मोठा माणूस होशील | Mota Manus hoshil | Akbar Birbal Marathi story

 मोठा माणूस होशील | Mota Manus hoshil | Akbar Birbal Story in Marathi 

मोठा माणूस होशील | Mota Manus hoshil | Akbar Birbal Marathi story


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत

अकबर - बिरबल -  मोठा माणूस

 चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला

 मोठा माणूस होशील

जवळच्या गावात असलेल्या नातेवाईकांकडे 8-10 वर्षाचा महेश प्रसाद आपल्या वडिलांसोबत जायला निघाला म्हणून आई त्याला म्हणाली बाळा जेवण करून जा तेव्हा तो आईला म्हणाला आई मला बिलकुल भूक नाहीये. तर जेवणात वेळ फुकट कशाला घालवू नंतर महेश व त्याचे वडील परगावच्या रस्त्याला लागले काही अंतर चालून गेल्यानंतर भुकेने महेशच्या पोटात कावळे ओढायला लागले इतक्यात रस्त्याच्या एका कडेला ब्रह्मदेवाचे मंदिर दिसले म्हणून महेश चे वडील त्याला मंदिरात घेऊन गेले.

मंदिराच्या गाभाऱ्यातील ब्रह्मदेवाच्या चतुरुमुखी म्हणजे चार मुखी असलेल्या मूर्तीला वडील भक्ती भावानेच नमस्कार करू लागले. तेव्हा भुकेने का असावी झालेला महेश रडू लागला हे बघून वडिलांनी त्याला विचारले महेश का रे बाळा असं का बर रडतो आहेस.

आई आपल्याला जेवण करून जा असे सांगत असूनही आपण तिचे ऐकले नाही आणि आता तर वडिलांना सांगितले तर ते आपल्याला रागावतील अशी भीती वाटून हजर जबाबी महेश वडिलांना म्हणाला बाबा मला एकच नाक आहे व सर्दी झाल्यानंतर ते वाहू लागले की पुसून पुसून नाकी नऊ येतात तर मग या चार मुख्य असलेल्या ब्रह्मदेवाला सर्दी झाली आणि याची चारही नाके एकदाच वाहू लागली तर याचे कसे हाल होत असतील त्याच्या त्या वेळी होणाऱ्या फक्त कल्पनेनेच मला रडायला येत आहे.

आपला मुलगा का रडत आहे हे माहीत असल्यामुळे त्याने सांगितलेली सब ऐकताच वडील आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले बाळा तू पुढे फार मोठा माणूस होशील.

तसेच एकदा महेश सोळा वर्षाचा असताना एकटाच रानातील रस्त्याने परगावी चालला होता तितक्यात एका झाडीतून एक वाघ बाहेर आला आणि त्याच्या अंगावर धावला तेव्हा त्याच्याशी महेश ने झुंज देऊन त्याला पळून जाण्यास भाग पाडले तेव्हापासून अंगात विराचे असलेल्या महेशला लोक मोठ्या प्रेमाने विरबल असे म्हणू लागले. आणि पुढे विरबल म्हणता म्हणता त्याचे नाव बिरबल झाले.

मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या वेबसाईटवर खूप प्रकारच्या कथा उपलब्ध आहे .ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करतील किंवा तुम्हाला जर कथा वाचायला आवडत असतील तर खूप साऱ्या कथा उपलब्ध आहेत. आठवी, नववी ,दहावीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या कथा खूप वेळा विचारलेल्या असतात तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचे असते त्यामुळे मी अशी आशा करते की या कथा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र -मैत्रिणी सोबत देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल.

धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी


Post a Comment

Previous Post Next Post