प्रदूषणाने केला घात सर्वत्र झाली वाताहात निबंध
नमस्कार मित्रांनो आज आपण " प्रदूषणाने केला घात सर्वत्र झाली वाताहात " हा निबंध बघणार आहोत. हा निबंध पहिली ते बारावीच्या पेपर मध्ये विचारला जातो. त्यामुळे मी आशा करते की हा निबंध नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल. चला तर सुरुवात करूया आपल्या निबंधाला.
प्रदूषणाने केला घात सर्वत्र झाली वाताहात
प्रदूषण हे एक खूप मोठे संकट आहे जे आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे या प्रदूषणाने सारे विश्व खडबडून जागे झाले आहे दरवर्षी वसुंधरा दिन पाळून वसुंधरा बचाव हा संदेश सर्वांना दिला जातो यामध्ये प्रदूषण करायचं नाही यावर घोषणा केल्या जातात किंवा याबद्दल जनजागृती केली जाते. वसुंधरेमुळे आपण या जगात सुखा समाधानाने राहू शकतो याचाच विसर या वसुंधरा पुत्रांना पडला आहे. आणि ते आपल्या प्रत्येक कृतीने वसुंधरेवरील प्रदूषण वाढवत आहे. प्रदूषण हे नैसर्गिक नाहीये प्रदूषण हे मानवनिर्मित आहे माणसाने निर्माण केलेले आहे माणसाच्या चुका मुळे हे प्रदूषण निर्माण झाले आहे. पण चूक करून देखील मानवालाच याची जाणीव नाहीये की आपण हे मोठं संकट आपल्यावर ओढून घेतले आहे.
माणूस नवनवीन गोष्टींचा शोध लावत आहे नवनवीन उपकरणे काढत आहे परंतु त्याचवेळी आपली कृती प्रदूषणाला कारण होत आहे का हे माणसाच्या लक्षात येत नाहीये. माणूस खूप पुढे जात आहे. माणूस आपल्या बुद्धीने नवनव्या गोष्टी शोधून काढत आहे. पण याच नवनवीन गोष्टी प्रदूषणास कारण ठरत आहे हे मानवाला कळतच नाहीये आणि याचा तो विचार देखील करत नाहीये. माणसाने इमारती वाढण्यासाठी जंगल तोड केली त्यामुळे पावसाचे प्रमाण घटले आणि जमिनीची धूप वाढली.
माणसाने या पूर्ण भारतात खूप सारे कारखाने सुरू केले आहे आणि कारखान्यांचे दूषित पाणी नद्यांना जाऊन मिळते त्यामुळे देखील प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढत आहे माणसाने अनेक प्रकारचे साधने शोधून काढली जसं की मोटार सायकल ,गाड्या परंतु यामुळे किती प्रदूषण होते किती आजार वाढले याची जाणीव माणसाला नाहीये. या गाड्यांच्या धुरांमुळे वायू प्रदूषण वाढले आहे. आणि माणसाला श्वास घ्यायला अत्यंत आवश्यक असते ती म्हणजे शुद्ध हवा परंतु शुद्ध हवाच आपल्या जगात राहिली नाहीये. कारण दूषित हवेमुळे अनेक आजार वाढतात. याच दूषित हवेमुळे माणसे पशु पक्षी मृत्युमुखी पडतात किती वनस्पती देखील नष्ट होतात. आणि आपण कारखान्यातलं पाणी नद्यांमध्ये सोडून देतो कारखान्यातलं पाणी किती दूषित असतं त्यामुळे रोगराई वाढते आणि ते पाणी आपण नदीमध्ये सोडतो त्यामुळे आणखी पाणी प्रदूषित होतं. याच प्रदूषित पाण्यामुळे गावाचे गावे रोगग्रस्त होत आहेत. माणसाला आपले सर्वस्व वाहणाऱ्या नदीला दूषित करताना माणसाला मात्र थोडीशी खंत वाटत नाही.
माणसाने प्लास्टिकचा शोध लावला आणि त्याला स्वर्ग हाती आल्यासारखे वाटले परंतु होता प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे किती त्रास होतोय आपणच त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे आजारी पडतोय. आपण किराणा दुकान गेलो की प्लास्टिकची पिशवी घेतो थोडं काही सामान आणायला गेले की प्लास्टिकची पिशवी घेऊन येतो हो पण ती प्लास्टिकची पिशवी किती हानिकारक आहे प्लास्टिकची पिशवी कुजत पण नाही त्यामुळे ती नष्ट देखील होऊ शकत नाही. त्याऐवजी तुम्ही जर कापडी पिशव्या वापरला तर किती मस्त ना!
आपण अनेक गोष्टी घेण्यासाठी प्लास्टिक आवरणाचा उपयोग सुरू केला आहे पण त्यामुळे घनकचरा वाढू लागला आहे प्लास्टिक कुजत नसल्यामुळे हा कचरा नष्ट होऊ शकत नाही त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. शेतीतील पिकांवर किडे पडू नये म्हणून औषधे फवारली जातात अशा औषधांमुळे वातावरण प्रदूषित होतेच पण अशा अन्नधान्यांचा माणसाच्या शरीरावर देखील खूप परिणाम होतो कारण आपण ते अन्न खातो. हवा व पाणी यांच्या होणाऱ्या प्रदूषणाप्रमाणेच आणखी एक प्रदूषण आहे ते म्हणजे ध्वनी प्रदूषण आपल्या भोवती सतत मोठ-मोठे कर्कश आवाज होत असतात कर्कश आवाजात लावलेले डीजे गाणे आसमंताची शांतता नष्ट करतात त्यामुळे मनाची शांतता देखील नष्ट होते.
लग्नकार्यांमध्ये मोठ्या आवाजात डीजे वापरतात किंवा आपण देखील मोठ्या आवाजात गाणी आहेत पण त्यामुळे शांतता नष्ट होते आपण गाड्या चालवतो गाड्यांचे हॉर्न देखील किती मोठ मोठ्या आवाजात असतात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते.
अशा वातावरणात लोक कार्यक्षमतेने काम करू शकत नाही तेवढेच नव्हे तर त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतो या सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे माणसाचे आरोग्य बिघडत आहे माणूस आजारी पडत आहे पशुपक्षी नष्ट होत आहेत एवढेच नव्हे तर त्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे माणसाला जिवंत राहायचे असेल तर प्रदूषण नाहीसे करावे लागेल नाहीतर माणसाचा मृत्यू अटळ आहे अटळ.
प्रदूषणाने केला घात सर्वत्र झाली वाताहात निबंध | pradushanane kela ghat sarvatra zali vatahat Nibhand
मित्रांनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट मुळे मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते आणि जर या लेखामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या देखील मला कमेंट करून कळवा मी माझ्या चुका व सुधारण्याचा प्रयत्न करेन
धन्यवाद