खालील शीर्षकावरून कथालेखन करा

 खालील शीर्षकावरून कथालेखन करा

ऐकावे जनाचे करावे मनाचे

ऐकावे जनाचे करावे मनाचे


उत्तर:

ऐकावे जनाचे करावे मनाचे

रामपूर गावात एक कुंभार आणि त्याचा मुलगा राहत होता त्यांच्याकडे एक गाढव होते एकदा ते आपल्या गाढवाला घेऊन बाजारात जात होते. गाढव पुढे चालत होते आणि त्याच्या मागे बाप लेक चालले होते उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाहायला चटके बसत होते एवढ्या समोरून काही लोक चालताना दिसले ते कुंभार आणि त्याच्या मुलाकडे पाहून म्हणाले काय फायदा गाढव असून मुलाला एवढ्या उन्हात चालतच घेऊन जातोय हा कुंभार कुंभार आणि ते ऐकली आणि मुलाला गाढवावर बसवले थोडे अंतर चालून गेल्यावर काही लोक पारावर बसलेले दिसले कुंभार तिथून जाऊ लागतात त्यातील एक जण ओरडला काय दिवस आले आहेत मुलगा मजेत गाढवावर बसला आहे आणि म्हातारा बाप रस्त्याने चालतोय.

मुलगा पटकन खाली उतरला त्याला खूप वाईट वाटले त्यांनी आपल्या बाबांना गाढवावर बसायला सांगितले थोडा अंतरावर पुन्हा काही लोक भेटले त्यांनी कुंभाराला जोरा जोराने ओढून म्हणले अरे काही लाज आहे की नाही मुलगा पायी चालतो आणि तू आरामात गाढवावर बसून जातोस कुंभार मुलाला म्हणाला बाळ तू पण ये गाढवावर आपण दोघेही बसू त्याप्रमाणे दोघेही गाढवावर बसून पुढे जाऊ लागले पुढे जात असताना अजून एक माणूस त्यांना भेटला त्यांनी कुंभाराला थांबवले आणि त्याच्या अंगावर खेकसला. तुम्ही मुक्या जनावरांची काळजी कधी घेणार दोघे दोघे त्याच्या पाठीवर बसून त्या गाढवाचं जीव घेणार का कुंभाराला वाटले आपले चुकलेच ते दोघे गाढवावरून उतरले आणि दोघांनी त्या गाढवालाच आपल्या खांद्यावर घेतले आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे बघून फिडी फिडी हसत होते आणि माणूस कोण आणि गाढव कोण कसं ओळखायचं असे म्हणत होते शेवटी कुंभाराने गाढवाला खाली उतरवले आणि तो त्याच्यामागे मुलांसह चालू लागला यापुढे लोक काय म्हणतात हे ऐकून घेतले तरी वागताना मात्र आपल्याला काय वाटते त्याप्रमाणेच आचरण करायचा निर्धार करून तो पुढच्या प्रवासाला लागला.

तात्पर्य: ऐकावे जनाचे पण करावे मात्र मनाला जे योग्य वाटते तेच.

मित्रांनो अशा प्रकारचे कथालेखन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतो. विशेषतः आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे कथालेखन विचारले जाऊ शकतात कथा आधीच दिलेली असते आणि त्यावरून तुम्हाला कथा पूर्ण करायची असते त्यामुळे मी अशी आशा करते की मी हा पोस्ट बनवते त्या तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील अशा पद्धतीच्या प्रचंड पोस्ट आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्या तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल आणि या पोस्ट तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल 

धन्यवाद 

Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी



Post a Comment

Previous Post Next Post