीच वाचा | अभ्यासात मन लागण्यासाठी काय करावे?

नमस्कार तुमचे देखील अभ्यासात मन लागत नाहीये किंवा तुम्हाला वाचल तरी लक्षात राहत नाहीये तर आजचा हा लेख तुमच्यासाठीच आहे. खूप विद्यार्थी अशी आहेत की जे वाचतात परंतु त्यांच्या लक्षात काहीच राहत नाही त्यांना वाचताना असं वाटतं की आपल्याला सर्व येते पण पेपरला गेले की त्यांना काहीच आठवत नाही किंवा काहीच लिहिता येत नाही तर हे असं का होतं ते आज आपण बघणार आहे आणि असं होऊ नये म्हणून काय केले पाहिजे ते देखील आपण बघणार आहे.

चला तर सुरू करूयात आपल्या आजच्या लेखाला

अभ्यासात मन लागत नसेल तर नक्कीच वाचा | अभ्यासात मन लागण्यासाठी काय करावे?

तर अभ्यासात मन का लागत नाही याची आपण कारण बघणार आहोत:

१.तर खूप विद्यार्थी अशी आहेत जे झोपून अभ्यास करतात 

२. खूप जास्त जेवण करतात आणि मग अभ्यास करतात

३. अभ्यास करताना सर्व वस्तू जवळ ठेवत नाही आणि मग अभ्यास करता करता त्या वस्तू घेण्यासाठी उठतात

४. काही काही विद्यार्थी गादीवर झोपून अभ्यास करतात किंवा सोफ्यावर पडून अभ्यास करतात त्याने देखील अभ्यासात मन लागत नाही

५. अभ्यास करताना कामे सुचतात 

६. अभ्यास करताना मोबाईल चेक करणे


माझा अभ्यासात मन लागत नाही काय करू

आता आपण बघणार आहोत की अभ्यास करताना मन लागलं पाहिजे यासाठी काय करावे:

१. तर अभ्यास करताना कधीही खुर्चीवर बसून अभ्यास करावा म्हणजे टेबल आणि खुर्चीवर बसून अभ्यास केला तर आपलं मन स्थिर राहतं. आणि त्यामुळे अभ्यासात मन लागतं किंवा झोप येत नाही

२. आपल्याला जेव्हा अभ्यास करायचा आहे त्या आधी आपण खूप जास्त जेवण नाही करायचं म्हणजे हलकं अन्न खायचं म्हणजे पालेभाज्या खायच्या जास्त असं जड अन्न किंवा पचायला जास्त वेळ लागणार असं अन्न खायचं नाही जर आपण पोट भरून जेवण केलं तर आपल्याला अभ्यास करताना झोप येते त्यामुळे हलकं अन्न खायचं.

आणि याचा अर्थ असा नाहीये की जेवायचं नाही किंवा कमी खायचं पण माझं म्हणणं आहे की तुम्ही जेवायच्या आधी अभ्यास करा किंवा थोडसं खा आणि मग अभ्यास करा किंवा अभ्यास करता करता तुम्ही ड्रायफ्रूट्स असं खाऊ शकता काजू बदाम वगैरे खाऊ शकता आणि तुम्ही तुमचा अभ्यास झाल्यानंतर पोट भरून जेवण करून झोपू शकता.

३. मी खूप विद्यार्थ्यांना बघितला आहे जे अभ्यास करता करता पाच पाच मिनिटाला दहा-दहा मिनिटाला उठतात तर याचं कारण आहे की आपलं मन स्थिर नाहीये त्यामुळे पहिल्यांदी बसायची स्थिती तुम्ही बदला तुम्ही स्ट्रेट बसा अभ्यास करतानी चांगलं बसा टेबल खुर्चीवर बसा त्यामुळे तुमचं मन स्थिर राहील आणि तुम्हाला ज्या वस्तू लागतात त्या तुम्ही जवळ घेऊन बसा खूप जणांना अभ्यास करता करता तहान लागते किंवा त्यांना एखादा पेन जवळ नसतो त्यांचा किंवा त्यांना भूकच लागते तर तुम्ही आधीच विचार करून बसा तुम्हाला जर भूक लागते ते तुम्ही थोडं खाऊन बसा अभ्यास करायला तुम्हाला जर तहान लागते तर तुम्ही क्लासमध्ये बॉटलमध्ये टेबलवर पाणी आणून ठेवू शकता.

 तुम्हाला जर पेन लागतात तर तुम्ही पेन देखील सोबत ठेवू शकता टेबलवर आणि तुम्हाला जर जास्तच भूक लागत असेल अभ्यास करताना तुम्ही काजू बदाम वगैरे एखादा डब्यामध्ये भरून तुम्ही तुमच्या टेबलवर ठेवू शकता किंवा तुम्ही एखादा क्रीम रोल वगैरे असं छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ठेवू शकतात पौष्टिक गोष्टी ठेवू शकता तुम्ही तुमच्या टेबलवर जेणेकरून तुम्हाला तीनदा तीनदा अभ्यास करताना उठण्यासाठी कारण भेटणार नाहीत

४. काही काही विद्यार्थ्यांना अभ्यास करता करता खूप सारे कामे सुचतात म्हणजे आपले हे काम राहिलं ते काम राहिलं त्यामुळे ते अभ्यासामधून उठून जातात परंतु अभ्यास करायचे आधी तुम्ही तुमच्या सर्व काम करून घेत जा जेणेकरून तुम्हाला अभ्यास करता करता उठाव लागणार नाही

५. तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसता तेव्हा तुमचा मोबाईल तुमच्या पासून लांब ठेवा कारण की मोबाईल खूप डिस्टर्ब करतो आपल्याला त्यामुळे अभ्यास करताना कधीही मोबाईल साईडला ठेवा एक दोन तास मोबाईल साईडला ठेवल्याने काही प्रॉब्लेम होणार नाही परंतु जर मोबाईल जवळ ठेवला तर चार वेळेस नोटिफिकेशन येतील आणि मग आपण मोबाईल चेक करू त्यामुळे मोबाईल लांब ठेवा

६. कधीही झोपून किंवा खाली पडून असा अभ्यास करायला नाही पाहिजे अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर अभ्यासात कधीही मन लागणार नाही त्यामुळे कधीही अभ्यास करताना मन स्थिर ठेवा सरळ बसा नीट बसा

मी अपेक्षा करते की हे पोस्ट तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरली असेल त्यामुळे तुम्हाला आणखी अशी माहिती हवी असेल किंवा कुठल्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता मी नक्कीच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद.

अभ्यासात मन लागत नसेल तर नक्कीच वाचा | अभ्यासात मन लागण्यासाठी काय करावे


Post a Comment

Previous Post Next Post