Elderly advise Marathi story | vadilancha salla | वडीलकीचा सल्ला मराठी गोष्ट

Elderly advise Marathi story | vadilancha salla | वडीलकीचा सल्ला मराठी गोष्ट 

Elderly advise Marathi story | vadilancha salla | वडीलकीचा सल्ला मराठी गोष्ट


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत

लग्न - भांडण - वृद्ध व्यक्ती - विहीर भरून तेल

चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला 

वडीलकीचा सल्ला 

एक होतं गाव त्या गावात एका मुलाचे लग्न ठरले मुलगी होती शेजारच्या गावातील तेव्हा शेजारील गावात लग्न होणार होते दोन्ही घरी लग्नाची मोठी तयारी चालू होती लग्नात भांडणे व मान अपमान होऊ नये म्हणून लग्नाला वऱ्हाड कोणीही म्हाताऱ्या माणसांना आणायचे नाही असे तरुण माणसांनी ठरवले.

लग्नाला जाण्यासाठी गाड्या तयार झाल्या ठरल्याप्रमाणे घरातील मोठी माणसे सोडून बाकी सर्वजण शेजारील गावाकडे निघाले गावात एक शहाणी समंजस साजवा होते ते हळूच आधी शेजारील गावात गेले व तेथील मंदिरात वेश बदलून राहिले.

ठरल्याप्रमाणे वराकडील पाहुणे मुलीच्या घरी आले त्यांचे मुलीच्या घरात माणसांनी मोठ्या थाटाने स्वागत केले. मुलीच्या कडील माणसांच्या ध्यानात आले की ह्या पाहुण्यांच्या मध्ये एकही वयस्कर माणूस नाही ही गोष्ट त्यांना बरोबर वाटली नाही म्हणून आता या वराकडे लोकांची थोडी गंमत करावी म्हणून मुलीच्या वडिलांनी वराकडील माणसांना सांगितले की आमच्याकडे मुलीला देण्याआधी एक विहीर भरून तेल वराकडील माणसाने द्यावे.

हे मागणी ऐकल्यावर बराकडील माणसे एकदम आश्चर्यचकित झाले बापरे आता एवढे तेला नावे कुठून सगळेजण आपापसात चर्चा करू लागले घराकडील प्रत्येकाने विचार केला पण कोणाला उत्तर सापडेना काय करावे लग्न मोडावे तर परत गावात गेल्यावर सगळे नाव ठेवणार.

सगळ्यांची तोंडी उतरून गेली ज्याला त्याला वाटू लागले की आपल्याबरोबर कोणीतरी मोठे माणूस आणले असते तर बरे झाले असते.

तेवढ्यात वेश पालटलेले त्यांच्या गावचे आजोबा तेथे आले त्यांनी विचारले का रे बाबांनो लग्न घरात तुम्ही सगळे तोंडे उतरून का बसलात तेव्हा त्यातील एक जण म्हणाला.

काय सांगू तुम्हाला वधू कोळी लोक विहीर भर तेल नजराणा म्हणून मागत आहेत कोठून देणारे एवढं तेल लग्न मोडावे तर परत गेल्यावर गावातील लोक नावे ठेवतील काही सुचत नाही.

आजोबांनी विचारले तुमच्याकडे कोणी मोठे माणूस नाही का सल्ला द्यायला.

नाही हो मुद्दामून त्यांना ओळखले त्याचा आता पश्चाताप होत आहे.

बरे चला मी तुम्हाला सल्ला देतो तसे उत्तर तुम्ही मुलीच्या वडिलांना जाऊन द्या.

म्हणावे आमची तेलाची विहीर भरून तयार आहे ती ओतून घेण्यासाठी तुमची पाण्याची विहीर कोरडी करा.


मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या वेबसाईटवर खूप प्रकारच्या कथा उपलब्ध आहे .ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करतील किंवा तुम्हाला जर कथा वाचायला आवडत असतील तर खूप साऱ्या कथा उपलब्ध आहेत. आठवी, नववी ,दहावीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या कथा खूप वेळा विचारलेल्या असतात तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचे असते त्यामुळे मी अशी आशा करते की या कथा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र -मैत्रिणी सोबत देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल

धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी

Post a Comment

Previous Post Next Post