माझी आजी मराठी निबंध | Majhi aji Marathi nibandh

माझी आजी मराठी निबंध | Majhi aji Marathi nibandh

नमस्कार मित्रांनो आज आपण माझी आजी या विषयावर निबंध बघणार आहोत आजी म्हणलं की सर्वांनाच आपले आजी आठवते आजी नावातच सर्व काही साठलेलं आहे चला तर याच आजी बद्दल बोलूया आणि आपल्या निबंधाला सुरुवात करूया.

 माझी आजी मराठी निबंध | majhi aaji nibandh in marathi


आजी या शब्दातच पूर्ण विश्व सामावला आहे. ज्या घरात आजी-आजोबा आहेत त्या घरात घराला घरपण आहे. खरंच आजी ही खूप महत्त्वाची असते. माझी आजी मला गोड गोड करून खायला घालते. माझी आजी माझी खूप काळजी घेते.

मला अजूनही तो दिवस आठवतो ज्या दिवशी माझा पहिलीचा पहिला दिवस होता मी पहिल्या वर्गात प्रवेश घेतला होता आणि त्या दिवशी दिवसभर माझी आजी माझ्यासोबत शाळेत बसलेली होती. खरंच आजी किती ग्रेट असते ना. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की आजी पापड्या बनवते कुरडया बनवते आम्हाला जे जे आवडतं वर्षभर ते सर्व उन्हाळ्यात आजी बनवते.

आजी मला शाळेत जाताना लांबपर्यंत जाऊ तर टाटा करत असते. आजी सकाळी मम्मीला मदत करते. आज संध्याकाळी तुळशीपाशी बसून तुळशीचा दिवा लावून आम्हाला सर्वांना भावंडांना शुभम करोति म्हणायला लावते. आजी खूप छान छान गोष्टी आम्हाला सांगते. रात्री झोपताना आजीच्या गोष्टी शिवाय कधी झोपच लागत नाही.

माझी आजी तेव्हाच्या काळात सातवी शिकलेली आहे त्यामुळे माझ्या आजीला मराठी व इंग्रजी दोन्ही भाषा सहजपणे वाचता लिहिता येतात. माझी आजी अभ्यासात मला खूप मदत करते कारण की तिला लिहिता वाचता येते. मला अजूनही आठवतं जेव्हा मी चौथीला होते तेव्हा माझी स्कॉलरशिप चे पेपर होते तेव्हा आजी माझ्या दररोज संध्याकाळी अभ्यास घ्यायची. आईला कामातून वेळ भेटत नसतो त्यामुळे आजी खूप वेळ माझा अभ्यास घेत असते आणि माझ्याकडे लक्ष देत असते. मला बटाट्याची चटणी बनवायला आजीने शिकवली आहे.

माझी आजी खूप सुगरण आहे माझ्या आजीजवळ खूप झाले पण तरी माझी आजीला सर्व स्वयंपाक येतो. माझी आजी माझी व माझ्या भावंडांची खूप काळजी घेते. माझी आजी मला फार फार आवडते.

माझी आजी मराठी निबंध | Majhi aji Marathi nibandh

मित्रांनो हा निबंध पहिली ते चौथीच्या मुलांसाठी आहे आणि जर हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील हा निबंध शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यास करण्यात मदत होईल

 धन्यवाद

Related searches: 

  • माझी आजी निबंध मराठी 10वी
  • माझी आजी निबंध मराठी 
  •  My grandmother essay in Marathi
  • माझी आजी मराठी निबंध
  • माझी आजी मराठी निबंध 
  • Essay on My Grandmother in Marathi
  • Majhi aji Marathi nibandh
  • Mazi aaji essay in marathi

Post a Comment

Previous Post Next Post