रेडीमेड पिझ्झा बेस पासून पिझ्झा कसा बनवायचा | Readymade Base Pizza Recipe
खूप जण विकत पिझ्झा खातात आणि विकत चा पिझ्झा 500- 600 च्या खाली तर भेटत नाही आणि मग मिडल क्लास लोकांचा पाच टक्के पगार तर पिझ्झा मध्ये जातो. या पिझ्झा मध्ये काय ते लोक सोनं किंवा चांदी टाकून विकत नाही तरी आपल्यासारखे सामान्य लोक पिझ्झा खायला हजार ते दोन हजार रुपये नक्कीच घालतात. पण आपण याचा विचार करत नाही की तो पिझ्झा घरी बनवला तो किती सोपा आहे आणि किती चविष्ट बनला जातो. युट्युब वर हजारो रेसिपी आहे.
पिझ्झा घरी कसा बनवायचा तरी आपल्यासारखे लोक हॉटेलमध्ये जातात आणि एक दोन हजार रुपये पिझ्झा मध्ये घालून येतात अरे पण तू एक दोन हजार चा पिझ्झा आपल्या घरी शंभर रुपयात बनला जातो किंवा जास्तीत जास्त रुपये 100 लागतात कमीत कमी पैसे 20 ते 30 रुपये लागतात. कारण पिझ्झा बेस तीस रुपयाला दोन भेटतात.
आपण तेच तीस रुपये दोन पिझ्झा बेस चे पिझ्झा हॉटेलमध्ये हजार रुपयाला खातो कारण त्यावर चीज वगैरे असतं पण अहो तुम्ही याचा विचार केला का की चीज पिझ्झा बेस हे सर्व घरी आणून जर पिझ्झा बनवला तर तो जास्तीत जास्त शंभर रुपये पर्यंत जातो आणि बनवायला लागतात ते फक्त पाच मिनिट तर असाच आपण रेडिमेट पिझ्झा बेस पासून पिझ्झा कसा बनवायचा ते बघणार आहोत.
असं नाहीये की रेडीमेड पिझ्झा बेस पास पिझ्झा बनवायचा तुम्ही घरच्या घरी पिझ्झा बेस देखील बनवू शकता. आणि खूप लोक अशी आहे ज्यांच्याकडे ओव्हन नाहीये म्हणून ते पिझ्झा बनवत नाही परंतु ओव्हन नसलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही कढाई मध्ये पिझ्झा बनवू शकता. चला तर सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला
रेडीमेड पिझ्झा बेस पासून पिझ्झा कसा बनवायचा?
आज आपण रेडिमेट पिझ्झा बेस पासून पिझ्झा कसा बनवायचा ते बघणार आहोत
१.तीस रुपयाला दोन पिझ्झा बेस येतात
२.पिझ्झा सॉस पंधरा ते वीस रुपये मध्ये किराणा दुकानात अवेलेबल असतो
३. पंधरा रुपयाला चीज किराणा दुकानांमध्ये उपलब्ध असतं.
४. पिझ्झा बनवण्यासाठी शिमला मिरची,टोमॅटो,कांदा इतकच लागतं आणि हे सहजपणे आपल्या घरात अवेलेबल असतं
५. ऑरगॅनो कुठलाही किरण दुकानांमध्ये दहा रुपयाला भेटून जातं.
६. आणि चिली फ्लेक्स देखील कुठलाही किरण दुकानांमध्ये दहा रुपयाला भेटून जातं परंतु चिली फ्लेक्स विकत घ्यायची गरज नाही आपल्या घरामध्ये ज्या लाल मिरच्या असतात वाळलेला त्याला तुम्ही मस्त असं कुटून घेऊ शकता त्याला चिली फ्लेक्स म्हणतात.
आता आपण बघणार आहोत की पिझ्झा बनवण्यासाठी काय काय सामग्री लागते या सर्वांच्या किमती मी वरती लिहून दिलेले आहेत:
पिझ्झा बेस, कांदा, टोमॅटो ,शिमला मिरची, पिझ्झा सॉस,ऑरगॅनो, चिली फ्लेक्स
आता आपण पिझ्झा बनवायची कृती बघणार आहोत:
१. पिझ्झा बेस घ्यायचा त्याला मस्त असं चमच्याने किंवा चाकूने होल पाडून घ्यायचे. जेणेकरून पिझ्झा आपण जर बेक करायला ठेवला तर तो फुगणार नाही.
२. आता पिझ्झा बेसवर मस्त असा पिझ्झा सॉस पसरून जायचा एक ते दीड चमचा पिझ्झा सॉस पसरवून द्यायचा.
३. आता कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची मस्त अशी बारीक कापून घ्यायची आणि त्यावर ठेवून द्यायचे.
४. आताची चा एक क्यूब घ्यायचा आणि त्यावर मस्त असा किसून टाकून द्यायचा.
५. आता त्यावर चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनिक थोडं थोडं असं टाकून द्यायचं.
६. आता आपण ज्या प्लेटवर पिझ्झा ठेवलेला आहे ती प्लेट ओव्हनमध्ये तुम्ही बेक करायला ठेवू शकता.
तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर कढाई मध्ये खाली मीठ टाकायचं त्यावर ही प्लेट ठेवायची आणि वरून झाकण ठेवून द्यायचं आणि दहा ते बारा मिनिटे याला मस्त असं शिजू द्यायचं जेव्हा आपल्याला वाटेल की चीज आपलं मेल्ट झाले तेव्हा गॅस बंद करायचा आणि प्लेट बाहेर काढून घ्यायची.
आता आपला मस्त असा पिझ्झा रेडी आहे आणि तुम्ही याला खाऊ शकता खूप मस्त लागतो आणि स्वादिष्ट लागतो जसा हॉटेलमध्ये भेटतो तसाच हा पिझ्झा लागतो. नक्की ट्राय करा ही रेसिपी घरी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा
धन्यवाद