गाजर हलवा रेसिपी मराठी | गाजराचा हलवा कसा बनवायचा? | Easy Gajar Halwa Recipe in marathi
नमस्कार आज आपण बघणार आहोत गाजराचा हलवा कसा बनवायचा?
आज आपण गाजराचा हलवा खूप साध्या व सोप्या पद्धतीने बनवणार आहोत .खूप लोक गाजराचा हलवा बनवत नाही कारण गाजराचा हलवा बनवण्यासाठी खूप कष्ट लागतात .म्हणजे गाजर किसायचे त्यानंतर त्याला परतवायचं खूप वेळ लागतो गाजराचा हलवा बनवायला.पण मी आज जो गाजराच्या हलव्याची रेसिपी सांगणार आहे ती फक्त दहा ते पंधरा मिनिट मध्ये बनून जाते. गाजर किसावं देखील लागत नाही आणि काहीच नाही.
मी खूप लोकांना किंवा बायांना बोलताना ऐकलं आहे की गाजराचा हलवा बनवायला खूप वेळ लागतो.त्यामुळे खूप जण गाजराचा हलवा बनवत नाही परंतु असं काही नाहीये जर डोकं वापरून किंवा जरासे ट्रिक वापरून गाजराचा हलवा बनवला तर गाजराचा हलवा नक्कीच कमीत कमी वेळात बनला जातो आणि स्वादिष्ट बनला जातो.
- चला तर मग बघुयात आता गाजराचा हलवा कसा बनवायचा.
- प्रथमतः आपण बघूया की गाजराचा हलवा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं:
- दोन मोठे गाजर, साखर ,दूध ,ड्रायफ्रूट्स (आवडत असेल तर)
आता आपण बघणार आहोत गाजराचा हलवा बनवायची कृती:
१. गाजरचा हलवा बनवण्यासाठी प्रथमता गाजर स्वच्छ धुऊन घेणे.
२. आता गाजरावरील जे साल आहे ते थोडे थोडे काढून घेणे.
३. गाजराची साल काढून घेतल्यानंतर गाजला मस्त असं बारीक कापून घेणे.
४. गाजर कापल्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकने आणि बारीक करून घेणे.
५. एक गोष्ट लक्षात ठेवावी की जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये गाजर बारीक करत असतो त्यामध्ये थोडा देखील पाण्याचा वापर करायचा नाही.
६. गाजराचे फक्त बारीक तुकडे करणे आणि मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणे इतकीच कृती आपल्याला करायची आहे.
७. गाजर मस्त अशी मिक्सर मधून बारीक करून घेतले कि ते एका प्लेटमध्ये काढून घेणे.
८. आता कढाई मस्त अशी गरम करायला ठेवायची कढाई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे गावरान तूप टाकायचं. इथे मी गावरान तूप वापरते कारण की गावरान तूप पौष्टिक असतं.
९. गावरान तू टाकल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक केलेले गाजराचा कीस टाकून देणे.
१०. आता हा किस मस्त असा पाच मिनिटे परतून घ्यायचा आहे तुपामध्ये.
११. पाच मिनिट नंतर आता त्यामध्ये तीन कप दूध टाकायचे आपले चहाचे कप भरून दूध टाकायचे तीन कप.
१२. दूध टाकल्यानंतर त्याला झाकण ठेवून पाच मिनिटं मस्त असं शिजवून द्यायचं.
१३. पाच मिनिट झाल्यानंतर आता त्यावरचे झाकण काढायचं आणि त्यामध्ये तुम्हाला जितकं गोड आवडतं तितकी साखर टाकायची.
१४. साखर टाकल्यावर त्याला मस्त असं हलवून जायचं आणि दोन मिनिटं परतून दयायचं कारण की साखरेला पाणी सुटतं.
१५. आता आपला गाजराचा हलवा तयार आहे त्यावर मस्त असे काजू बदाम पिस्ता घालून तुम्ही सजवू शकता आणि खायला घेऊ शकता.
गाजर हलवा रेसिपी मराठी | गाजराचा हलवा कसा बनवायचा? | Easy Gajar Halwa Recipe in marathi
किती सोपी आहे ना गाजराच्या हलव्याची रेसिपी आपण उगाचच मोठं टेन्शन घेतो की गाजराचा हलवा खूप अवघड आहे किंवा खूप वेळ लागतो बनवायला फक्त दहा ते बारा मिनिटांमध्ये हा गाजराचा हलवा तयार होतो त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा घरी आणि जर रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्हाला जर या रेसिपीचा व्हिडिओ हवा असेल.
तर माझ्या चॅनेलवर हा व्हिडिओ अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही तो देखील बघू शकता मी लिंक खाली देते त्यावर क्लिक करा आणि माझ्या चॅनलवर तो व्हिडिओ जाईल तो व्हिडिओ मस्त बघा आणि नक्की आजपासून गाजराचा हलवा बनवायला शिका घरच्या घरी कंटाळा करू नका खूप सोपा आहे आणि तुम्हाला कुठल्या पदार्थाची रेसिपी माझ्याकडून हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी ती रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करेन .
धन्यवाद
गाजराचा हलवा कसा बनवायचा? | Easy Gajar Halwa Recipe in marathi
- गाजराचा हलवा मधुराज रेसिपी
- गाजर का हलवा
- गाजर का हलवा मुख्य सामग्री
- गाजर का हलवा खाने से क्या होता है
- गाजर का हलवा बनाने का आसान तरीका