राज ज्योतिषी | Astrologer Marathi story | Marathi katha
मित्रांनो आज आपण खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत
राज ज्योतिष - राजा - हुशारी -मुलाखत
चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथालेखनला
राज ज्योतिषी
अवंती नगरचे राजा बाहुबली यांन राज ज्योतिषाची गरज होती. मंत्री परिषदेसमोर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली राज ज्योतिषी बाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्यक्तीला निरखून पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्री गणांनी सर्व सहमतीने ठरवले.
या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखती द्यावत अशी दवंडी दुसऱ्या दिवशी राज्यात पेटवण्यात आली. सर्व उमेदवार ठरलेल्या वेळी दरबारात उपस्थित झाले राजाने स्वतःच मुलाखती घेण्यास सुरुवात केली अनेक ज्योतिषांनी आपल्या ज्ञानाचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली परंतु राजाचे समाधान झाले नाही.
अखेरीस तीन ज्योतिषी उरले त्यातील पहिल्या ज्योतिषाला राजाने विचारले, तुम्ही भविष्य कसे सांगता
ज्योतिष म्हणाला, नक्षत्र पाहून
राजाने दुसऱ्या ज्योतिषाला देखील हाच प्रश्न विचारला तेव्हा दुसरा ज्योतिषी म्हणाला ,हस्तरेखा पाहून भविष्य सांगतो.
राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत अचानक राजाला तेव्हा आपल्या राज्यातील निर्धन ज्योतिषी विष्णू शर्माची आठवण झाली विष्णू शर्माला तात्काळ बोलवण्यात आले राजाने विष्णू शर्माला विचारले तुम्ही ज्योतिषी असून सुद्धा या मुलाखतीसाठी का आला नाहीत . तुम्हाला राज ज्योतिषी होणे आवडत नाही का तेव्हा विष्णू शर्माने सांगितले, महाराज मी घरी बसून माझ्या स्वतःच्या पत्रिकेचा अभ्यास केला व माझ्या अभ्यासानुसार या पदावर मीच नियुक्त होणार आहे. तुम्ही मला निमंत्रण पाठवून मला बोलावून घ्याल हे मला माझ्या अभ्यासातून आधीच कळाले होते त्यामुळे मी या पदासाठी मुलाखत देण्यास आलो नाही. आता राजाला विष्णू शर्माची अभ्यासू वृत्ती व त्याचा आत्मविश्वास या दोन्हींचा अभिमान वाटून त्याने विष्णू शर्माला ज्योतिषी म्हणून नियुक्त केले.
तात्पर्य: ज्यांचा स्वतःवर व स्वतःच्या अभ्यासावर प्रचंड विश्वास असतो ते कधीच हार मानत नाहीत व त्यांच्याकडे संधी आपोआप चालून येते.
मित्रांनो जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा या कथालेखनामध्ये मी तात्पर्य सहित कथा दिली आहे आणि अशी कथा तुम्हाला आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते तुम्हाला मुद्दे दिलेले असतात फक्त त्यावरून तुम्हाला कथा लिहायची असते जर तुम्ही अशा पद्धतीच्या कथा वाचून गेला तर तुम्हाला नक्कीच कथा कशी लिहायची हे समजेल आणि तुम्हाला आणखी दुसऱ्या विषयावर कथा हवी असेल तर तुम्ही आपल्या वेबसाईटवर बघू शकता मी सर्व प्रकारच्या कथा उपलब्ध करून दिले आहेत आणि या कथा तुम्ही नक्की तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल.
धन्यवाद
Related searches:
राज ज्योतिषी
Astrologer Marathi story
Marathi katha
मराठी कथालेखन
बोधकथा
मराठी कथा
सुंदर कथा
गोष्ट लेखन
कथालेखन
कथालेखन मराठी नववी
मराठी कथा
कथालेखन मराठी दहावी
कथालेखन मराठी आठवी
कथालेखन मराठी pdf
शॉर्ट कथा लेखन इन मराठी
Short कथालेखन in Marathi
कथालेखन मराठी