उन्हाळी सुट्टी मराठी निबंध | Essay on summer holidays in Marathi

 उन्हाळी सुट्टी मराठी निबंध | Essay on summer holidays in Marathi

मित्रांनो आपण सर्वांनी उन्हाळ्याची सुट्टीचा अनुभव घेतला आहे परंतु खूप वेळा परीक्षेमध्ये उन्हाळी सुट्टी मराठी निबंध हा विषयावर निबंध विचारला जातो त्यामुळे मी तुमच्यासाठी हा निबंध घेऊन आले आहे आपल्या सर्वांना उन्हाळी सुट्टी निबंध आल्यावर काय लिहायचं हे माहीत असेल परंतु ती कशा पद्धतीने लिहायचं किंवा त्यामध्ये कुठले कुठले पॉईंट्स् टाकायचे जेणेकरून तुम्हाला पैकीचे पैकी मार्क्स मिळतील हे मी आज सांगणार आहे आणि या निबंध मध्ये सर्व पॉईंट्स मी सविस्तरपणे टाकलेले आहेत जेणेकरून तुम्ही हा निबंध पेपरला जाण्याआधी वाचून गेलात तर तुम्हाला पेपर लिहायला सोपे जाईल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला


उन्हाळी सुट्टी मराठी निबंध | Essay on summer holidays in Marathi

आपल्या भारत देशात मुख्यता तीन ऋतू आहेत ते म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा पण या तीन ऋतूतील सर्व शाळकरी मुलांचा आवडता ऋतू म्हणजे उन्हाळा कारण उन्हाळा ऋतू आला की शाळेच्या सुट्ट्या चालू होतात कारण की सर्व शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिल्या जातात. पहिली ते बारावीच्या मुलांना शंभर टक्के उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिल्या जातात . चला तर मग सुरुवात करूया याच आपल्या आवडत्या उन्हाळी सुट्ट्या या विषयावर निबंध.


उन्हाळी सुट्टी मराठी निबंध

उन्हाळी सुट्टी हा सर्वच शाळकरी मुलांसाठी स्वतःच्या आणि आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात कारण या उन्हाळ्यामध्ये शाळेला महाविद्यालयांना सुट्टी दिली जाते मग अभ्यासाचे टेन्शन नाही ना कुठल्या परीक्षेचा ताण त्यामुळे आमचे मानसिक स्थिती शांत असते काही मुले उन्हाळी सुट्ट्या आपल्या पद्धतीने घालवतात पण मी यावेळेस उन्हाळी सुट्ट्या माझ्या मामाच्या घरी घालवणार आहे कारण वर्षभर अभ्यास परीक्षा या ताना मुळे कंटाळा आल्यासारखे वाटत आहे.

आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे एक आराम करण्याची वेळ आपल्या आवडते मैदानावरचे खेळ खेळायची वेळ मी दरवर्षी उन्हाच्या सुट्ट्यांमध्ये आजी-आजोबांकडे म्हणजेच मामाकडे जाते म्हणून कदाचित उन्हाळा ऋतू मला खूप आवडतो उन्हाळा ऋतू मध्ये वाढलेला भयंकर तापमान त्याच बरोबर येणारी उन्हाळी सुट्टी ही मला खूप आनंददायक वाटते.

मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये टिप्पर का पाणी, क्रिकेट ,खो खो ,कॅरम यासारखे मैदानी खेळ खेळते. कडकऊन आणि त्यात थंडी काहीतरी पेय किंवा आईस्क्रीम खाण्यात वेगळीच मजा असते.

उन्हाळ्याच्या सुट्टीत रस्त्याने गारीगार वाले जातात मला गारीगार प्रचंड आवडते मी खूप गाडीगार खाते. माझे बाबा गारीगार खायला माझ्याकडे दररोज पैसे देतात.

गुल्फी गारेगार उसाचा रस आंबे यासाठी मी उन्हाळ्याची प्रचंड वाट पाहत असते. मला उन्हाळ्यात सर्वात जास्त आवडते ते म्हणजे आंबे कारण उन्हाळ्यामध्ये आंबे पिकलेले असतात आणि आंबा हा माझ्या सर्वात आवडीचा विषय आहे. बाहेर काढायचे ऊन असते आणि घरामध्ये थंड हवेत फॅन कुलर अथवा येथील खाली बसून टीव्ही बघण्याची मज्जाच वेगळी असते परंतु जेव्हा फॅन कुलर एसी गरम हवा मारायला लागते तेव्हा आम्ही सर्वजण झाडाखाली जाऊन बसतो.

माझी मामाची गाव राहुरीला आहे जाण्यासाठी बसने प्रवास करावा लागतो. मी वर्षभरातून खूप वेळ मामाच्या घरी जाते परंतु उन्हाळ्यात मामाच्या घरी जाण्याची मज्जाच वेगळी आहे कारण की मामाच्या घरी खूप सारे आंब्याची झाडे आहेत. कडक उन्हाळ्यात मी व माझ्या मामाची मुले घरा शेजारीच असणाऱ्या चिकूच्या भागांमध्ये बैठे खेळ खेळत असतो.

वर्षभर अभ्यास करून कंटाळलेल्या शेतीत काहीतरी नवीन म्हणून उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्ही नवीन गोष्टी शिकतो.

आम्ही युट्युब वरून "Gauris Craft And Creation" या चैनल वरून कागदापासून वेगवेगळे आकार घरात शोभेच्या वस्तू कशा बनवायच्या ,घर स्वच्छ करणे किंवा झाडांच्या कुंड्या कशा रंगवणे हे त्या चॅनेल वरून शिकतो.

आम्ही त्या चैनल वर पक्षांना उन्हाळ्यात पाणी ठेवायचं हे बघितलं आहे. तू चैनल एक खूप चांगला चैनल आहे असे मला वाटते आणि त्या चैनल वरून बघून आम्ही उन्हाळ्यामध्ये फुटलेल्या कपांमध्ये ग्लासमध्ये प्लेटिंग मध्ये घरावर जाऊन पाणी ठेवतो जेणेकरून पाणी पक्षांना प्यायला मिळेल आणि त्या पाण्यासोबतच थोडे दाणे देखील ठेवतो.

मामाचे गावचे डोंगरांच्या मध्ये आहे त्यामुळे आम्ही ज्या दिवशी ऊन कमी असेल त्या दिवशी डोंगर चढायला देखील जातो. कुणाच्या सुट्टीत आम्ही खूप धमाल करतो आणि जेव्हा उन्हाळ्यात सुट्टी संपून मी घरी येते तेव्हा मामा येताना मला खूप छान छान नवीन कपडे घेतात.

आणि उन्हाळ्यात फळांचा राजा आंबा हा येतो त्यामुळे आम्ही आंब्याचा मनसोक्त आनंद घेतो आम्हाला सर्वांना आंबे खूप आवडतात तसेच कैऱ्या चीनचा पेरू हे सुद्धा उन्हाळ्यातच येतात आणि ते खाण्याची मज्जाच वेगळी असते.

उन्हाळ्याच्या ऋतूत लग्न समारंभ खूप मोठ्या प्रमाणात होत असतात दरवर्षी आम्ही चार-पाच लग्नात पण जात असतो माझे लहान बहिण भाऊ भातुकलीचा खेळ खेळतात आणि मी सुद्धा त्यांच्यामध्ये लहान मुलासारखे खेळ खेळत असतो उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या आवडीची अनेक फळे बाजारात येतात कलिंगड टरबूज द्राक्ष यांसारखी मनातृप्त करणारी फळे उन्हाळ्या ऋतूत मध्ये येतात.

संध्याकाळच्या टायमाला ऊन उतरले की आम्ही भावंड सर्वजण वावरामध्ये क्रिकेट खेळायला जातो आणि मैदानी खेळांचा मनसोक्त आनंद लुटतो.

रात्री झोपायचे वेळेस आजी आम्हाला त्यांच्या काळातील गोष्टी सांगते किंवा देवाच्या किंवा ऐतिहासिक गोष्टी आम्हाला आजी सांगते त्या गोष्टी ऐकत ऐकतच आम्ही सर्वजण झोपी जातो आणि अशाच माझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या खूप आनंदात जातात.

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे खरच मौजमजाची असते खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात मी तर या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये स्वयंपाक करायला देखील शिकणार आहे माझा मोठा भाऊ उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काही ना काही तरी नक्की शिकत असतो यावर्षी मी देखील उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये स्वयंपाक शिकणार आहे आणि मेहंदी काढायची शिकणार आहे उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद तर मिळतोच पण सोबत नवनवीन कौशल्य शिकायला सुद्धा मिळते.

तसेच परीक्षांचा निकाल सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लागतो तो म्हणजे एक मे या दिवशी मग परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाल्यास साईबाबा आणखी लाड करतात म्हणून मी माझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या खूप महत्त्वाच्या आहेत याच वर्षी नव्हे तर अनेक वर्षांचा म्हणजे लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या गोड आठवणींचा संग्रह म्हणजे माझ्या "उन्हाळ्याच्या सुट्ट्या".

म्हणून मला उन्हाळा ऋतू खूप आवडतो आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुद्धा. मी या सुट्ट्यांचा नक्कीच चांगला फायदा करून घेऊन आनंदमय आणि त्यांना मुक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या माझ्या कुटुंबासोबत घालवण्याचा प्रयत्न करेन

धन्यवाद मित्रांनो

Related searches : 

  • Essay on summer holidays in Marathi
  • उन्हाळी सुट्टी मराठी निबंध 
  • essay on summer holidays in marathi
  • essay about summer activities
  • marathi essay on summer vacation
  • essay on summer season in marathi
  • summer holiday essay in marathi
  • summer holidays essay in marathi

Post a Comment

Previous Post Next Post