मन शांती | peace of mind Marathi kids story

 मन शांती | peace of mind Marathi kids story

मन शांती | peace of mind Marathi kids story


मित्रांनो आज आपण खाली दिलेल्या पॉईंटवर कथा लेखन बघणार आहोत.

मनशांती - संपत्ती - आपत्ती

चला तर सुरुवात करूया आपल्या कथालेखनाला

                      मन:शांती

एकदा भगवान विष्णू ठरवले की आज जो जे मागेल त्याला ते देऊन टाकायचं सर्वांच्या इच्छा पूर्ण करायच्या सर्व याचक एका ओळींमध्ये उभे राहून आपली पाळी आली की आपल्याला हवे ते मागून घेत होते कोणी धवन कोणी संतान कोणी स्वास्थ्य तर कोणी वैभव मागत होते..

विष्णू दोन्ही हातांनी भरभरून देत होते लक्ष्मीने पाहिले की हळूहळू विष्णूचे भांडार रिकामी होत चालले आहे तेव्हा विष्णूचा हात धरती म्हणाली अशा रीतीने देत राहिला तर वैकुंठाचे सर्व वैभव काही क्षणात नाहीसे होईल मग आपण काय करायचे?

स्मित चेहऱ्याने विष्णूंनी उत्तर दिले, तू अजिबात चिंता करू नकोस माझ्याजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे ती मानव गंधर्व किन्नर यापैकी कोणीच अजून मागितलेली नाही ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत तू दुसरे काहीही द्यावे लागले तरी काळजी करू नकोस.

लक्ष्मीने विचारले, मला सांगा बरं अशी कोणती गोष्ट आहे आपल्याजवळ. माझ्या तर काहीच लक्षात येत नाहीये.

विष्णू म्हणाले, तिचं नाव आहे शांती जर मन शांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरते म्हणून मी शांती सांभाळून ठेवली आहे.

----------------------

मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा पद्धतीच्या कथा खूप वेळा आठवी नववी दहावीच्या कथा लेखनाच्या प्रश्नांमध्ये विचारलेल्या जातात ते पॉईंट्स देतात आणि आपण त्यावरून कथा निर्माण करायची असते. तुम्ही जर पेपरला जाण्याआधी या कथा वाचून गेला तर तुम्हाला नक्कीच कथालेखन जमून जाईल. आणि अशाच पद्धतीचे आणखी कथा तुम्हाला वाचायचे असतील तर आपल्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता मी सर्व प्रकारच्या कथा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना परिवारातील व्यक्तींना शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील अभ्यासामध्ये मदत होईल आणि तुमच्या परिवारातील लोकांना देखील कथा वाचता येतील

 धन्यवाद


Related searches:

मन शांती

मन शांती कथा लेखन

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठीPost a Comment

Previous Post Next Post