How God looks Marathi story | Dev kasa disato | देव कसा दिसतो
मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत
देव दिसणे -वृद्ध व्यक्ती - उपाशी - लाडू
चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला
देव कसा दिसतो
छोटासा माधव प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता एके दिवशी शाळेतील वर्गशिक्षिकेने मुलांना ध्रुव बाळाची गोष्ट सांगितली. ध्रुव बाळाला रानात देव भेटला आहे त्याला उमगले माधवाने बाईंना विचारले ध्रुव किती मोठा होता बाई म्हणाल्या तुमच्या वयाचा होता माधवने विचार चक्र सुरू झाले मला देव दिसेल का पण रान कसे असते शाळेतील एक मोठ्या मुलाने सांगितले रानात खूप मोठी झाडे असतात दुसऱ्या मुलाकडून समजले गावाजवळ एक मोठा पार्क आहे तेथे खूप झाडे आहेत माधवने गृहीत धरले तेथेच नक्की देव भेटेल.
एका रविवारी मित्रा बरोबर पार्कमध्ये सहलीला जातो असे घरी सांगितले आईने एका पिशवीत लाडू व सरबताची बाटली दिले.
माधव एकटाच चालत चालत गावाबाहेरील पार्क मध्ये पोहोचला चालून थकल्यामुळे एका झाडाखाली बसला भूक लागल्यामुळे लाडू खाण्याकरता पिशवी उघडू लागला तितक्यास समोरच्या झाडाखाली त्याला एक वृद्ध गृहस्थ दिसला खूप भुकेलेला वाटत होता. माधवने एक लाडू त्याला नेऊन दिला वृद्धाने लाडू घेतला व माधव कडे बघून स्मित हास्य केले माधवला हे स्मित हास्य खूप सुंदर दिसले.
हे हास्य परत बघण्याची त्याला इच्छा झाली त्याने वृद्धाला सरबत नेऊन दिले यावेळी वृद्ध अधिकच सुंदर हसला संध्याकाळ होईपर्यंत माधव वृद्धाला लाडू सरबत देत होता वृद्धाच्या चेहऱ्यावरील हास्य अधिकच खुलत होते अंधार पडू लागल्यामुळे माधव घरी जाण्यास निघाला वृद्धाने त्याला प्रेमाने पोटाशी धरले माधव खूप आनंदीत झाला.
घरी पोहोचतात आईने त्याची आनंदी मुद्रा बघून विचारले सहल छान झाली वाटतं माझं उत्तरला की आज देवाबरोबर फराळ केला किती छान हसत होता तो असे हास्य मी आजवर कधीच बघितले नव्हते.
पार्कमधील वृद्ध देखील आनंदात घरी गेला .
मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या वेबसाईटवर खूप प्रकारच्या कथा उपलब्ध आहे .ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करतील किंवा तुम्हाला जर कथा वाचायला आवडत असतील तर खूप साऱ्या कथा उपलब्ध आहेत. आठवी, नववी ,दहावीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या कथा खूप वेळा विचारलेल्या असतात तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचे असते त्यामुळे मी अशी आशा करते की या कथा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र -मैत्रिणी सोबत देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल
धन्यवाद
Related searches:
वक्ता आणि श्रोता कथा
मराठी कथालेखन
बोधकथा
मराठी कथा
सुंदर कथा
गोष्ट लेखन
कथालेखन
कथालेखन मराठी नववी
मराठी कथा
कथालेखन मराठी दहावी
कथालेखन मराठी आठवी
कथालेखन मराठी pdf
शॉर्ट कथा लेखन इन मराठी
Short कथालेखन in Marathi
कथालेखन मराठी