मी वृक्ष बोलतोय मराठी निबंध | Me vruksh boltoy essay in Marathi | Marathi nibandh
नमस्कार मित्रांनो आज आपण " मी वृक्ष बोलतोय मराठी निबंध | Me vruksh boltoy essay in Marathi" या विषयावर निबंध बघणार आहोत आणि या विषयावर निबंध खूप वेळा विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात. दरवर्षी परीक्षांमध्ये 'मी वृक्ष बोलतोय' हा निबंध येत असतो .त्यामुळे हा निबंध सर्वच इयत्ताकरता उपयुक्त असेल.
या पोस्टमध्ये मी वृक्ष बोलते मराठी निबंध उपलब्ध करून दिला आहे सर्व विद्यार्थ्यांनी हा निबंध एकदा वाचून गेलात की परीक्षेमध्ये तुम्हाला हा लिहिता येईल.अशी मी अपेक्षा करते आणि लेखाला सुरुवात करते.
मी वृक्ष बोलतोय मराठी निबंध | Me vruksh boltoy essay in Marathi
मी एक वृक्ष बोलतोय. मी आज तुमच्यासमोर माझी मनोगत व्यक्त करणार आहेत सध्याच्या आधुनिक जगात तुम्ही मला विसरला आहात मी तुम्हाला आज माझे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
आम्हाला देखील तुमच्यासारखे मन आहे आम्ही सुद्धा जिवंत आहोत आम्हालाही भावना आहेत आम्हालाही वेदना आहेत तुमच्या मुलांना प्रियजनांना थोडेसे खर्च केले की तुमच्या मनाची घालमेल होते पण झाडांच्या फांद्या तोडताना किंवा फुलं तोडताना फळांसाठी झाडाला दगड मारताना कुऱ्हाडीने वृक्षांना कापताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? डोळ्यात अश्रू नाही पण मनात एक साधा विचार ही येत नाही एवढे आपण कृतघ्न कसं वागू शकतो मी तुम्हाला फळ देतो फुल देतो चुलीसाठी लाकडं देतो म्हणजे माझं जीवन संपलं तरी देखील माझा तुम्हाला चुलीमध्ये जाळण्यासाठी वापर होतो. माझा जीव संपला तरी देखील मी तुमच्या उपयोगी येत असतो पण तुम्ही असं कृतघ्न सारखं का वागू शकता आणि असे तुम्ही अमानुष का झालात आणि कस काय झाला?
मी कुणामध्ये भेट करत नाही माझ्यासाठी पक्षी मानव पशु सगळे एकसारखे आहेत मला सगळेच प्रिय आहेत मी जा धर्म रंग असा भेदभाव करत नाही मी सर्वांनाच फळ देतो सर्वांनाच फुल देतो सर्वांनाच लाकड देतो तुम्ही पण असे सगळे भेदभाव विसरून एकत्र या आणि या सुंदर पर्यावरणाला वाचवा नाहीतर उद्या मनुष्यच नसतील तर तुम्ही जात धर्म रंग राज्य देश भाषा यांचे काय कराल वृक्ष सुद्धा तुमच्या सारखे सजीव आहेत त्यांचे संगोपन करा काळजी घ्या आमच्यामुळेच तर तुम्हाला ऑक्सिजन भेटतं.
माझ्या अंग खांद्यावर पशुपक्षी खेळतात किती पक्षी तर आपली घरटी माझ्या फांद्यांवर मांडतात तुम्ही त्यांचे घर तोडून टाकता आणि आपले घर बांधता मग एखादा बिबट्या हत्ती घरात शेतात शिरला तर अडा ओरड करतात त्याला तुम्ही पळून पळून मारून टाकतात पण तुम्ही चुकत आहे तुम्हाला कळत नाही तुम्ही झाड तोडले म्हणून त्यांना जंगल राहिले नाही आणि म्हणून ते मुके जनावर इकडे तिकडे फिरू लागले त्यामुळे तुम्ही झाडे तोडले नाही पाहिजे. झाडांचे संगोपन केलं पाहिजे तुम्ही पशु पक्षांचे घर तोडता जाळता मग त्यांनी तुम्हाला मारले तर चालेल का? याचा देखील तुम्ही आता एकदा विचार करून बघा.
माझ्यामुळे तुम्हाला जीवनावश्यक ऑक्सिजन मिळतो ऑक्सिजन शिवाय मानव पाच मिनिटापेक्षा जास्त जगू शकत नाही मी जर ऑक्सिजन निर्माण केला नाही तर तुम्ही श्वास कसा घ्याल निसर्गाचा ऱ्हास करून बनवलेला घरात कसे राहाल. तुम्ही जंगले तोडतात आणि त्यातून घर बांधतात पण जर मी जर नसेल तर तुम्ही घर कसे बांधणार. आणि जंगले तोडून बांधलेला रस्त्यांवर प्रवास कसा कराल जर झाडे नसतील तर या पृथ्वीवरचे जीवनात नष्ट होईल हे सारे समजायला किती सोपे आहे पण तरीही तुम्ही वृक्षतोड करतात. का असं समजून न समजल्यासारखं करतात.
सहलीला जाताना एखादा मोठ्या वडाच्या झाडाखाली बसून वनभोजन करतात तुम्ही कुणालाही असं उन्हात बसून किंवा रस्त्यावर बसून वनभोजन करायला आवडत नाही. हो पण मग तुम्हाला वृक्षा खाली बसून जेवायला आवडतो तर वृक्ष लावायला का आवडत नाही किंवा वृक्षाची तोड थांबवायला का आवडत नाही. तुम्ही रस्ते बांधण्यासाठी अनेक जंगल तोडतात किंवा अनेक झाडे तोडतात. पण अहो जर तुम्ही असेच झाडे तोडत राहिला तर असे अनुभव तुम्ही कसे घेऊ शकता वृक्षा खाली जेवायचे. लहानपणी आपण सर्व वडाच्या पारंब्यांना लटकणे चोरून आंबे पाडणे अशा खूप सारे खेळ खेळलो आहे किंवा मोठ्या झाडाच्या फांदीला झोका खेळणे या साऱ्या आठवणी आपले बालपण सजवते. अहो पण जर हेच वृक्ष राहिले नाही तर. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी झाडे लावली पाहिजे वृक्षतोड थांबवली पाहिजे नाही तर आपल्या पुढच्या पिढीला आपण जो लहानपणी आनंद घेतला तो कधीच घेता येणार नाही मग तुम्ही तक्रार करता की आमची मुले रात्रंदिवस मोबाईल बघत असतात. अहो पण ते मोबाईल कशामुळे बघतात कारण की तुम्ही बाहेर झाडच ठेवली नाही सावलीमध्ये त्यांना खेळण्यासाठी. आपण आपल्या चुकांचा देखील विचार केला पाहिजे.
झाडाझुडपांमुळे जमिनीची धूप कमी होते .झाडांची मुळे माती धरून ठेवतात. यांनी जमिनीचा पोत टिकून राहतो. यामुळे कमीत कमी कृत्रिम, रासायनिक खतांच्या मदतीने चांगले पीक घेता येते. जर चांगली पिके आली तर गरीब शेतकऱ्याला मोठे कर्ज काढावे लागणार नाही आणि त्याच्या पिकाला भाव देखील भेटेन कारण की पिक चांगले असेल. आणि त्याला पीक केल्याचा फायदा देखील होईल आणि शेतकरी आत्महत्या देखील करणार नाही. आदिवासी गावातील गरीब लोक जंगलातून फळे फुले आणून विकतात त्यांच्यावर त्यांचे पोट भरते. परंतु आपण सर्व झाडे तोडून त्यांच्या पोटावर पाय ठेवत आहे. आणि जंगल हे पशुपक्षी प्राण्यांचे घर आहेत आणि आपण त्यांचे घर असे पेटवून देतो किंवा तोडून टाकतो जर आपले घरचे कोणी तोडून टाकले तर आपल्याला चालेल का याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आपल्याला कोणी विनाकारण त्रास दिला तर आपल्याला राग येतो तसंच आपण पशु पक्षांसोबत देखील करतोय त्यांची चूक नसताना काही कारण नसताना आपण जंगल कमी करतोय झाड तोडतोय.
अजूनही वेळ निघून गेलेले नाहीये तुम्ही खूप झाडे तोडली आहेत तुम्ही खूप पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे पण अजूनही तुमची चूक सुधारण्याची तुम्हाला संधी आहे आणखी एखाद दशक असे चालू राहिले तर काहीच करता येणार नाही आज जसे आपण बाटली मधून पाणी पितो तसेच भविष्यात बाटलीतून श्वास घ्यावा लागेल आपल्या नंतरची पिढी धर्मासाठी न लढता पाणी आणि ऑक्सिजन साठी एकमेकांचा जीव घेईन त्यामुळे कृपया सर्वांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याऐवजी पार्ट्या करण्याऐवजी लोकांना जेवण देण्याऐवजी साधं एक झाड लावलं तरी तुमचा वाढदिवस साजरा होईल असे समजायचं दरवर्षी आपल्या वाढदिवसाला एक तरी झाड लावायचं आणि वृक्षतोड थांबवण्यासाठी खूप सारे मोर्चे करायचे किंवा जनजागृती करायची.
माझे हे मनोगत आहे का आणि प्रत्येकाने एक नाही तर चार झाडे लावा वाढदिवसाच लग्नात इतर भेटवस्तू देण्याऐवजी झाडाचे रोपटे भेट म्हणून द्या. संक्रांतीला वाहन देण्याऐवजी झाडाचे रोप द्या. फक्त आपल्या झाडांना नाही तर दुसऱ्यांच्या झाडांना देखील पाणी घाला. निसर्गाचा आदर करा निसर्ग तुमचे संगोपन करेन निसर्ग खूप बलाढ्य आहे, तो खूप सहनशील आहे पण आपण त्याच्या संयमाचा अंत पाहू नका हीच विनंती सर्वात शेवटी मी एकच मंत्र देईल झाडे लावा झाडे जगवा.
मी वृक्ष बोलतोय मराठी निबंध | Me vruksh boltoy essay in Marathi | Marathi nibandh
मित्रांनो मी वृक्ष बोलतोय हा निबंध तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करते आणि जर माझं काही शब्दांमध्ये चुका झाल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि जर निबंध आवडला असेल तर नक्की कमेंट करा मला तुमच्या कमेंट वाचून पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते आणि मी वृक्ष बोलतोय मराठी निबंध हा निबंध तुम्ही आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल.
धन्यवाद
मी वृक्ष बोलतोय निबंध मराठी | Mi Zad Boltoy Marathi Nibandh
- मी झाड बोलतोय [झाडाची आत्मकथा] मराठी निबंध
- मी वृक्ष बोलतोय मराठी निबंध
- मी वृक्ष बोलतोय आत्मकथन निबंध मराठी
- Mi Zad Boltoy Marathi Nibandh
- मी वृक्ष बोलतोय निबंध मराठी