सवय मराठी गोष्ट | habit Marathi moral story

 सवय मराठी गोष्ट | habit Marathi moral story

सवय मराठी गोष्ट | habit Marathi moral story


नमस्कार मित्रांनो आज आपण आणखी एक कथा लेखन करणार आहोत आणि आपल्या कथेचे नाव आहे सवय मराठी गोष्ट. नववी दहावीच्या परीक्षेमध्ये खूप वेळा कथालेखनचा प्रश्न आलेला असतो खूप वेळा नव्हे तर शंभर टक्के हा प्रश्न आलेला असतो आणि त्यामध्ये विविध प्रकारच्या कथा दिलेल्या असतात किंवा तुम्हाला पॉईंट्स दिलेला असतात

 जसे की, पोपट - संस्कृती- भाषा - पिंजरा - मुक्त

यावरून तुम्हाला कथा लिहायची असते मी अशा पद्धतीच्या खूप कथा आपल्या वेबसाईटवर लिहिल्या आहेत त्या तुम्ही नक्की बघू शकता जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये मदत होईल चला तर मग आपल्या या कथेला सुरुवात करूया.


सवय मराठी गोष्ट | habit Marathi moral story


एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायला प्यायला मिळत असते व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुक केले जाईल पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई.

आणि एके दिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या मालकाने पोपटाला खायला देण्यासाठी पिंजऱ्याचे दार उघडले होते व त्याच्या हातून ते तसेच उघडे राहिले होते माणसाला अचानक काही काम आल्यानंतर ते दार उघडे ठेवून निघून गेला पोपट पिंजराच्या बाहेर निघून गेला.

पण लहानपणापासूनच पिंजऱ्यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते किंवा त्यांचा मित्र मानत नव्हते.

पिंजऱ्यात आयटी खाण्याची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीही सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला.


तात्पर्य :जास्त काळ पारतंत्र्यात म्हणजेच गुलामगिरीत राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरून राहते मग परक्याची भाषा संस्कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अंगात जिद्द राहत नाही परक्या संस्कृतीचे चांगले काही घेताना आपल्या संस्कृतीचे विस्मरण होऊन न देणे हाच खरा शहाणपणा.


मित्रांनो ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यास करण्यात मदत होईल किंवा त्यांनाही कथा वाचण्यास आवडत असेल तर त्यांनाही कथा वाचता येईल

 धन्यवाद


Related searches:

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी
Post a Comment

Previous Post Next Post