खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे मराठी निबंध | Khara To Ekachi Dharma Jagala Prem Arpave Marathi Nibhand

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे मराठी निबंध | Khara To Ekachi Dharma Jagala Prem Arpave Marathi Nibhand

आपल्या या जगामध्ये अनेक धर्म आहे. हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन, शीख, बौद्ध असे कितीतरी धर्म आहे आपल्या जगामध्ये. वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या परंपरा आहेत रुढी आहेत. त्यामुळे आपण थोडे सर्व वेगळे येतो. पण सर्वांनीच एकमेकांशी प्रेमाने वागली तर मानवी जीवन सुखी होईल. धर्म ,पंथ ,जात या सर्वांना एक मानलं तर खरंच आपण किती सुखी होऊ. जगावर प्रेम करणे हाच खरा धर्म सर्वांनी मानला पाहिजे. धर्म,पंथ, जात ह्या कुठल्याच गोष्टी न मानता आपण एक माणूस आहे असं मानलं पाहिजे.

समाजातील दिन दलित यांच्या उद्धारासाठी आपण सर्वांनी मिळून पुढे आलं पाहिजे.

 त्यांची दुःख आपण वाटून घेतले पाहिजे. त्यांचे दुःख निवारण्यासाठी त्यांच्यावर आपण प्रेम केले पाहिजे. आपण संकटात सापडलेल्या लोकांची मदतीसाठी धावून गेलं पाहिजे. दुःख आहे त्यांची दुःख कमी करण्यासाठी त्यांना हसवले पाहिजे. काही लोकांना दुसऱ्यांना त्रास देण्यास खूप आवडतो आणि ते स्वतःला धन्य समजतात. पण खरा हीन तो असतो जो दुसऱ्याला हीन समजतो.

आपण सर्वजण देवाची लेकर आहोत आपण कुणाला वाईट किंवा काही न समजता सर्वांवर भरभरून प्रेम केले पाहिजे. यासाठी आपण वाचन केले पाहिजे वाचन देखील सुसंस्कृत होण्यासाठी खूप गरजेचे आहे. वाचनाने आपण सुरुवात करायला शिकतो. आपण ह्या जगामध्ये कुठल्याही भेदभाव न मानता सर्वांवर प्रेम करायला शिकलो पाहिजे. सर्व जात पंथ धर्म सर्व एकच आहे असं म्हणून पुढे जायला पाहिजे. मी सर्वांनी एकजुटीने या भारतात या जगात राहायला पाहिजे. जर आपला पुस्तक वाचायचा संख्या वाढली तर या जगात कोणीही अडाणी राहणार नाही अज्ञानी राहणार नाही. कोणीही गरीब राहणार नाही म्हणूनच कुठलाही भेदभाव न मानता सर्वांवर प्रेम करायला शिकले पाहिजे आणि हाच तो खरा तो धर्म मानला पाहिजे.

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे मराठी निबंध | Khara To Ekachi Dharma Jagala Prem Arpave Marathi Nibhand

मित्रांनो मी आशा करते की हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि जर हा निबंध मध्ये तुम्हाला काही चुका वाटले असेल तर मला कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता. माझी चूक सुधारण्याचे नक्कीच प्रयत्न करेन आणि जर तुम्हाला या निबंध मध्ये काही सुधारणा करायचे असतील तर त्या देखील तुम्ही करू शकता मला कमेंट करून त्या देखील तुम्ही सांगू शकता मला तुमच्या कमेंट वाचल्यानंतर पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते.

धन्यवाद


खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे मराठी निबंध | Khara To Ekachi Dharma Jagala Prem Arpave Marathi Nibhand


Post a Comment

Previous Post Next Post