सुंदर मराठी बोधकथा | Marathi Bodh Katha | Moral Stories For Kids

 सुंदर मराठी बोधकथा : योग्य तात्पर्य सहित | मराठी बोधकथा | बोधकथा मराठी

सुंदर मराठी बोधकथा | Marathi Bodh Katha | Moral Stories For Kids

मित्रांनो आता उन्हाळा सुरू होत आहे आणि सर्वांना सुट्ट्या लागल्या असतील त्यामुळे सर्वजण मोबाईल मध्ये गोष्टी ऐकत असतील तुम्ही देखील गोष्टींच्या शोधात असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल कारण की यामध्ये मी पाच ते सहा गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या देखील तात्पर्यासोबत सांगितले आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेखाला.


१. मराठी बोधकथा : गरीब शेतकरी

एक गरीब शेतकरी होता त्याच्याकडे थोडीशी जमीन होती आणि त्याच जमिनीत पीक घेऊन तो आणि त्याचे कुटुंब घाम गाळून कष्ट करत होते आणि आपल्या घरचा भागवत होते जमीन कमी असल्यामुळे त्याचा फक्त थोड्याच गरजा भागत होत्या आणि याच कारणामुळे तो नेहमी दुखी असेल त्याला कायम वाटायचं की आपल्याला इतरांप्रमाणे जास्त जमीन असावी त्यासाठी तो सारखे महत्त्वाचे की मला भरपूर जमीन मिळाली तरच मी सुखी होईल तो नेहमी देवाकडे मागणी करत असे की देवा मला बाकीच्यांसारखी जास्त जमीन दे. देवाने ही एक दिवस त्याला दर्शन देण्याचे ठरवले.

एक दिवस तू सकाळी जागा झाला आणि समोर बघतो तर काय देऊ भाग त्याला खूप आनंद झाला आणि आपली इच्छा पूर्ण होईल असे त्याला वाटले त्याने देवाला नमस्कार करून विनंती केली की देवा मला भरपूर जमीन मिळू दे देवाने सांगितले तू आता पळायला सुरुवात कर सूर्यास्त होईपर्यंत तू जेवढ्या जमिनीला फेरी मारून इथे येऊन पोहोचेल तेवढे जमीन तुझी होईल असे बोलून देव अदृश्य झाला शेतकऱ्याला खूप आनंद झाला.

शेतकऱ्याने देवाने सांगितल्याप्रमाणे पळायला सुरुवात केली पण जास्त जमीन मिळवायची त्याची हाव काही सुटत नव्हते त्यामुळे खूप दूरच्या जमिनींना वळसा घालत तो कसातरी सूर्यास्तापर्यंत मूळ जागी आला पण दिवसभरात धावत राहिल्यामुळे तो एवढा थकला होता की तिथे पोहोचल्या बरोबर त्याला उलटी सुरू झाली आणि तो खाली पडला व जागच्या जागी मरण पावला ते पाहून देव पुन्हा आले आणि देव म्हणाला, आता जेवढ्या जमिनीवर पडला आहे तेवढ्या जमिनीची त्याला वास्तविक गरज होती अशा प्रकारे शेतकरीला जमीन मिळाली नाही परंतु शेतकऱ्याचा जीव गेला . देवाने त्यास पुन्हा जिवंत केले व विचारले आता तुला हवी का जमीन तेव्हा शेतकरी बोलला मला क्षमा करा इथून पुढे मी खूप कष्ट करणे आणि स्वतःचे जीवावर जमीन घेईन देव प्रसन्न होऊन अदृश्य झाला.

मराठी बोधकथा तात्पर्य:

 १.अति हाव हा विनाशाला निमंत्रण देतो.

२.अति तेथे माती


२. मराठी बोधकथा: राजा आणि संत

एका जंगलामध्ये दोन संत राहत होते एकांत तापल्या तपश्चर्येत मग्न राहत होते. कधीतरी यात्रेकरू तिथून जायचे तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असतात. त्याच यात्रेकरू कडून तेथील राजाला त्या दोन संतांची माहिती मिळाली राजा त्या दोघांना भेटण्यास निघाला जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्यांनी आपला चांगुलपणा पाहिला तर तो आपणाला भेटण्यास येईल त्याचबरोबर अनेक माणसे येतील त्या माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व आशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपण ध्यान साधना करू शकणार नाहीत.

राजा आम्हाला दोघांना साधा माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजा व काही माणसे तिथे पोहोचले तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाथा काठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते पहिल्या संताने दुसऱ्याला म्हणले तू स्वतःला कोण समजतोस मी इतके ज्ञान मिळवले आहे की तू ते सात जन्मातही मिळू शकणार नाही दुसरा संत त्यावर म्हणाला अरे तू तर पक्का खोटारडा आहेस तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलांना फसवू शकशील पण मला नाही.

तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे राजाने व राजा बरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधुसंत तर सामान्य माणसांप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधुसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले राजावर आलेले लोक जाताना दोन्ही संतांकडे रागाने पाहिले. आणि दोन्ही संतांनी एकमेकांकडे बघून स्मित हास्य केले व गळाभेट घेतली दोन्हीही साधू आपल्या साधने मध्ये मग्न झाले.

मराठी बोधकथा तात्पर्य: चांगली गोष्ट घडून आणण्यासाठी कधी कधी चुकीच्या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.


३. मराठी बोधकथा वाईट : सवयींचा त्याग

एक व्यापारी होता तो जितका व्यवहारी विनम्र आणि मन मिळत होता तितकाच त्याचा मुलगा उद्धट आणि गर्विष्ठ होता त्याला सुधारण्याचे अनेक प्रयत्न फसले गेले एकदा ही गोष्ट त्याने एका मित्राला सांगितले मित्र म्हणाला त्याला माझ्याकडे काही दिवस राहण्यासाठी पाठवून दे मी तुझ्या मुलाला ठिकाणावर आणून दाखवेन.

त्या व्यापाराचा मुलगा मित्राच्या घरी राहण्यास गेला त्याच्या वडिलांच्या मित्रांनी त्याला अतिशय चांगली वागणूक दिली एकदा ते त्याला बागेत फिरवायला घेऊन गेले असता एक फुट उंचीचे रोप त्याला उपटण्यास सांगितले मुलाने ते रोप सहजपणे उकडले त्यानंतर त्याने मुलाला सहा फुट उंचीचे रोप उपटण्यास सांगितले मुलाला ते उपटण्यास खूप ताकद लावावे लागले शेवटी ते एका उंच वृक्षा जवळ आले आणि म्हणाले तो वृक्ष उपटून टाक.

मुलाने ते शक्य नसल्याचे सांगितले त्यावेळी मित्रांनी मुलाला उपदेश केला तो म्हणजे असा की आपण एखाद्या वाईट कामाला सुरुवात करत असतो तेव्हा त्यापासून दूर जाणे शक्य असते पण मात्र त्या कामात जर आपण खोलवर गुंतून गेलो की आपल्याला त्यापासून सुटका करणे अशक्य असते वाईट सवयी वाईट वर्तनाचे सुद्धा असेच आहे जोपर्यंत सहज शक्य आहे तोपर्यंत वाईट वर्तन किंवा सवय सोडलेली चांगली असते मुलाला त्याच्या मित्र काकांचा उद्देश सहजपणे लक्षात आला व त्याने त्याचे वागणे बदलले चांगला वागायला लागला.

मराठी बोधकथा तात्पर्य: वाईट सवयी बाळगण्यापूर्वीच त्याची निर्मूलन केले पाहिजे.


४.मराठी बोधकथा : बळी तो कानपीळी

एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा खूप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्य कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या गोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले.

ठरल्यावेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. पहिल्यांदी सहानी पुढे होऊन कबुली दिली मी फार गरीब कोकरांना ठार मारलं एवढेच नव्हे तर फार भूक लागल्याने एका धनगरालाही ठार मारून खाल्लं. त्यावर न्यायाधीश महाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले एखाद्या सामान्य प्राण्यांनी अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता.

पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात मूर्ख बकऱ्यांनी एकच धनगर खाना हा काही मोठा अपराध नाही. या निकालामुळे हिंस्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली यानंतर वाघ चित्ता स्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबुली दिल्या व कोल्ह्याने वरील प्रमाणेच निकाल दिला शेवटी एका गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले,एका शेतकऱ्याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवा गवत मी खाल्लं आणि त्याबद्दल मला पश्चाताप काय पश्चाताप न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापा मुळे सध्या हा देवाचा खूप झालेला आहे यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे असा निकाल कोल्होबांनी देता सगळ्यांनी मिळून या बिचारा गाढवाला ठार मारले.

मराठी बोधकथा तात्पर्य :बळी तो कान पिळी


५. मराठी बोधकथा: अति तेथे माती

खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बीड नावाचे गाव होते सर्व गावातील लोक खूप सुखी होते ते आपापल्या उद्योगात मन लावून काम करायचे त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळायचे आजूबाजूच्या परिसरातील हे एकमेव गाव होते ज्याने दुष्काळ कधी पाहिला नव्हता.

बीडमध्ये इतर सर्व शेतकरी आणि कामगारांसोबत एक भिकारी सुद्धा राहायचा गावातील लोक इतके संपन्न आणि दयावान होते की भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्याला सुद्धा कधीही उपाशी राहायची वेळ येत नव्हती.

हा भिकारी तर कुठलेच काम करीत नसेल दिवसभर भिक्षा मागून आणणे आणि आराम करणे हेच त्याचे काम एखाद्या दिवशी जर जास्त पेक्षा मिळाली तर दुसऱ्या दिवशी आला परत भिक्षा मागायला जात नसेल.

तसेच या भिकाऱ्याचे दिवसही चांगले जात होते गावातील लोक दयाळू असल्यामुळे ते अडचणीच्या वेळी त्याच्या मदतीला येत होते तरीसुद्धा अधिकारी दररोज देवाकडे प्रार्थना करायचा देवाला म्हणायचं देवा तू सगळ्यांना पाहिजे ते देतोस मीच कोणती अशी चूक केली तुम्हाला धनधान्याने संपन्न का नाही बनवत.

देवाकडे तक्रार करणे हा भिकाऱ्याचा नित्यनेमाचा कार्यक्रम होता त्याच्या तक्रार करण्याला भिकार स्वतःची भक्ती मानायचा त्याला वाटायची की आपण दररोज देवाची आठवण काढतो तरी देव आपल्याला काही देत नाही आणि हे इतर लोक दिवसभरातून क्वचित देवाकडे जातात किंवा महिन्यातून एकदा देवाकडे जातात तरीही त्यांना इतकी संपन्नता?

त्याच्या अशा वागण्याचा आणि तक्रारींचे एक दिवस देवालाही राग आला याला थोडी अक्कल आली पाहिजे म्हणून देवाने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी धनधान्याची संपत्तीची देवता म्हणजेच लक्ष्मी माता यांना त्याची परीक्षा घेण्यासाठी पाठवले. एक दिवस आपला नित्य नियमाप्रमाणे भिकारी भिक्षा मागून झाल्यानंतर दुपारच्या वेळेला एका झाडाखाली येऊन बसला होता आणि सवयीप्रमाणे त्याने देवाकडे गाराने सुरू केले तेवढ्यात तेथे देवी लक्ष्मी प्रकटले की भिकाऱ्याला म्हणाली की मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झाली आहे म्हणून तुला मी हव्या तेवढ्या सोन्याचा मोहरा देणार आहे.

ते ऐकून भिकारी खूप आनंदी झाला पुढे देवी म्हणाले की मात्र एक अट आहे तू घरी पोहोचण्याआधी या मोहरांतील एकही मोर जमिनीवर पडली तर त्यावेळी साऱ्याच मोहरांचे मातीत रूपांतर होईल.

मोहरम बद्दल ऐकून भिकारी त्या मोहरा मिळाल्यानंतर आपले जगणे कसे बदलून जाईल याचा विचार करत होता तो त्याच्या स्वप्नात इतका रंगून गेला की त्याने अटीकडे तेवढे लक्ष दिले नाही त्यांनी लगेच मोरा जमा करण्यासाठी आपली झोळी समोर केली लक्ष्मी मातेने त्याच्याजवळ सोन्याच्या मोहरा टाकायला सुरुवात केली. झोळीत मोहर पडत होती भिकाऱ्याचा आनंद वाढत होता थोड्या मोरा टाकून झाल्या की देवी त्याला विचारायची एवढ्या मोराने तू समाधानी आहेस का त्यावर तो म्हणायचा नाही मला आणखी मोरा हव्यात असे म्हणून आणखी मागायचा.

असंच सुरू राहिलं. एक वेळ अशी आली की आता मोरांचा भार त्याला पेलवत नव्हता तरी तो संतुष्ट नव्हता त्याचा लोक उच्च कोटीला पोहोचला होता आणि त्या लोभाच्याभरात तो देवीने सांगितलेली अट तर विसरलास पण सोबत हेही विसरला की त्याची जोडी फार जुनी झाली होती जी केव्हाची फाटू शकते थोड्यावेळाने तेच झाले भिकाऱ्याची जीर्ण झालेली झोळी एकके ठिकाणी फाटली काही मोरा जमिनीवर पडल्या देवीची अटीप्रमाणे त्याची माती झाली सोबतच झोळीतील साऱ्याच मोहरांची माती झाली आणि भिकारी त्यावर काही बोलेल तोच देवी त्याला तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि अदृश्य झाली आता भिकाऱ्याजवळ फाटलेली जोडी आणि त्या मोरांची माती याशिवाय काहीच नव्हती आपल्या नाव बोटे ठेवत मोठ्या जड अंत करणाने तो घरी परतला.

मात्र त्याला एक नवा साक्षात्कार झाला त्याला त्याच्या चुकीचा दृष्टिकोन लक्षात आला आता तो लोकांच्या फक्त संपन्न ते कडे न बघता त्यांची मेहनत सुद्धा पाहू लागला त्यातच त्याला कळले की सुखी होण्यासाठी मेहनत आणि समाधानाला पर्याय नाही कमी मेहनतीत मिळालेली धन फक्त लोभ वाढवतो म्हणून मग त्याने लोकांची छोटी मोठी कामे करणे सुरू केली आणि भिक्षा मागून जगले बंद केले त्याच्यातील परिवर्तन पाहून गावातील लोकांनाही आनंद झाला.


मराठी बोधकथा तात्पर्य: यश मिळवण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही देवही त्यांच्याच मदतीला येतो जो स्वतःची मदत करतो आणि कुठल्याही गोष्टीत अतिरेक हा विनाशाचे कारण बनते गोष्ट चांगली का असेना मात्र अति झाली की ती मानवासाठी विशासमानच असते.


६. मराठी बोधकथा: आत शिरणारी पावले

जंगलाचा राजा सिंह म्हातारपणामुळे अशक्त आणि दुबळा झाला होता त्याला शिकाराही धड करता येत नव्हती त्याला दोन वेळा धड खायलाही मिळायची पंचायत झाली तेव्हा त्याने जंगलात एक बातमी पसरवली की आपण खूप आजारी आहोत आपल्या राजाचे काहीच दिवस राहिले आहेत अशा समजुतीने जंगलातले प्राणी त्याच्या समाचाराला येऊ लागले सिंह एखादा प्राणी तब्येतीची विचारपूस करायला आला रे आला की त्याच्यावर धडक घालून त्याला खाऊन टाकीन जंगलातील एक कोल्हा मात्र बरेच दिवस सिंहाच्या समाचाराला आला नव्हता एके दिवशी तो आला गुहेच्या बाहेर जरा लांब उभे राहून त्याने विचारले कशी आहे महाराजांची तब्येत सिंह आतून विव्हळत म्हणाला, अजून ठीक नाही तू आज का येत नाहीस आते माझ्याशी जरा गप्पा मारकोला म्हणाला मी नक्कीच आलो असतो पण इथे फक्त गुहेत शिरणाऱ्या पावलांच्या खुणा दिसत आहेत बाहेर पडणारी पावले इथे दिसतच नाही.

बोधकथा तात्पर्य: शहाणा माणूस योग्य वेळेत संकटाची चाहूल ओळखून सावधगिरीने वागतो.


सुंदर मराठी बोधकथा | योग्य तात्पर्य सहित | मराठी बोधकथा | बोधकथा मराठी

मित्रांनो मी अशी आशा करते की ह्या बोधकथा तुम्हाला आवडले असतील आणि जर या बोधकथा आवडल्या असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते 

धन्यवाद

सुंदर मराठी बोधकथा | Marathi Bodh Katha | Moral Stories For Kids

  • moral stories for kids in marathi
  • short stories for.kids pdf in marathi
  • inspirational short stories for students in marathi
  • सुंदर मराठी बोधकथा
  • Marathi Bodh Katha
  • सुंदर मराठी बोधकथा
  • sundar marathi bodh katha
  • Moral Stories For Kids


Post a Comment

Previous Post Next Post