सीमेवरील जवानाचे मनोगत मराठी | essay on soldiers in Marathi
नमस्कार मित्रांनो आज आपण "सीमेवरील जवानाचे मनोगत" हा मराठी निबंध बघणार आहोत. हा निबंध खूप वेळा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जे पेपर होतात त्यामध्ये विचारला जातो. म्हणजे तुमचं पहिल्या सत्राचे जेव्हा पेपर असतात तेव्हा हा निबंध त्यामध्ये शक्यतो विचारला जातो त्यामुळे पेपरला जातान हा निबंध एकदा वाचून जा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये मदत होईल. आणि मी अपेक्षा करते की हा निबंध तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या लेखाला.
सीमेवरील जवानाचे मनोगत मराठी | essay on soldiers in Marathi
"सीमेवरील जवानाचे मनोगत"
दोन वर्षे झाली, घर सोडून. तेव्हा सुद्धा फक्त घरी पाच दिवस होतो .पण इकडे सीमेवर अचानक गडबड झाली आणि मंजूर रजा रद्द झाली .तातडीचा हुकूम निघाला होता .डोळे पूजतच घरच्यांचा निरोप घेऊन मी घर सोडले आणि दोन दिवस खर्च प्रवास करत मी सीमेवरील छावणीवर येऊन दाखल झालो. वाटेतच जनतेने अत्यंत आपुलकीने वागवले. तेव्हा मला खूप दिलासा मिळाला.
तेव्हापासून मनात नुसती खंत लागून राहिली आहे की पाच दिवसात परत आलो इकडे. असं वाटते कधी एकदाच घरी जातो आणि आईला डोळे भरून बघतो. तिकडून इकडे आल्यापासून आजपर्यंत मी या मोक्याच्या ठिकाणी पहारा देतो आहे. डोळ्यात तेल घालून आम्हाला दुर्बीण लावून आम्हाला सतत पहारा द्यावा लागतो. शत्रूच्या ठिकाणी थोडीशी हालचाल दिसली तरी तूम्हाला त्याची नोंद घ्यावी लागते डोळ्यात तेल घालून आपल्या प्रदेशाचे रक्षण करावे लागतात अशा वेळी मनात येते की का आलो मी या सीमेवर?माझ्या गावी मी सुखी नव्हतो का?
आजही मला माझ्या गावातले ते लहानपणीचे दिवस आठवतात खाऊन पिऊन सुखी होतो आम्ही पण कुटुंब वाढलेली केवळ शेतीवर भागेना . घराबाहेर पडणे आवश्यक झाले लहानपणापासून सैनिक होण्याचे स्वप्न मनात होते गावातील बऱ्याच जणांनी सैनिक होऊन मोठी कामगिरी बजावली होती आपणही आपल्या देशासाठी असाच पराक्रम करावा या हेतूने उत्साहाने सैन्यात भरती केली. दीड दोन वर्ष मी खूप खडतर शिक्षण घेतलं खूप शारीरिक सक्षम झालो आणि मग मला भरती येण्याचा मान मिळाला.
युद्धभूमीवर गेल्यावर कोणत्याही क्षणाचा भरवसा नसतो कोणत्याही क्षणी प्राण गमावण्याची शक्यता अधिक असते तरीही आम्ही आमचा देश आमचे बांधव असे स्वतःला बजावत प्राणपणाने हल्ले पडतो फक्त आमच्या शहीद होण्यामुळे देशाचे रक्षण होत असेल तरी आमच्या मुलाबाळांना कुटुंबीयांना मदत हद्द द्या त्यांना आपले म्हणा त्यांना वाऱ्यावर सोडू नका एवढीच विनंती.
इथे सीमेवर खूप थंडी असते अशावेळी काही क्षण कामाचा कंटाळा येतो पण लगेच कर्तव्याची जाणीव होते आणि पुन्हा कामाला लागतो महिन्यातून एखादा दुसरी घरचे पत्र येते व घरची खुशाली कळते परवा मकर संक्रांतीला अनेकांनी तिळगुळ पाठवले राखी पौर्णिमेला काही भगिनी राख्या देतात किंवा पाठवतात दिवाळीचा फराळ ही आला थंडी सुरू झाली तेव्हा अनेक माता भगिनींनी स्वेटर मपलर विणून पाठवले तेव्हा खूप समाधान वाटले आपण एकटे नाही आपल्या सोबत आपला भारत देश पूर्ण आहे आपल्या मागे आपला पूर्ण देश उभा आहे .आता आम्ही आमच्या घरापासून दूर आहोत पण त्याची चिंता नाही वाटत आमचा देश आमच्या घराची माझ्या मुलाबाळांची आई वडिलांची काळजी घेईलच आणि मी माझ्या देशाच्या सीमेची काळजी घेईलच.
सीमेवरील जवानाचे मनोगत मराठी | सीमेवरील जवानाचे सैनिकाचे मनोगत मराठी निबंध
मित्रांनो मी अपेक्षा करते की हा निबंध तुम्हाला आवडला असेल आणि या निबंध मध्ये काही चुका झाल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून मला प्रोत्साहन भेटते पुढचा लेख लिहायला. आणि तुम्ही हा निबंध तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत देखील शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील अभ्यास करायला मदत होईल
धन्यवाद
सीमेवरील जवानाचे मनोगत मराठी | सीमेवरील जवानाचे सैनिकाचे मनोगत मराठी निबंध
- आत्मकथनपुढील मुद्द्यांच्या आधारे सीमेवरील जवानाचे मनोगत लिहा
- सीमेवरील जवानाचे सैनिकाचे मनोगत मराठी निबंध
- सिमेवरील जवान चे मनोगत मराठी निबंध
- एका जवानाचे मनोगत मराठी निबंध
- मी भारतीय सीमेवरील जवान सैनिक बोलतोय