माझे शेजारी मराठी निबंध | Amche Shejari Marathi Nibandh

माझे शेजारी मराठी निबंध | Amche Shejari Marathi Nibandh

माझे शेजारी मराठी निबंध | Amche Shejari Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो आज आपण आमचे शेजारी या विषयावर मराठी निबंध बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला

माझे शेजारी मराठी निबंध | Amche Shejari Marathi Nibandh

एकविसाव्या शतकातील या ईश्वरा संपन्न महामुंबईला अजिबात न शोभणारी आमची ही गंगाराम चाळ आता थोड्याच दिवसांची साथीदार आहे. पाच ते सहा मजली भव्य इमारतीच्या गर्दीत उच्चभ्रू लोकांना अशी चाळ फार विसंगत दिसते. 80 वर्षाच्या प्रवासात आत्ता ती अगदी खिळखिळी झाली आहे पण येथे राहणाऱ्या साध्या सामान्य लोकांच्या मनात तिच्याबाबत अनेक कडू गोड आठवणींचा कल्लोळ आहे चाळीशी नाही होणार तिच्याबरोबर आपण आणि आपले हे प्रेमळ शेजारी पाहणारे बोचक जाणीव आम्हा सर्वांना व्यथीत करत आहे.

विसाव्या शतकाच्या दुसऱ्या शतकात ही चाळ बांधली गेली. तेव्हा तिचा खूप रुबाब होता आज येथे राहणारे काहीजण सुरुवातीपासूनच येथे आहेत त्यांची तिसरी पिढी आता या चाळीच्या गॅलरीत खेळत आहे काहीजण कारण परतवे चाळ सोडून गेले कुणी फ्लॅटमध्ये राहायला गेले तर कोणी उपनगरात स्वतःच्या बंगल्यात गेले पण चाळ सोडून गेलेले हे आमचे शेजारी अजून अधून मधून येतात जुन्या आठवणी काढतात आणि काही काळ सुखावतात.

आज आमच्या शेजाऱ्यात विविध जाती धर्माचे व पंथाचे लोक राहतात आमच्या शेजारचा राम न चुकता दर रविवारी मंदिरात जातो. अतिश च्या घरातील वडील माणसे दिवसातून पाच वेळा नमाज पडतात. शेजारचा जॉन न चुकता दर रविवारी चर्चमध्ये जातो. आणि दर सुटतील त्याच्या गावाला केरळला जाणारा सतीश सर्वांसाठी केळ्यांचे वेफर्स घेऊन येतो आणि मालवणला जाऊन येणारे मालवणकर काका सर्वांसाठी केर सुन्या सुपे फणसाचे गरे घेऊन येतात. आम्ही सर्वजण एकाच कनिष्ठ मध्य वर्गातील आहेत सर्वांचे अडीअडचणी सारखाच अशा या वेळी एकमेकांच्या मदतीला जाऊन जाण्याची वृत्ती ही सारखीच.

गेल्या वर्षी शेजारच्या काकूंना हृदयविकाराचा झटका आला रातोरात त्यांना रुग्णाण्यात नेऊन पुढील उपचार करावे लागले दहा मिनिटात आवश्यक रक्कम जमली काकूंनीही घरी आल्यावर महिन्याभरातच सर्वांचे पैसे फेडून टाकले त्यावेळी त्यांच्या डोळ्यात कृतज्ञेचे अश्रू होते तमिळ भाषक परमेश्वरन आणि राधा यांचा सुपुत्र मनी बारावीच्या परीक्षेत बोर्डात पहिला आला तेव्हा त्यांच्या यशाने सारी चाळ आनंदी चाळीवर विद्युत रोषणाई केली गेली.

आमच्या या चाळीस सर्व धर्माचे सण मोठ्या आनंदाने साजरे होतात 15 ऑगस्ट व 26 जानेवारी असे राष्ट्रीय सण तर आम्ही एकत्र येऊन साजरी करतो त्या दिवशी मोठ्या उत्साहात सहभोजन पार पाडले जाते. अशी ही आमची चाळ एकात्मतेचे प्रतीक आहे. आता मात्र थोडाच दिवसाची सर्व संपणार कारण महापालिकेनेच आमची चाळ धोकादायक म्हणून जाहीर केली आहे की पाडली जाणार म्हणजे सर्वजण आता फ्लॅट घेऊन राहणार किंवा स्वतःचे घरे घेऊन राहणार म्हणजेच आमचे हे शेजारी एकमेकांच्या प्रेमळ शेजाऱ्याला मुकणार पण या गोड स्मृती मात्र ते केव्हाही विसरणार नाहीत हे नक्की.

माझे शेजारी मराठी निबंध |  Essay on My Neighbour in Marathi

मित्रांनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा निबंध तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना देखील अभ्यास करण्यात मदत होईल

 धन्यवाद

माझे शेजारी मराठी निबंध । My Neighbour Essay in Marathi

  • Related searches : 
  • amche shejari marathi nibandh
  • amache daivat in marathi
  • amche shejari nibandh in marathi
  • maze shejari nibandh in marathi

Post a Comment

Previous Post Next Post