रम्य पहाट मराठी निबंध : एक प्रसन्न पहाट मराठी निबंध
नमस्कार मित्रांनो रम्य पहाट मराठी निबंध या विषयावर खूप वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो त्यामुळे मी आशा करते की ही पोस्ट तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल तुम्ही पेपरला जायच्या आधी ही पोस्ट एकदा वाचून गेला तर तुम्हाला पेपर मध्ये नक्कीच मदत होईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला रम्य पहाट मराठी निबंध
रम्य पहाट मराठी निबंध | Essay on pahat in Marathi
मी ह्या वर्षीच्या सुट्टीत माझा वर्गमित्र वैभव याच्या गावी जायचे ठरवले वैभवच्या गावी येऊन पोहोचलो तेव्हा बरीच रात्र झाली होती दिवसभर कष्टाची कामे करून गाव शांत झोपले होते वैभवच्या घरात माझे मोठ्या प्रेमाने स्वागत झाले संध्याकाळच्या जेवणासाठी स्वादिष्ट असं भोजन होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण झोपायला गेलो.
सकाळी मला जाग आली तेव्हा सगळीकडे अंधार होता पहाट झालेली नव्हती वैभव च्या घरातील मंडळी मात्र जागी झालेली होती त्या सर्वांची दररोजची कामे शांतपणे चालू होती मी वैभव ला विचारले बाहेर एक फेरी मारून येऊया का लगेच होकार दिला मग पहाटेची भ्रमंती करण्यासाठी मी आणि वैभव घराबाहेर पडलो.
अजून सूर्य उगवला नव्हता दिशा नुकत्याच उजळत होत्या सारा गाव हळूहळू जागा होत होता घरोघरी अंगणात सडा सावन झाडून ही कामे चालू होती वातावरण शांत व प्रसन्न होते मी आणि वैभव मूकपणे चालत होतो शहरात कधी अनुभवायला न मिळणारी इतकी शांतता आणि प्रसन्नता माझ्या मनाला सुखावत होती. गावाकडे येऊन खूप प्रसन्न वाटत होतं सगळं काही आता अंधुक अंधुक दिसत होतं आकाशातील तारे हळूहळू विजू लागले एखादाच तारा आपली तेजस्वी अस्तित्व दाखवत होता.
पूर्वेच्या कडाचे आकाशात केशरी आणि गुलाबी रंगात अशा विविध छटांनी उजळून निघत होते जसे एखाद्या विदूषक रंगीबिरंगी कपडे घालतो तसेच रंगीबिरंगी आकाश दिसत होते आणि हळूहळू पक्षांचा किलबिलाट सुरू झाला. झाडांना देखील पक्षांच्या किलबिल लाट्याने जाग आली अरुणोदय होत होता मनात आले ही रम्य प्रसन्न पहाड जो अनुभवतो त्याचे अंतकरण हे असेच विशाल होते म्हणून तर खेडेगावातून अजूनही मानवतेचे दर्शन घडते त्या प्रसन्न वातावरणात काही काळ रेंगाळून आम्ही परत फिरलो.
आता मी घराच्या दिशेने चालत होतो घराच्या छोट्या अंगणात तुळशी वृंदावना पुढे रांगोळ्यांची शोभा दिसली रानाकडे निघालेल्या गुरांच्या गळ्यातील घंटा वाजत होत्या दूर वळून देवळातील आरत्यांचे मंजूर सुरू कानावर पडत होते. सर्व गाव कामाला लागली होती पण शहरातील धांदल त्यात दिसत नव्हती सगळीकडे प्रसन्नता भरून राहिली होती. असं वातावरण कधी शहराकडे पाहायलाच भेटलं नाही आज ह्या वातावरणात किती सुख आहे किती प्रसन्नता आहे ही समजली गावाकडे आयुष्य खरंच खूप मस्त असतं. पहाटेच्या या आगळ्यावेगळ्या भ्रमंतीने आपण समृद्ध झालो आहोत असे मला वाटले.
रम्य पहाट मराठी निबंध | Essay On Pahat In Marathi
मित्रांनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा निबंध तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये मदत होईल
धन्यवाद
मी अनुभवलेली पहाट मराठी निबंध | Ak ramy pahat in Marathi nibandh
- मी अनुभवलेली पहाट निबंध
- Essay on pahat in Marathi
- रम्य पहाट मराठी निबंध
- Ak ramy pahat in Marathi nibandh
- तुम्ही अनुभवलेली पहाट' तुमच्या शब्दांत वर्णन करा
- पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध
- आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी
- माझा आवडता कलावंत मराठी निबंध