सुंदर मराठी बोधकथा : योग्य तात्पर्य सहित | मराठी बोधकथा | बोधकथा मराठी

 सुंदर मराठी बोधकथा : योग्य तात्पर्य सहित | मराठी बोधकथा | बोधकथा मराठी

मित्रांनो आता उन्हाळा सुरू होत आहे आणि सर्वांना सुट्ट्या लागल्या असतील त्यामुळे सर्वजण मोबाईल मध्ये गोष्टी ऐकत असतील तुम्ही देखील गोष्टींच्या शोधात असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल कारण की यामध्ये मी पाच ते सहा गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या देखील तात्पर्यासोबत सांगितले आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेखाला.

१. मराठी बोधकथा : संयमी स्वभाव

एका गावात एक महात्मा राहत होते .ते अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाची म्हणून ओळखले जायचे त्यांना कोणत्याही गोष्टीचा कधीच राग येत नव्हता कुणी त्यांच्याशी कधी उद्धटपणे बोलत नव्हतं किंवा गैरवागत नव्हतं त्यांच्या कपाळावर कधीच अटी उमटत नसेल ते सदैव हसतमुख व आनंदी राहत असत ज्या लोकांना त्यांचे हे वागणे आवडत नसेल ते लोक त्यांना जाणून-बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ते महात्मा तोंडून कधीही एखादा वेडा वाकडा उदगार बाहेर काढत नव्हते चेहऱ्यावरही कधी त्रासिक भाव उमटत नव्हते अनेक लोकांनी जंग जंग पछाडले तरी महात्म्याला राग काही आलेल्या कोणीच पाहिला नव्हता.

शेवटी त्यांच्या या संयमशील त्याचे रहस्य काय असावे हे विचारण्यासाठी काही लोक महात्म्यांकडे गेले त्यांच्यातील एकाने विचारले महाराज तुम्ही कधीच रागवत नाही चिडत नाही शांत कसे काय राहू शकता तुमच्या तितकी सहर्ष शक्ती कोठून आली आहे महात्मांनी उत्तर दिले मित्रांनो ज्यांचे उद्दिष्ट अत्यंत उच्च पातळीवर जायचे असते त्यांना खालच्या पातळीवर जायची कधीच गरज पडत नाही.

मी खालच्या पातळीवर कधीच उतरायला तयार नसतो मला असे वाटते की माझ्याबद्दल लोकांना काय वाटायचे ते वाटू दे पण आपले मन विरोधी विचारांनी कुलुशीत करून घ्यायचे नाही मी जेव्हा जमिनीकडे नजर टाकतो तेव्हा क्षमा शीलतेचे मोठे प्रतीक दिसून येते लोकांनी किती त्रास दिला जमीन क्षमा करते आपल्या गरजा किती मराठीत आहेत हे भान जर प्रत्येकाने ठेवले तर प्रत्येक जण माझे इतका शांत होऊ शकतो त्यांच्या मनात करून आणि सगळ्यांसारखे लेखनाची भावना असे तो निर्विकार वृत्तीनेच राहतो.


२. मराठी बोधकथा :साधू आणि चोर

रामपूर गावापासून थोड्या अंतरावर असलेले एका डोंगरावर एक साधू त्याच्या मठात राहत असते साधूने आपल्या आयुष्यात बरीच संपत्ती गोळा केली होती ही संपत्ती त्यांनी जपून ठेवली होती पण नेहमीच त्यावर लक्ष ठेवणे त्याला शक्य होत नसेल तेव्हा त्यांनी आपली सर्व संपत्ती एका मोठ्या पिशवीत भरली आणि तो ती पिशवी सतत जवळ बाळगू लागला एका चोराने त्या पिशवीकडे लक्ष गेले यात नक्की काहीतरी मौल्यवान असणारे याची त्याला खात्री पटली तो दुसऱ्या दिवशी सकाळी साधूकडे गेला आणि गयावया करत म्हणाला की मला तुमचे शिष्यत्व पत्करायचे आहे साधने त्याला आपल्याजवळ ठेवून घेतले चोराने हळूहळू साधूचा विश्वास संपादन केला एके दिवशी साधूला शेजारच्या गावात निमंत्रण आले.

 तो आपली पिशवी घेऊन निघाला त्याने बरोबर चोर शिष्यालाही घेतले गावाकडे जाताना वाटत नदी लागली जड पिशवी घेऊन नदी पार करणे शक्य नव्हते नदीकाठी एक खड्डा खणला आणि त्यात ती पिशवी ठेवली. आणि चोराला सांगितले मी गावातून जाऊन येईपर्यंत तू या पिशवीची राखण कर चोराला आयटीत संधी मिळाली साधूची पाठ वळतात त्याने ती पिशवी घेऊन धुऊन ठोकली गावातून परतल्यानंतर साधने पाहिले तर त्याची संपत्ती गायब झालेली त्याने सगळ्या प्रकार ओळखला पण आता पश्चातापाशिवाय त्याच्या हाती दुसरे काहीच नव्हते.

मराठी बोधकथा तात्पर्य: अनेक माणसांच्या दुर्भाग्याला त्याची कृतेच जबाबदार असतात.


३. मराठी बोधकथा :गाढवाचे मालक

एका चाऱ्याच्या व्यापाराकडे एक गाढव होते. त्या गाढवाला त्याचा मालक आणि त्याचे काम अजिबात आवडत नसेल तो परमेश्वराला नेहमी प्रार्थना करत असेल माझा मालक बदल वास्तविक गाढवाचा मालक स्वभावाने चांगला होता गाढवाची योग्य ती काळजी घेत असे पण गाढवाला वाटत असे की हा मालक माझ्याकडून नुसते कामच करून घेतो माझी काळजी काही घेत नाही शेवटी एकदा परमेश्वर गाढवाला प्रसन्न झाला पण त्याने सांगितले की दुसरा मालक कदाचित याच्यापेक्षा वाईट असेल पण गाढवाला दुसरा मालक हवाच होता हा दुसरा मालक फरशा तयार करत असेल.

 तो गाढवाच्या पाठीवर जड फरशा ठेवून त्याची नियान करू लागला गाढव पस्तावले त्याने पुन्हा परमेश्वराचे प्रार्थना केले आणि मालक बदलून देण्याची विनंती केली आता बदललेल्या मालकाचा व्यवसाय होता कातडी कमावण्याचा ते पाहून गाढव आपल्याला नशिबाला बोललं माझ्या आधीचे दोन मालक माझ्याकडून फक्त कामच करून घेत असे पण हा तर मी मेल्यावरही माझे कातडे काढून घेऊन त्यातून पैसे कमवेल.

मराठी बोधकथा तात्पर्य एका ठिकाणी समाधानात न राहणाऱ्याला कुठेही समाधानात राहता येत नाही.


४. मराठी बोधकथा : चार बैल आणि सिंह

रामपूर गावाचे वेशीबाहेर एक कुरण होते तिथे चार बैल रोज चारा खायला यायचे हे चारही बैल अतिशय धष्टपुष्ट आणि उंच होते त्यांची शिंगे टोकदार होती आणि ते हंबरले की सारे रान दणाणून जात असे कुरणा शेजारीच एक जंगल होते जंगलातील एक सिंह या बैलांना रोज पाहत असेल त्यांना पाहून त्याच्या तोंडाला पाणी यायचं त्यांच्यावर हल्ला करायला.

 तो रोज कुरणापर्यंत यायचा पण त्याला पाहिले की चारही बैल एकत्र येत आणि त्याला पळवून लावत सिंह ने ओळखले जोपर्यंत या चारही बैलांत फूट पडत नाही तोपर्यंत आपला कार्यभाग साध्य होणार नाही त्याने एका कोल्ह्याला त्यांच्यात भांडणे लावायला पाठवून दिले कोल्हा आणि आपले काम चौक पार पाडले ते चार बैल आता एकमेकांपासून दूर राहू लागले सिंहाला संधी मिळाले त्याने एक एक करून चारही बैलांना ठार मारले.

मराठी बोधकथा तात्पर्य : ऐक्य असेल तेव्हा आपण मजबूत असतो अन्यथा दुबळे


५. मराठी बोधकथा: गरुड आणि कोल्हा

एका जंगलात एक गरुड आणि एक कोल्हा राहत होता या दोघांची कशी कोण जाणे मैत्री झाली दोघांनी एकत्र राहायचे ठरवले गरुडाने एक झाड बघितल्याने त्यावर घरटे बांधले आणि त्यात आपल्या कुटुंबाला आणून ठेवले झाडाच्या बुंध्याखाली ढोलता आपला संसार थाटला. पण गरुड होता धूर्त .लवकरच कोल्ह्याच्या बायकोने काही पिल्लांना जन्म दिला होता गरुडाने कोल्हा बाहेर गेल्यावर त्यातील एक पिल्लू पळवले आणि त्याला ठार मारून आपल्या पिल्लांना खायला घातले कोल्हा परत आल्यावर त्याला प्रकार समजला त्याला खूप वाईट वाटले आणि रागही आला. पण तो काही करू शकला नाही.

काही दिवसांनी गरुड उडत एका गावात गेले तेथे गावकरी उत्साहात मारलेल्या बोकडाचे मांस भाजत होते गरुडाने त्यातला एक मास पळवला आणि तो घेऊन घरट्याकडे आला पण या तुकड्याला निखारा लागला होता .त्याची ठिणगी पडून त्याचे घरटे आणि पिल्ले जळून गेले आणि खाली पडली गरुडाच्या डोळ्यात देखत कोल्ह्याने ती आपल्या पिल्लांना खायला घातली.

मराठी बोधकथा तात्पर्य : इतरांशी आपण जसे वागतो तसेच फळ आपल्याला पदरात पडते.


मित्रांनो मी अशी आशा करते की ह्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील आणि जर ह्या गोष्टी आवडल्या असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते.

सुंदर मराठी बोधकथा : योग्य तात्पर्य सहित | मराठी बोधकथा | बोधकथा मराठी

  • मराठी बोधकथा तात्पर्य छोटी
  • छोटी बोधकथा व तात्पर्य pdf
  • सकारात्मक बोधकथा
  • विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कथा
  • नवीन बोधकथा
  • सत्य बोधकथा

Post a Comment

Previous Post Next Post