Rakshas , chor, Brahman Marathi story | राक्षस,चोर आणि ब्राह्मण मराठी गोष्ट
मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत
ब्राम्हण - चोर - राक्षस - चोरी - गाय
चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला
राक्षस ,चोर आणि ब्राह्मण मराठी गोष्ट
एका गावात एक द्रोन नावाचा ब्राह्मण राहत होता तो अतिशय गरीब होता. पूजा पाठ करून जे काही मिळत असे त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे एके दिवशी एका यजमानाने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या गाई दिल्या.
दानात मिळालेल्या त्या दोन गाई त्याने घरी आणल्या आणि त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचा धन्य पळालं एकेकाळी शिळी पोळी भाजी खाणारा तोच ब्राह्मण गावात दूध दही लोणी तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला.
ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गाईंवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची आणि ब्राह्मणाच्या त्या दोन गाई पळवायच्या असा त्या चोरांचा डाव होता एका अमावस्येच्या अंधारात तो चोर त्या गाईंना चोरून नेण्यासाठी येत असताना वाटतच त्या चोरांची गाठ एका राक्षसासोबत पडले परस्परांनी एकमेकांना तू कुठे आणि का जातोस ते विचारलं.
चोर म्हणाला मी ब्राह्मणाच्या गाई चोरायला चाललो आहे पण तू कुठे चालला आहेस.
अरे मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला त्याचे भक्षण करायला चाललो आहे या ब्राह्मणांना तंत्र मंत्र करून मला दूर घालवायचं माझं अन्न पाणी तोडले पण आज मी त्यालाच खाणार आहे.
झालं दोघांचंही लक्ष एकच निघालं दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला तो चोर आणि राक्षस हे दोघे त्या ब्राह्मणाच्या दारात आले दोघांनीही घरात डोकावून पाहिले तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार तोच चोर म्हणाला अरे थांब मी आधी दोन्ही गाई घेऊन जातो मग तू त्याला खा त्यावर राक्षस म्हणाला वा रे वा मोठा शहाणाच आहेस की तू.
तू गाईंना नेताना त्या हंबरल्या तर तो जागा होणार नाही का मग मी काय करू.
राक्षसाचे हे म्हणणं चोराला पटेना अन चोर आपली घाई सोडून असं करता करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले परस्परांच्या संवाद संपू लागला वादविवाद भांडण चालू झाली.
त्या त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजाच भान राहिलं नाही ते आवाज ऐकून घाई हंबरल्या मोत्याने भुंकायला सुरुवात केली ब्राह्मणही झोपेतून जागा झाला त्याने राक्षस आणि चोराला पकडून केला त्या आवाजाने शेजारी मंडळी काठा घेऊन धावत आले त्यांना पाहून राक्षस आगली आणि चोर लोकांना पाहून धुम पळून गेला.
तात्पर्य: फुकट शब्दांना शब्द वाढून वादविवाद करू नये भांडणाने फायदा तर होणे दूरच पण अनेकदा नुकसानच होते.
मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या वेबसाईटवर खूप प्रकारच्या कथा उपलब्ध आहे .ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करतील किंवा तुम्हाला जर कथा वाचायला आवडत असतील तर खूप साऱ्या कथा उपलब्ध आहेत. आठवी, नववी ,दहावीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या कथा खूप वेळा विचारलेल्या असतात तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचे असते त्यामुळे मी अशी आशा करते की या कथा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र -मैत्रिणी सोबत देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल
धन्यवाद
Related searches:
वक्ता आणि श्रोता कथा
मराठी कथालेखन
बोधकथा
मराठी कथा
सुंदर कथा
गोष्ट लेखन
कथालेखन
कथालेखन मराठी नववी
मराठी कथा
कथालेखन मराठी दहावी
कथालेखन मराठी आठवी
कथालेखन मराठी pdf
शॉर्ट कथा लेखन इन मराठी
Short कथालेखन in Marathi
कथालेखन मराठी