गरुड पक्षी आणि मनुष्य मराठी बोधकथा | Garud Pakshi Ani Manushya Marathi BodhKatha
मित्रांनो आता उन्हाळा सुरू होत आहे आणि सर्वांना सुट्ट्या लागल्या असतील त्यामुळे सर्वजण मोबाईल मध्ये गोष्टी ऐकत असतील तुम्ही देखील गोष्टींच्या शोधात असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल कारण की यामध्ये मी पाच ते सहा गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या देखील तात्पर्यासोबत सांगितले आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेखाला.
गरुड पक्षी आणि मनुष्य मराठी बोधकथा | Garud Pakshi Ani Manushya Marathi BodhKatha
एका मनुष्याने जाळ्यात एक गरुड पक्षी पकडला व त्याचे पंख कापून त्याच साखळीने एका खांबास बांधून ठेवले शेजारी दुसरा एक शिकारी मनुष्य राहत असे त्याच त्या पक्षाचे ते हाल पाहून त्याची दया आली मग त्याने पैसे भरून तो गरुड विकत घेतला आणि त्याचा चांगला प्रतिपाळ केला पुढे त्या पक्षाचे पंख वाढल्यावर त्याने त्यास सोडून दिले गरुडाने उंच भरारी मारली आणि रानात जाऊन एका ससा पकडून तो त्या माणसास कृतज्ञेचे चिन्ह म्हणून आणून दिला.
तिकडून एक कोल्हा चालला होता त्याने तो प्रकार पाहून गरुडास म्हटले गड्या मी जर तुझ्या जागी असतो तर हा ससा मी त्या पहिल्या माणसास नेऊन दिला असता कारण त्याच्यापासून आपणास वय आहे त्याच्याशी मैत्री करावी आणि ते भय टाळावे हा शहाणपणा होईल त्या माणसाने तुला सोडून तुझा प्रतिपाळ केला त्याच्यापासून तुला तसदी पोहोचवण्याचा संभव नाही पण ज्याने तुला पहिल्याने पकडून बांधून ठेवले होते त्याच्याकडून मात्र तुला पुन्हा त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून हा ससा त्यास देऊन त्याच्याशी मैत्री करणे अधिक शहाणपणाचे झाले असते त्यावर गरुड म्हणाला गड्या हा तुझा उपदेश कोल्ह्याला शोभण्यासारखाच आहे पण माझे मत विचारशील तर ज्याने आपल्यावर दया केली त्याला कृतज्ञता दाखवावी व त्यांच्यापासून आपणास उपद्रव होण्यास संभव आहे त्यांच्याशी सावधगिरीने वागावे हेच खरे शहाणपण होय असे मला वाटते.
मराठी बोधकथा तात्पर्य : जो थोर आहे त्यांच्याशी थोराप्रमाणेच वागले पाहिजे मग त्यांच्यापासून आपणास त्रास पोहोचवण्याचा संभव असो वा नसो.
मित्रांनो मी अशी आशा करते की ह्या बोधकथा तुम्हाला आवडले असतील आणि जर या बोधकथा आवडल्या असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते
धन्यवाद