शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध | Shalecha Nirop Ghetana Nibandh Marathi

 शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध | Shalecha Nirop Ghetana Nibandh Marathi

शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध | Shalecha Nirop Ghetana Nibandh Marathi

Shalecha Nirop Ghetana Nibandh Marathi

दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमच्या शाळेने निरोप समारंभ आयोजित केला होता. समारंभासाठी सकाळी बरोबर नऊ वाजता मी शाळेत गेली. शाळा मला आज वेगळीच भासत होती प्रवेश दारापुढे शोभिवंत रांगोळी रेखाटली होती आणि सारे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उभे होते त्यांच्या या स्वागतानेच आम्ही सारे भारावून गेलो सभागृह आज नव्या नवलाईने नटलेला दिसत होता.

आजवर ज्यांनी शाळेत उत्कृष्ट यश मिळवून दिले अशा गुणवंत विद्यार्थ्यांची चित्रे सभोवताली स्टैंड वर लावून ठेवलेली होती. जागोजागी गुलाबाच्या फुलांची आरास केल्यामुळे सारे वातावरण सुगंधित झाले होते ठरल्यावेळी कार्यक्रमाला सुरुवात झाली आमची जिल्हाधिकारी निरोप समारंभाचे प्रमुख पाहुणे होते मुख्याध्यापकांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तेव्हा एक सुखद धक्का बसला कारण जिल्हाधिकारी आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी होते व त्यांचे नाव शाळेच्या सन्माननीय विद्यार्थ्यांच्या यादीत झळकत होते.

निरोप समारंभाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या समारंभात भाषणांचे आदेश बाजी नव्हती आमच्या बॅचने गेल्या दहा वर्षात मिळवलेल्या यशाचा आढावा मुख्याध्यापकांनी मोजका शब्दात घेतला. विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून एक मताने निवड झालेल्या आदर्श विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांना भाषण करण्यास पाचारण करण्यात आले पण नेहमी वकृत्व स्पर्धा गाजवणारे आज भारावली होते त्यांच्या कंठातून शब्द फुटत नव्हते सारेच वातावरण गंभीर झाली होते सगळ्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

या वातावरणातील उदास गंभीरपणा निवडावा म्हणून काही गमतीदार खेळ सुरू करण्यात आले व नंतर जेवणाच्या कार्यक्रमाने समारंभाची सांगता झाली. समारंभ संपला तरी आमचे पाय शाळेतून निघत नव्हते या वास्तुशी आमची शालेय जीवनातील अनेक स्मृती निगडित झालेल्या होत्या त्या स्मृतींना उजाळातील गुरुजनांना आणि मित्रांचा निरोप घेऊन मी शाळेबाहेर पाऊल टाकले मागे वळून पाहिले डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमुळे शाळेचा सारा परिसर अंधुक दिसत होता शालेय जीवनातील ते सुंदर दिन हरपले या विचाराने उर दाटून आला.

 शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध | Shalecha Nirop Ghetana Nibandh Marathi

मित्रांनो हा निबंध जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना हा निबंध नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल

 धन्यवाद

Related searches : 

  • shalecha nirop ghetana nibandh marathi
  • shalecha nirop ghetana nibandh
  • shalecha nirop samarambh marathi nibandh
  • shalecha nirop samarambh
  • शाळेचा निरोप घेताना
  • शाळेचा निरोप घेताना कविता
  • शाळेचा निरोप घेताना मराठी भाषण
  • शाळेचा निरोप घेताना निबंध मराठी
  • शाळेचा निरोप घेताना निबंध
  • शाळेचा निरोप घेताना प्रसंग लेखन

Post a Comment

Previous Post Next Post