जनसेवा हीच ईश्वर सेवा मराठी निबंध | Janseva hich Ishwar seva essay in Marathi

 जनसेवा हीच ईश्वर सेवा मराठी निबंध | Janseva hich Ishwar seva essay in Marathi

जनसेवा हीच ईश्वर सेवा मराठी निबंध | Janseva hich Ishwar seva essay in Marathi

मित्रांनो आज आपण जनसेवा हीच ईश्वर सेवा यावर मराठीत निबंध बघणार आहोत हा निबंध परीक्षेत खूप वेळा विचारला जातो मी अपेक्षा करते की हा निबंध तुम्हाला उपयुक्त ठरेल चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला.

जनसेवा हीच ईश्वर सेवा मराठी निबंध | Janseva hich Ishwar seva essay in Marathi

संत तुकाराम महाराजांनी " जो रंजल्या गांजल्यांना आपला मानतो त्याला साधू मानावा"असा संदेश सर्वांना दिला. त्यांनी गोरगरीब अज्ञान दिन दुबळ्या लोकांमधील अंधश्रद्धा दूर जावी यासाठी गावोगावी खूप कीर्तने केली. जेणेकरून अज्ञात लोकांना अंधश्रद्धेपासून लांब जाण्यास मदत मिळावी. राजश्री शाहू महाराजांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच राधानगरी येथे धरण बांधून पाणी अडवले त्यामुळे कित्येक लोकांचा उद्धार झाला.संत गाडगेबाबा यांनी ईश्वराची पूजा ,प्रार्थना ,भक्ती करण्यात वेळ न वाया घालवता गावे गावे जाऊन स्वच्छता केली. लोकांचे आरोग्य सांभाळले जनसेवेतच धन्यता मानली. आणि यातच त्यांचा आयुष्य अर्पण केलं.

गाडगे बाबांच्या कीर्तनात गाडगे बाबा कायम म्हणायचे सर्व माणसे ईश्वराचीच लेकरे आहेत ती ईश्वराचे संविधान रूपे आहेत देवाची भक्ती करायची असेल त्याची सेवा करायची असेल तर देवळात जायची गरज नाही तीर्थक्षेत्रांना भेटी द्यायची गरज नाही प्रत्येक माणसाचा आत्मा हाच परमेश्वर आहे आपण माणसातच ईश्वर शोधला पाहिजे माणसाची सेवा केली पाहिजे दुर्दैवाने काही जणांना धड धाकट निरोगी शरीर लागत नाही काहीजण जन्मताच अपंग असतात काही जणांना वेगवेगळ्या रोगांनी त्रासलेले असते त्यामुळे आपण त्यांची मदत केली पाहिजे कारण देवाने आपल्याला चांगली शरीर दिले आहे. वृद्ध व्यक्तींना त्यांचे शरीर साथ देत नाही आणि वृद्ध व्यक्तींना साध्या माणसांसारखे जीवन जगणे कठीण बनत जाते शरीर दुबळे असल्याचे दुःख असतेच पण समाजात लोक अपेक्षा व अवहेलनाही करतात. याचे दुःख असते यामुळे या सर्वांचे जीवन दुःखाने पूर्ण व्यापून गेले आहे.

म्हणून इतरांनी अशा लोकांची सेवा केली पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे ते आनंदी बनले पाहिजे तरच देवाला आहे आनंद झाल्यासारखे होईल आणि तीच ईश्वर सेवा ठरेल.

ईश्वर सेवा म्हणजे त्याची पूजा करणे प्रार्थना करणे उपासना करणे असे काही जण मानतात पण खरी ईश्वर सेवा जनसेवेत असते असे संतांची म्हणणे आहे. स्वतःसाठी सगळेच जगतात दुसऱ्यासाठी जगणे महत्त्वाचे असते जो दुसऱ्यासाठी जगतो तो मरूनही कीर्ती रुपी उरतो.

महान कार्य करणाऱ्या संतांचा थोर पुरुषांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे लोकांना मदत करणे हे आपल्या रक्तात असले पाहिजे किंवा आपण ते आपल्या रक्तात आणलं पाहिजे .शाहू ,फुले ,आंबेडकर ,गांधीजी या महान पुरुषांनी जनसेवेत ईश्वर सेवा मानले असेच कार्य अनेकांच्या हातून घडल्यास या जगाचा उतार व्हायला वेळ लागणार नाही.

जनसेवा हीच ईश्वर सेवा मराठी निबंध | Janseva hich Ishwar seva essay in Marathi

मित्रांनो मी आशा करते की हा निबंध तुम्हाला आवडला असेल आणि जर निबंध आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा हे निबंध मध्ये काही चुका झाल्या असतील तर देखील मला कमेंट करून सांगा मला तुमच्या कमेंट वाचल्यानंतर पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटतं.

धन्यवाद

Janseva hich Ishwar seva essay in Marathi

  • janseva hich ishwar seva essay in marathi
  • जनसेवा हीच ईश्वर सेवा मराठी निबंध
  • Janseva hich Ishwar seva essay in Marathi
  • janseva hich ishwar seva translate in english
  • janseva hich ishwar seva marathi nibandh
  • janseva hich ishwar seva
  • janseva hich ishwar seva speech in marathi
  • jan seva hich ishwar seva essay in marathi

Post a Comment

Previous Post Next Post