सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती | Sindhutai Sapkal Information in Marathi

 सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती | Sindhutai Sapkal Information in Marathi


सिंधुताई सपकाळ माहिती मराठी | Sindhutai Sapkal Information in Marathi

नाव: सिंधुताई सपकाळ
जन्मतारीख: १४ नोव्हेंबर १९४८
मृत्यूची तारीख: ४ जानेवारी २०२२
जन्म ठिकाण: महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात
वडिलांचे नाव: अभिमान जी साठे
पतीचे नाव: श्रीहरी सपकाळ
जात: माहीत नाही
व्यवसाय: भारतीय समाजसुधारक
शिक्षण: इयत्ता IV

 सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती | Sindhutai Sapkal Information in Marathi

नमस्कार मंडळी आज आपण मी वनवासी या सिंधुताई सपकाळ यांच्या पुस्तकांमधून सिंधुताई सपकाळ याबद्दल जाणून घेणार आहोत. " मी वनवासी" हे पुस्तक सिंधुताई सपकाळ यांनी स्वतः लिहिलं आहे. त्याची लेखिका त्या स्वतः आहेत आणि त्या पुस्तकांमध्ये त्यांचे आत्मचरित्र त्यांनी सांगितलेलं आहे. सिंधुताई सपकाळ यांचे खूप ठिकाणी अनाथ आश्रम आहेत . त्यांनी अनाथ मुलांसाठी खूप काही केलं आहे.त्यांचं नाव खूप मोठ आहे .आपण सर्वच लोक त्यांना ओळखतो.परंतु त्यांच्या बद्दल काही माहिती अजून देखील लोकांना माहित नाहीय त्यामुळं हा लेख बनवला आहे. मी अशी आशा करते की हा लेख तुम्हाला नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊयात सिंधुताई सपकाळ यांच्या बद्दल.

आर्वी रोडला पिंपरी (मेघे ) जिल्हा वर्धा हे सिंधुताई सपकाळ यांचे माहेर आणि नवरगाव (फॉरेस्ट)व्हाया बोरधरण ,सेलू घोराड रोड हे सिंधुताईंचे सासर.

वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात शिकायला सुरुवात केली आणि सिंधुताई सपकाळ यांच्या घरातल्या आधी कोणीही शिकलेले नसल्यामुळे सिंधुताईंच्या आईने विरोध केला पण अशिक्षित असूनही वडिलांनी त्यांना जायला नकार दिला नाही. सिंधुताई सपकाळ यांचे वडिलांचा स्वभाव प्रचंड चांगला होता. सिंधुताईंच्या वडिलांचे नाव अभिमानजी साठे.

चौथीची परीक्षा दिल्यानंतर काही दिवसांनी त्यांचे लग्न ठरलं. सिंधुबाईंच्या नाव आधी चिंधी होतं आता कुमारी चिंधी अभिमानजी साठे यांचे रूपांतर सौ चिंधाबाई श्रीहरी सपकाळ यांच्यात होणार होतं. सिंधुबाईंचं लग्न झाल्यानंतरच काही दिवसांनी त्यांना तीन मुलं झालेत .दोन दोन वर्षाच्या अंतराने असे तीन मुले त्यांना झाली.

आणि 22 व्या वर्षी पुन्हा एकदा त्यांना दिवस गेले.सिंधुताईंना खूप आनंद झाला होता कारण की त्यांना देखील मुलगी लागत होती. परंतु त्यांना माहित नव्हतं की पोटात मुलगी आहे की मुलगा पण त्यांना मुलीची खूप हौस होती. कसेबसे त्यांची नऊ महिने पूर्ण झाले. पण सिंधुबाई खूप सुशिक्षित होत्या आणि त्या गरिबात विरोधात खूप लढा द्यायच्या त्यामुळे त्यांची खूप सारे दुश्मन बनले होते. तर शत्रुने अशावेळी डंक मारला. नववा महिना पूर्ण झाला होता आता बाळ होणार होतं परंतु सर्व शत्रू बाहेर आले.

 आणि सिंधुताईंच्या नवऱ्याला सांगितले की तिच्या पोटात जे बाळ आहे ते आमचं आहे. ताईंच्या नवऱ्याने एकही शब्द ऐकून न घेता घराबाहेर त्यांना काढून दिले, आणि त्यांनी तिला सांगितले की तुझ्या पोटातला गर्भ माझा नाही. आणि त्यांचे हे शब्द उकळत्या तेलाप्रमाणे सिंधुताईंच्या कानात शिरले. त्यानंतर सिंधुताई ना चक्कर आली .त्यानंतर त्यांना मध्यरात्री जाग आली आणि डोळे उघडून बघितले तर सगळीकडे सामसूम होती .त्यांचं भरलेलं पोट रिकामे झालेले होते.त्या खूप दचकल्या. आणि नंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांची सुटका झाली होती. म्हणजेच त्यांचं बाळंतपण गोठ्यात बेशुद्धीत झालं होतं. 

त्यांना मुलगी झाली होती तीन मुलं झाल्यानंतर ही चौथी मुलगी झाली होती केवढी हाऊस होती त्यांना मुलीची आणि अशा भयंकर अवस्थेत ती मुलगी जन्माला आली होती. नंतर त्यांना परिस्थितीची जाणीव झाली आणि त्यांना समजले की पतीने चिडून त्यांच्या पोटावर लाथा मारल्या होत्या आणि ओढत गाईच्या गोठ्यात आणून टाकले होते परंतु त्यांना एका गोष्टीच आनंद होता की त्यांची सुटका झाली होती आणि त्या चौथ्यांना आई बनल्या होत्या.

त्या मुलीला जवळ वाहत असलेल्या नदीकडे घेऊन गेले आणि तिला स्वच्छ धुतलं आणि त्यांची नाळ देखील तुटलेली नव्हती आणि त्याला कापायची होती म्हणून त्यांनी तिथे दगड बघितला आणि डोळे झाकून जोरात दगड त्या नाळीवर आपटवला आणि रक्ताने भरलेली मुलगी ओढ्याच्या गार पाण्याने त्यांनी धुवून काढली .स्वच्छ धुतली. स्वतः देखील आंघोळ केली. आणि त्यांना त्यांच्या नवऱ्याने देखील घरात घेतले नाही तर पुन्हा एकदा गोठ्यात जाऊन बसल्या आणि त्या दहा दिवस उपाशी राहिल्या .

ओली बाळातीन असून देखील त्या उपाशी राहिल्या. नवऱ्याने घरात घेतले नाही किंवा कोणी खा म्हणून म्हणले नाही .घरात छोटे तीन मुलं होते त्यांचे ते देखील त्यांच्या जवळ आले नाही. एक म्हातारी बाई दररोज कचरा टाकायला यायची 

त्यांना वाटलं म्हातारीला तरी माझी क्यू होईल परंतु म्हातारी देखील त्यांना म्हणाली की, तू बेशरम आहेस तुझ्या ठिकाणी मी असते तर कधीच मरून गेले असते. तेव्हा त्यांना वाटलं की खरंच मी मेले का नाही अजून .परंतु त्या लहान छोट्या मुलीकडे बघून त्यांना वाटलं की नाही याच्यासाठी तरी मला जगायचं 

त्यांना रस्ता माहित नव्हता कुठे जायचं काय करायचं काहीच माहित नव्हतं आणि मुलगी देखील झाल्यापासून एकदाही रडली नव्हती .त्या त्या मुलीला उपाशी ठेवायच्या कारण की त्यांना असं वाटायचं की जर ही उपाशी राहिली तर भुकेसाठी रडेल त्यामुळे त्याला उपाशी ठेवायच्या परंतु मुलगी रडायची नाही त्यांना वाटायचं की आपली मुलगी मुकी आहे का? त्या दोन दोन दिवस मुलीला पाजत नसायचा त्यांचा जीव वरती खाली व्हायचा परंतु त्यांना असं वाटायची का आपली मुलगी रडली पाहिजे कारण की ती मुकी आहे की काय त्यांना कळलं पाहिजे.

 सिंधुताईंच्या मनात अनेकदा विचारायचा की आपण मरून जावं आणि असा विचार आला एकदाच असा परंतु हा विचार आल्यानंतर मुलगी ढसाढसा रडायला लागली मोठ्या मोठ्याने रडायला लागली सिंधुताईंच्या गळ्यातले काळे मण्यांना घट्ट मुठीत धरून ती रडत होती .जनु ती त्यांना म्हणत होती की तुला काय हक्क आहे मला सोडून मारायचा. आता माझा बाप ,माझी माय ,माझी आई सगळं तूच आहे माझं सर्वस्व तूच आहे. जणू ते छोटेसे लेकरू म्हणते की मला तुझ्याशिवाय कोणीही नाही माय कुणीही नाही.

आणि सिंधुताईंचे डोळे खाडकन उघडले आत्महत्येचे ते खुळसट विचार पळून गेले . सिंधुताईंची मुलगी मुठी आवळून रडतच होती आणि सिंधुताई विचार केला की मरणार नाही .जिवंत ठेवीन तिला सोडून कधी जाणार नाही. तिला छातीशी घट्ट धरून सांगितले की मी फक्त तुझ्यासाठी जगेन यापुढे माझी एकमेव ममता तूच बेटी. आणि याचवेळी सिंधुताईंनी त्यांच्या मुलीचे नाव ठेवले ममता ममता ममता.

खरंच किती खडतर प्रवास होता त्यांचा हा. आपल्याला थोडं जरी लागला तर आपण किती कळवळीने रडतो किंवा एखाद्यावर रागावतो परंतु त्यांचा आयुष्य किती कठीण होते याचा आपण विचार करू शकत नाही .आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दुखी होतो किंवा आयुष्याला नशिबाला दोष देतो परंतु अशा काही गोष्टी ऐकल्यावर आपल्याला किती असं अंगावर काटा आल्यासारखं होतं.

 आपल्याला असं वाटतं की आपण काहीच भोगले नाहीये खरंच अशा गोष्टी ऐकून किंवा असं वाचून अंगावर असा शहारा येतो आणि असं वाटतं आपण किती नशीबवान आहोत त्यामुळे प्रयत्न करणं कधीही सोडू नका मी जर तुम्हालाही आजचा लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर ती देखील तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये.

धन्यवाद

 सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती | Sindhutai Sapkal Information in Marathi

सिंधुताईंची संस्था (Institute of Sindhutai in Marathi) 

  1. बालभवन अभिमान (वर्धा)
  2. वसतिगृह गंगाधरबाबा (पोकळी)
  3. सन्मती बाल निकेतन हे भारतातील सन्मती (हडपसर पुणे) येथील हिंदू मंदिर आहे.
  4. चिखलदरा, माझा आश्रम (अमरावती)
  5. सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन आणि सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन (पुणे)

सिंधुताई सपकाळ पुरस्कार (Sindhutai Sapkal Award in Marathi)

  1. २०१० मध्ये अहिल्याबाई होळकर यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार (महाराष्ट्र राज्याकडून) मिळाला.
  2. २०१३ मध्ये, मदर तेरेसा यांना सामाजिक न्यायासाठी मदर तेरेसा पुरस्कार मिळाला.
  3. २०१३ मध्ये आयनिक मदरला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
  4. २०१२ मध्ये तिने रिअल वारस पुरस्कार जिंकला.
  5. २०१५ मध्ये, २०१४ साठी अहमदिया मुस्लिम शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘आयकॉनिक मदर’ हा राष्ट्रीय पुरस्कार आहे.

  1. हिरकणी सह्याद्री पुरस्कार
  2. यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना राजाई पुरस्कार दिला जातो
  3. गौरव शिवलीला शिवलीला शिवलीला शिवलीला शिवलीला शिव
  4. १९९६ मध्ये तिला अॅडॉप्टिव्ह मदर अवॉर्ड मिळाला.
  5. वास्तविक नायकांसाठी पुरस्कार (रिलायन्सद्वारे)
  6. गौरव शिवलीला शिवलीला शिवलीला शिवलीला शिवलीला शिव

Related searches

  • सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र
  • सिंधुताई सपकाळ यांची जात
  • सिंधुताई सपकाळ विकिपीडिया
  • सिंधुताई सपकाळ आश्रम
  • सिंधुताई सपकाळ कविता
  • सिंधुताई सपकाळ यांचे शिक्षण
  • सिंधुताई सपकाळ पिक्चर
  • सिंधुताई सपकाळ निबंध

Post a Comment

Previous Post Next Post