माझी आई मराठी निबंध | Mazi Aai marathi nibandh
माझी आई मराठी निबंध | Mazi Aai marathi nibandh
नमस्कार मित्रांनो आज आपण माझी आई या विषयावर मराठीत निबंध बघणार आहोत माझी आई या विषयावर निबंध खूप वेळा पेपरमध्ये विचारला जातो दहावीच्या बोर्डाच्या पेपर मध्ये किंवा बारावीच्या बोर्डाच्या पेपर मध्ये देखील हा निबंध विचारला जातो तसेच आपल्या शिक्षक देखील हा निबंध लिहून आणायला लावतात तर मी आशा करते की ही पोस्ट तुमच्यासाठी उपयोगी ठरेल.
देवाला आपली काळजी घ्यायला येता आलं नाही म्हणून त्यांनी सर्वांच्या घरी आई पाठवले असं खूप जण म्हणतात हे खरं आहे आई म्हणजे देवाचा दुसरा रूपच आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे खरं आहे आपल्याकडे कितीही पैसा आला संपत्ती आली की ती काहीही आलं पण आईची सर कशालाच नाही आहे ती आई असते आईला अनेक नाव आहेत माय माऊली आई मम्मी माया आई म्हणजे माया .
याच आई बद्दल आपण आता प्रथमता 50 शब्दांबद्दल निबंध लिहिणार आहोत.
माझी आई मराठी निबंध 50 शब्दांत
"स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी" हे वाक्य आपण खूप वेळा सगळीकडे ऐकतो. पण या वाक्याचा अर्थ काय याचा आपण कधी विचार केला आहे का?स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी म्हणजे आपल्याकडे कितीही संपत्ती आली पैसा आला किती काही आलं पण आईची सर कशालाच नाही.
आई विना आपण भिकारी आहे जर आई आहे तर आपण श्रीमंत आहे. आई म्हणजे देवाचे दुसरे रूप असं म्हणतात की देव स्वतः आपल्या घरात येऊ शकला नाही म्हणून त्यांनी सर्वांच्या घरात आई पाठवली. आपल्या सर्वांचे आयुष्यात आईचे स्थान फार मोठे आहे जे कोणीही घेऊ शकत नाही. आईच्या संस्कारांमुळेच तर आपण घडतो ना. आपल्याला पहिल्यांदी आपलं बोट धरून चालायला शिकवते ती म्हणजे आहे. आई म्हणजे जवळ दुधावरची महसूत साय गरिबांची माय आणि वासराची आय.
आई सकाळी लवकर उठून सर्वांचा आवरून देते. आणि घरातल्या सर्व स्वयंपाक आहोत ते देवपूजा करते सर्वांचे डबे आवरून देते. मला तर माझी आई डब्यामध्ये नवीन नवीन खाऊ देते. मला तो खाऊ खूप आवडतो. माझी आई मला चांगलं काय वाईट काय यातला फरक समजून सांगते.
माझं काही चुकलं तर माझी आई मला खूप प्रेमाने समजून सांगते. मी कधी आजारी पडले तर माझी आई माझ्या जवळ येऊन माझी काळजी घेते रात्र रात्रभर झोपत नाही. मी कधी रुसली तर मला हसून मनवते. मी मला खूप भाग्यवान समजते कारण देवाने मला अशी प्रेमळ आई दिली.
माझी आई निबंध 60 ते 70 शब्दात
माझी आई फार प्रेमळ आहे. ती रोज शाळेची तयारी करायला माझ्यासोबत मदत करते. मला लवकर शाळा असते किती लवकर उठते आणि सर्व स्वयंपाक करते देवपूजा करते घरातली सर्व काम आवडते आणि मला मस्त असा डब्यात गोड गोड खाऊ देते. माझी आजी काय म्हणते की तुझी आई म्हणजे आपल्या घरची लक्ष्मी आहे. मी कधी आजारी पडलो तर माझी आई माझी काळजी घेते रात्र रात्रभर माझी आई झोपत नाही मी आजारी असल्यावर. एखाद्या सणाचा दिवस असला तर माझी आई सगळ्यांच्या आधी लवकर उठून पुरणपोळीचा स्वयंपाक करते.
विषयातून घरी आलो तर आई मला अभ्यास करायला लावते एखादी गोष्ट मला जमली नाही ताई स्वतः मला शिकवते. आई मला मस्त मस्त गोष्टी सांगते. जर मी कधी कुणाला उलटून बोलले तर आई मला एक तुला देखील ठेवून देते परंतु नंतर प्रेमाने जवळ घेऊन समजावून सांगते.
मला जर परीक्षेत चांगले गुण भेटले तर माझ्यापेक्षा माझी आईच जास्त खुश असते आणि सर्व पाहुण्यांना फोन करून सांगते की माझ्या दादाला इतके मार्क पडले तितके मार्क पडले. अशी ही माझी प्रेमळ आई मला खूप खूप आवडते.
माझी आई मराठी निबंध 100-150 शब्दात:
आई बद्दल कितीही बोलले तर ते कमीच कारण आई म्हणजे आपल्या अंगणातील पवित्र तुळस. आई शिवाय सर्वजण भिकारी आहेत आपल्याकडे पैसा असेल काही असेल पण जर आई नसेल तर आपण भिकारी आहोत म्हणूनच म्हणतात " स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी".
माझी आई खूप गोड आहे .ती सर्वांच्या आधी सकाळी लवकर उठते. माझे आजोबा नेहमी आजारी असतात माझी आई आजोबांची खूप काळजी घेते. माझी आजी कायम म्हणते की तुझी आई म्हणजे आपल्या घरची लक्ष्मी आहे लक्ष्मी. मी देखील आईला देवाप्रमाणे मानतो कारण की देवाला प्रत्येकाच्या घरी जाता आलं नाही म्हणून त्यांनी सर्वांच्या घरी आई पाठवले म्हणजे आई देखील देवच आहे. माझी आई ऑफिसला पण जाते आणि घरातले काम देखील सांभाळते. ती दोन्ही जबाबदाऱ्या पूर्ण मन लावून पार पाडते.
माझ्या आईला कलाकृती बनवायला खूप आवडतात. माझ्या घरी आल्यानंतर सर्वांसाठी जेवण बनवते नंतर थोडा राहिलेला ऑफिसचा काम करते आणि राहिलेल्या वेळात ती कलाकृती बनवते. माझ्या आईचा आणि माझं खूप जमतं. आई मला अभ्यासात खूप मदत करते. सुशिक्षित आहे त्यामुळे ती मला अभ्यासात मदत करू शकते. माझी छोटी बहिण आहे तिला देखील माझी आई खूप मस्त शिकवते. माझी आई खूप साऱ्या जबाबदाऱ्या पार पडते. ऑफिसला जाते घर सांभाळते माझा आणि माझा छोट्या बहिणीचा अभ्यास घेते आजोबांना संभाळते आजीला सांभाळते सर्व काम सांभाळते.
मला आणि माझ्या बहिणीला जेव्हा परीक्षेत चांगले गुण मिळतात तेव्हा माझी आई सर्व पाहुण्यांना फोन करून सांगते आणि आमच्यापेक्षा जास्त आनंदी तर ती असते. माझी आई देवी सारखी आहे. आमचं काही चुकलं तर आम्हाला एक टोला ठेवून देते. परंतु नंतर मायनेजवळ घेऊन कुरवाळते मिठीत घेते आणि मग नंतर नीट समजावून सांगते काय चांगलं काय वाईट नीट सांगते. माझी आई गोरगरिबांना खूप मदत करते आमच्या घरात ज्या कामाला ताई येतात माझी आई नेहमी त्यांना जेवण देते माझे कपडे माझ्या छोट्या बहिणीचे कपडे त्यांच्या मुलीसाठी देते माझी आई दिवाळीच्या वेळेस आमच्या घरातल्या कामाला ताईंना भेटवस्तू देते.
आईने आमच्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत.आम्हाला बोट धरून चालायला शिकवले. आई नेहमी आम्हाला सत्याच्या मार्गावर चालायला शिकवते वेळेचे महत्व समजून सांगते. आई म्हणजे सर्वोत्कृष्ट वरदान आहे. मी जर कुणी मला म्हणलं की सर्वोत्कृष्ट कोण आहे तुझ्या आयुष्यातलं तुम्ही थोडासाही विचार न करता डायरेक्ट बोलून टाकेल की माझी आई ही माझ्या आयुष्यातली सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहे आणि मी देवाचे आभार मानेल की या जगातली सर्वात चांगली आई मला दिली.
माझी आई मराठी निबंध 200 शब्दांत
आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर या दोघांचे मिलन म्हणजे आई. आई म्हणताना ओठांना ओठ मिळत नाही. बाबा म्हणताना ओठाला ओठ मिळतात. परंतु आई म्हणताना ओठाला ओठ मिळत नाही. म्हणूनच तर म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
प्रत्येकाच्या जीवनात आईचे स्थान वेगवेगळे असते असे म्हणतात की देव प्रत्येकाबरोबर राहू शकत नाही म्हणून त्यांनी प्रत्येक घरात आई पाठवली. आईला आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा फरक पडतो. कुणी आपले एखादे काम केले तर आपल्याकडे लगेच पैसा मागतो. परंतु आपण जर राहिला आपलं एखादं काम सांगितल तर आई पटकन करून देते आणि पैसे देखील घेत नाही.
सकाळ झाली की आई खूप हळुवारपणे प्रेमाने मायेने अंगावरून हात फिरवते आणि उठवून देते. म्हणते उठा उठा मुलांनो सकाळ झाली शाळेत जायचं आहे की नाही. आई दररोज डब्यामध्ये वेगवेगळ्या खाऊ देते माझ्या आईच्या हातचे बनलेले सर्व पदार्थ मला व माझ्या मित्र-मैत्रिणींना खूप आवडतात. माझा शाळा सुटायचा टाईम झाला की माझी आई दरवाजात येऊन उभी राहते की अजून का येत नाहीये अजून का येत नाहीये अशी वाट बघत बसते. आणि आम्ही आलो की आई खूप खुश होते कारण दिवसभर घरात ती एकटीच असते ना. आई आम्हाला आमच्या गृहपाठामध्ये मदत करते. आई सकाळी जसं मायने आम्हाला उठवते तसेच रात्री गोष्टी सांगून हळुवारपणे झोपी लावते. ज्या दिवशी आई कामात असते आणि झोपी लावत नाही गोष्ट सांगत नाही त्या दिवशी झोपच येत नाही.
आई ही निस्वार्थ मनाने आपले काम करते आणि आपल्यावर प्रेम करते आईसारखं निस्वार्थ प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही. आपल्या जीवनात आई ही खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते आई ही खूप अनमोल असते. आई म्हणजे आपल्या सोबत राहत असलेले जणू देवच आहे. या संपूर्ण जगात आई सर्वांपेक्षा खूप वेगळी आहे सुखदुःखात आपल्या संरक्षणासाठी आई नेहमी तत्पर असते. आपल्याला काय आवडतं हे कुणालाही माहीत नसतं परंतु आईला आपल्या घरातल्या सर्व लोकांबद्दल त्यांना काय आवडतं काय आवडत नाही हे माहीत असतं. नेहमी आपल्याला सत्याच्या मार्गावर चालायला शिकवते. आई आपली प्रथम गुरु असते कारण तीच तर आपला चालायला बोलायला शिकवते आपल्यावर चांगले संस्कार करते. योग्य काय अयोग्य काय याची जाणीव करून देते. कधी जर आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीला उलटून बोललो तर आई एक धपाटा ठेवून देते परंतु नंतर प्रेमाने जवळ घेऊन समजावून सांगते.
आपण जर आजारी पडलो तर दिवसभर बेडवर झोपून राहतो पण जर आई आजारी पडली तर ती झोपून राहत नाही आई आपल्यासाठी टिफिन करते आपल्यासाठी नाष्टा बनवते जेवण बनवते आपला डबा भरून देते पाण्याची बॉटल भरून देते आपल्याला शाळेत पाठवते आई देखील एक व्यक्ती आहेत परंतु आई कधीच थकत नाही असा आपल्याला वाटतं परंतु तिला देखील जीव आहे आपण देखील तिला जाणून घेतलं पाहिजे.या जगात जर देवाची अस्तित्व बघायचं असेल तर ते आपल्याला आपल्या आई मध्ये दिसेल.
आपण जेव्हा शाळेतून घरी येतो तेव्हा आई आपल्याला चमचमीत असं काहीतरी खायला बनवून ठेवते. आपल्या शाळेसाठी लागणारा प्रोजेक्ट आणि गृहपाठामध्ये मदत करते .आईच्या प्रेमाची तुलना कधीच कुठल्या दुसऱ्या व्यक्ती सोबत करू शकत नाही. आपल्यावर संस्कार चांगले व्हावे म्हणून नाही नेहमी ऐतिहासिक गोष्टी सांगत असते. आई आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचा वर्षाव सतत ओसंडून राहावा म्हणून कार्यक्षम असते. आणि आई आपल्यासाठी इतकं सगळं करते तरी देखील आपण कधी कधी आपल्या आईला नाराज करतो परंतु तिच्या हसऱ्या चेहऱ्या मागचे सुद्धा एक दुःख दडलेलं असतं जे आपल्याला समजत नाही. म्हणून आपण प्रत्येकाने आईची नेहमी काळजी घेतली पाहिजे.
आई ही ममता आणि वासल्याची मूर्ती आहे आईचं पहिलं जग म्हणजे आपली मुलं. आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आईसाठी आपण लहानच असतो. आई आपला आनंदात दुःखात आपल्याबरोबर असते जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा ती आपल्यासाठी रात्रभर जागी राहून आणि आपल्या प्रकृतीसाठी देवाची प्रार्थना करते की आपल्यासाठी सर्व काही त्याग करते .आई भुकेलेली राहते पण आपल्याला जेवण देते आईसारखा त्याग आणि प्रेम कुणीही करू शकत नाही. आईला आपल्या मनातल्या सर्व गोष्टी समजतात आपण तिला सांगितले किंवा नाही सांगितले तरीही तिला ते आपल्या मनातील सर्व गोष्टी समजतात आपल्याला कुठली गोष्ट कठीण वाटत असली तर आई आपल्याला मार्गदर्शन करते आणि आपल्याला ती गोष्ट अचानकपणे सोपी वाटू लागते. अशीच ही आई आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या सोबत असते.
माझी आई मराठी निबंध | Mazi Aai marathi nibandh
मित्रांनो आपण या लेखामध्ये आई बद्दल पाच ते सहा निबंध बघितले तुम्हाला पेपर मध्ये माझी आई या विषयावर खूपच निबंध लिहायचा असतो तेव्हा तुम्ही हा निबंध लिहू शकता. यामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असतील तर त्या देखील तुम्ही यामध्ये लिहू शकता आणि कुठली गोष्ट या लेखांमध्ये चुकली असेल तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता आणि माझ्या निदर्शनास आणून देऊ शकता. परंतु या करता तुमची कमेंट महत्त्वाची आहे तुमचं मत महत्त्वाचं आहे आणि तुमच्या अशाच कमेंट आम्हाला नवनवीन विषय लिहायला प्रोत्साहन देतो.
सदर निबंध खालील सर्व इयत्ता करता उपयोगी आहे:
- माझी आई मराठी निबंध तिसरी
- माझी आई मराठी निबंध दाखवा
- माझी आई मराठी निबंध सहावी
- माझी आई मराठी निबंध इयत्ता दुसरी
- माझी आई निबंध पाचवी
- माझी आई निबंध मराठी सातवी
- माझी आई निबंध
- आई माझी आई निबंध