शिकलेली आई घराला पुढे नेई मराठी निबंध
शिकलेली आई घराला पुढे नेई मराठी निबंध
असा एक काळ होता की स्त्रीचे कार्यक्षेत्र घराच्या आतच होते पुरुषांचे वर्चस्व असे घरात. सर्व निर्णय ते पुरुषांचेच स्रीने फक्त हा ला हा मिळवायचं आणि ना ला ना. सर्व निर्णय पतीच घ्यायचा. एकदा निर्णय झाल्यावर पत्नीने तोंडातून शब्द देखील काढायचा नाही अशी परिस्थिती होती. स्त्रिया नोकरी करत नव्हता सूर्या फक्त घरात भाकरी थापायच्या आणि मुलांना सांभाळायच्या म्हणजे चूल आणि मूल.
अशी परिस्थिती होती. नोकरी करणाऱ्या स्त्रिया क्वचित दिसत असेल संपूर्ण महाविद्यालयात दोन चारच मुली असतात. जर एखाद्या वर्गामध्ये पन्नास मुलं असतील तर दहा मुली असायच्या. मुलींची संख्या इतकी कमी होती. चारचौघात रस्त्यांवर किराणा दुकानात किंवा सार्वजनिक ठिकाणी मुली व स्त्रिया मोकळेपणाने बोलताना दिसत नव्हत्या.
उच्चशिक्षित पुरुषांची तर खूप दादागिरी होती या पार्श्वभूमीवर आजचे दृश्य आश्चरचकीत करणारे आहे. आजच्या स्त्रीने केलेली प्रगती ही खरोखरच आश्चर्यचकित करणारी आहे स्त्रीने स्वतःला किती बदलले स्वतःची प्रगती केली आणि आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्री काम करते.
चूल आणि मूल यांच्यापेक्षाही वेगवेगळ्या क्षेत्रात समर्थपणे पुरुषाच्या बरोबरीने कार्य करणाऱ्या स्रीया आपण बघतो.समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले, आगरकर, महर्षी कर्वे यांनी भारतीय स्त्रीला एक आत्मविश्वासाचा मार्ग दाखवला आणि स्री विचार करू लागली. आज सर्व प्रकारच्या उच्च शिक्षणामध्ये स्त्रीने स्थान मिळवले आहे.
आणि पुरुषांपेक्षा स्त्रिया या हुशार आहेत तुम्ही कुठल्याही परीक्षेचा निकाल पाहिला तर त्यात स्री च प्रथम आलेली असते. आता असे कुठलेही क्षेत्र दाखवता येणार नाही की ज्यात स्त्रीचा सहभाग नाही. गेल्या काही वर्षांमध्ये स्रीने या साऱ्या चौकींना धक्के देऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. काही काही क्षेत्र तर स्त्रीने स्वतः पूर्ण काबीज केले आहे.
तिथे पुरुषांना जागा नाही. स्री उत्तम राज्यकर्ती बनली आहे ती वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाच्या क्षेत्रातही नेत्र दीपक कामगिरी करते आहे तितकेच नाही तर ती रंदरागिनी बनू शकते जग एवढे पुढारीले आहेत पण हुंड्याच्या बाबतीत आपला देश अधिकाधिक मागासलेला बनत चालला आहे. मुलगी जितकी जास्त शिकेल तितका जास्त हुंडा देण्याची पाळी येते. याबाबतीत स्त्रियांनी बंडखोरी केल्याशिवाय समाजाचे मत परिवर्तन होणार नाही.
तिला कोणीही कमी समजलं नाही पाहिजे तीची ताकद जबरदस्त वाढली आहे ती शिक्षण घेते विविध प्रकारची नोकरी करते पण अजूनही घराची जबाबदारी ही मात्र तीच उचलते शिवाय मुलांचा अभ्यास त्यांच्या भवितव्याची जडणघडण याचा भारी स्री ने स्वतःवरच घेतला आहे एवढे सगळे पैलवण्याची प्रचंड क्षमता स्त्रीने कमावली आहे आणि आपले अनन्य साधारण स्थान समाजाला दाखवून दिले आहे.
शिकलेली आई घराला पुढे नेई मराठी निबंध
मित्रांनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर मला नक्की कळवा आणि जर या निबंध मध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या देखील मला कमेंट करून सांगा मी माझ्या चुका सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि तुमच्या कमेंट वाचून मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटतो
धन्यवाद