माझे घर मराठी निबंध | Marathi Essay On My Home In Marathi

 माझे घर मराठी निबंध| Marathi Essay On My Home In Marathi

माझे घर मराठी निबंध : नमस्कार मित्रांनो आज मी आपल्यासाठी एक मराठी निबंधाचा विषय घेऊन आले आहे ज्याचं नाव आहे "माझे घर" . हा निबंध खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो मी अशी आशा करते की हा निबंध तुम्हाला उपयुक्त ठरेल. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला.


माझे घर मराठी निबंध | Marathi Essay On My Home In Marathi

माझ्या घराचे नाव "सुकृत" आहे. माझे घर एक मजली आहे. त्यामध्ये दोन बेडरूम एक हॉल आणि एक स्वयंपाक घर आहे . आम्ही घरामध्ये राहणारे पाच जण आहेत. मी ,माझा भाऊ ,माझी आई ,माझे बाबा,आजोबा आणि आजी असा आमचा छोटासा परिवार आमच्या घरामध्ये राहतो.

आमचे घर आकाराने फार मोठी नाही परंतु आमच्या घरातल्या सर्वांनाच खूप चांगले संस्कार आहेत. घरातील सर्वच मनाने खूप चांगले आहे. आमच्या घरात नेहमी सर्वजण आनंदात असतात त्यामुळे मला घरात राहायला खूप आवडते. आमच्या घरात सर्व सण उत्सव खूप थाटामाटात साजरे केले जातात. आमच्या घरात खूप शांतता असते.

आमच्या घरात दोन बेडरूम आहेत त्यातली एक बेडरूम माझी स्वतंत्र आहे त्या खोलीत माझे अभ्यासाचे साहित्य आहे जिथे मी माझं सर्व अभ्यास करते आणि पुस्तके वाचते. टेबलच्या कपड्यांमध्ये माझे सर्व पुस्तके मी ठेवलेली आहेत.

घराच्या शेजारी खूप सारी झाड आहेत त्यामुळे आमचे घर कायम गार राहतं. उन्हाळ्यात देखील आमच्या घरी जास्त गरम होत नाही. आमच्या घरामध्ये पाहुण्यांचे येणं जाणं चालू असतं त्यामुळे आमचे घर कायमच भरलेलं असतं. घराच्या समोर आमची एक बाग आहे .त्यामध्ये सर्व फुलांची झाडे आहेत फळांची झाडे आहेत 

तिथे मला अभ्यास करायला खूप आवडतं मी खूप वेळा अभ्यास करताना आमच्या बागेत अभ्यास करते. तिथे मस्त पक्षांचा किलबिलाट असतो. झाडाखाली अभ्यास केलेल्या सर्व गोष्टी माझ्या लक्षात राहतात आणि झाडाखाली अभ्यास करायची मज्जाच वेगळी आहे.

असं हे आमचं छोटसं घर. मला माझा वेळ घरात घालायला खूप आवडतो म्हणून मला माझं घर खूप खूप आवडतं.

माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home

मित्रांनो मी आशा करते की हा निबंध तुम्हाला आवडला असेल. आणि जर तुम्हाला यात काही चुका वाटत असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल निबंध हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मला तुमच्या कमेंट वाचून खूप आनंद होतो आणि पुढची गोष्ट बनवायला प्रोत्साहन भेटत.

धन्यवाद

माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home

  • marathi essay on my home
  • essay on my home in marathi
  • marathi house name list
  • marathi essay topics
  • marathi home name list
  • my home essay in marathi
  • essay on my house in marathi
  • marathi essay my favourite place


Post a Comment

Previous Post Next Post