गरुड आणि घुबड | eagle and owl Marathi moral story

 गरुड आणि घुबड | eagle and owl Marathi moral story

गरुड आणि घुबड | eagle and owl Marathi moral story


मित्रांनो आज आपण गरुड आणि घुबडा वर मराठी कथा बघणार आहोत खूप वेळा कथालेखन आठवी नवी दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना विचारले जाते आणि त्यामध्ये फक्त एक साखळीसारखे पॉईंट दिलेले असतात जसे की, गरुड - घुबड - पिल्ले -अपराध

अशा पद्धतीचे पॉईंट्स दिलेले असतात आणि यावरून आपल्याला गोष्ट बनवायची असते तर ह्याच आता चार शब्दांपासून आज आपण गोष्ट बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला


गरुड आणि घुबड | eagle and owl Marathi moral story


एक गरुड आणि एक घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असते . या भांडणाला कंटाळूनच दोघांनीही ठरवले की आतापासून आपण मैत्री निर्माण करूया आणि दोघांनीही मैत्रीची शपथ घेतली आणि मैत्रिणी वागायला लागले आणि एकमेकांच्या पिल्लांना खाऊ नये असे ठरवले जेणेकरून भांडण होणार नाही.

घुबड गुरुडास म्हणाले, गड्या पण माझी पिल्ले कशी असतात हे तुला ठाऊक आहे ना ठाऊक नसेल तर ती एखाद्या पक्षाची आहेत असे समजून तो त्यांना खाऊन टाकशील अशी मला भीती वाटते.

गरुड म्हणाला ,खरेच तुझी पिल्ले कशी असतात हे मला मुळीच ठाऊक नाही.

घुबड म्हणाले, ऐक तर माझी पिल्ले फार सुंदर असतात त्यांचे डोळे सुंदर पिसे सुंदर सगळेच काही सुंदर असते या वरणावरून माझी पिल्ले कोणतीही तुला सहज समजेल.

आणि काही दिवसानंतर एका झाडाच्या डोळ्यात गरुडास घुबडाची पिल्ले सापडली त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला किती घाणेरडे कंटाळवाणी आणि खूप पिल्ले आहे ही आपली पिल्ले फार सुंदर असतात म्हणून घुबडाने आपल्याला सांगितले होते . त्यामुळे ही नक्कीच घुबडाची पिल्ले नसणार आणि यांना मारून खाण्यास काहीच हरकत नाही असे म्हणून त्याने पिल्लांचा फरशा उडवला.

आपले पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले गड्या माझी पिले तूच मारून खाल्लीस ना असे मला वाटते 

गरुड म्हणाला ,मी खाली पण तो माझा दोष नव्हे.

तू आपल्या पिल्लांचे जे खोटे चे वर्णन केले त्यामुळे मला ओळखताना गडबड झाली इतकी कुरूप पिले घुबडाची नसतील दुसऱ्या एखाद्या पक्षाची असतील असे समजून मी ती मारून खाली यात माझा काय अपराध आहे बरं.


तात्पर्य : स्वतः संबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.


मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही कथा तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल आणि तुम्हाला आणखी कथा हवे असतील तर तुम्ही आपल्या वेबसाईटवर बघू शकता मी सर्व प्रकारच्या कथा इथे उपलब्ध करून दिल्या आहेत

धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठीPost a Comment

Previous Post Next Post