The wedding of the well | Akbar Birbal stories in Marathi | विहिरीचे लग्न

The wedding of the well | Akbar Birbal stories in Marathi | विहिरीचे लग्न

The wedding of the well | Akbar Birbal stories in Marathi | विहिरीचे लग्न


मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत

विहिरीचे लग्न - बिरबल - युक्ती - गावकरी

 चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला 

विहिरीचे लग्न

एकदा बादशहा आणि बिरबल मध्ये खूप कडाक्याचे भांडण होते रागाच्या भरात बादशहा बिरबलाला म्हणाला तू राजधानी सोडून चालता हो. तुझी मला मुळीच गरज नाही.

बिरबल अतिशय स्वाभिमानी होता तो ताबडतोब राजधनी सोडून निघून गेला. एका गावात वेश बदलून राहू लागला बरेच दिवस उलटून गेले तरी बिरबल राजधानी मध्ये परतला नाही बादशहाला मात्र सारखी त्याची उणीव भासत असेल त्याची कामे अडून राहू लागली आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे बादशहाला त्याच्याशिवाय करमत नव्हते.

अन्न गोड लागत नव्हते बादशहाने अनेक प्रकारे बिरबलाचा शोध घेतला परंतु बिरबल सापडत नव्हता. बिरबलाला कसे शोधून काढावे यावर बादशहाने खूप विचार केला बादशहा आणि बिरबलाच्या सहवासात बरेच दिवस घालवले होते त्यामुळे बादशहाला ही त्याला शोधून काढायची युक्ती सुचली त्यांनी प्रत्येक गावात दवंडी पेटवली राजवाड्यातील विहिरीचे लग्न करायचे आहे.

लग्न समारंभ थाटात होणार आहे तरी प्रत्येक गावाच्या लोकांनी आपापल्या विहिरीसह उपस्थित रहावे जे उपस्थित राहणार नाही त्यांना जबरदस्त दंड केला जाईल सर्व लोक चिंतेत पडले कोणालाच काही सुचेना.

बिरबलच्या गावात राहत होता त्या गावातले लोकही चिंतेत पडले होते गावच्या पुढार्‍यांनी या समस्येला कसे तोंड द्यावे समजत नव्हते ठिकठिकाणी चर्चा सुरू झाल्या लोकांची मते घेतली जाऊ लागली अशाच एका सभेला शेतकऱ्याचा वेस्ट घेतलेला बिरबल हजर होता त्याने गावकऱ्यांना जाण्याची युक्ती सांगितली.

गावकरी खुश झाले एक दिवस गावातील पाच सहा प्रमुख पुढारी उंची वस्त्रे घालून गेले. दरबारात हात जोडून म्हणाले आपल्या आज्ञेप्रमाणे आम्ही निमंत्रण स्वीकारून आपल्या राजवाड्यातील विहिरीच्या लग्नाला आमच्या गावच्या झाडून सर्व विहिरींना घेऊन आम्ही हजर झालो आहोत.

आमच्या गावच्या विहिरीविषयी बाहेर थांबले आहेत तेव्हा आपल्या रितीरिवाजाप्रमाणे राजधानीतील काही प्रमुख विहिरींना त्यांचे स्वागत करण्यासाठी वेशी पर्यंत पाठवावे त्याचे बोलणे ऐकून बादशहा जोरात हसला आणि ओरडला बिरबल सापडला.

बादशहा मनाला अजून पर्यंत एकही गावचे लोक राजधानीत आले नाही तुम्हीच प्रथम हजर झाला तुम्हाला ही युक्ती कोणी सांगितली?

गावकऱ्यांनी नम्रपणे उत्तर दिले, महाराज एका शेतकऱ्याने.

बादशहा त्यांना म्हणाला तो शेतकरीच माझा बिरबल आहे बादशहाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले ताबडतोब त्याने त्या माणसांबरोबर लोकांना बिरबलाला आणण्यासाठी पाठवले बिरबलाला राजधानी सन्मानाने आणण्याचा हुकूम दिला बिरबल बादशहाच्या महालात आला आणि त्याने बिरबलाला मिठी मारली.


मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या वेबसाईटवर खूप प्रकारच्या कथा उपलब्ध आहे .ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करतील किंवा तुम्हाला जर कथा वाचायला आवडत असतील तर खूप साऱ्या कथा उपलब्ध आहेत. आठवी, नववी ,दहावीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या कथा खूप वेळा विचारलेल्या असतात तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचे असते त्यामुळे मी अशी आशा करते की या कथा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र -मैत्रिणी सोबत देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल


धन्यवाद


Related searches:

वक्ताआणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठ

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी





Post a Comment

Previous Post Next Post