सुंदर मराठी बोधकथा : योग्य तात्पर्य सहित | मराठी बोधकथा | बोधकथा मराठी
मित्रांनो आता उन्हाळा सुरू होत आहे आणि सर्वांना सुट्ट्या लागल्या असतील त्यामुळे सर्वजण मोबाईल मध्ये गोष्टी ऐकत असतील तुम्ही देखील गोष्टींच्या शोधात असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल कारण की यामध्ये मी पाच ते सहा गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या देखील तात्पर्यासोबत सांगितले आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेखाला.
वाईट सवयींचा त्याग मराठी बोधकथा
एक व्यापारी होता तो जितका व्यवहारी विनम्र आणि मन मिळत होता तितकाच त्याचा मुलगा उद्धट आणि गर्विष्ठ होता त्याला सुधारण्याचे अनेक प्रयत्न फसले गेले एकदा ही गोष्ट त्याने एका मित्राला सांगितले मित्र म्हणाला त्याला माझ्याकडे काही दिवस राहण्यासाठी पाठवून दे मी तुझ्या मुलाला ठिकाणावर आणून दाखवेन.
त्या व्यापाराचा मुलगा मित्राच्या घरी राहण्यास गेला त्याच्या वडिलांच्या मित्रांनी त्याला अतिशय चांगली वागणूक दिली एकदा ते त्याला बागेत फिरवायला घेऊन गेले असता एक फुट उंचीचे रोप त्याला उपटण्यास सांगितले मुलाने ते रोप सहजपणे उकडले त्यानंतर त्याने मुलाला सहा फुट उंचीचे रोप उपटण्यास सांगितले मुलाला ते उपटण्यास खूप ताकद लावावे लागले शेवटी ते एका उंच वृक्षा जवळ आले आणि म्हणाले तो वृक्ष उपटून टाक.
मुलाने ते शक्य नसल्याचे सांगितले त्यावेळी मित्रांनी मुलाला उपदेश केला तो म्हणजे असा की आपण एखाद्या वाईट कामाला सुरुवात करत असतो तेव्हा त्यापासून दूर जाणे शक्य असते पण मात्र त्या कामात जर आपण खोलवर गुंतून गेलो की आपल्याला त्यापासून सुटका करणे अशक्य असते वाईट सवयी वाईट वर्तनाचे सुद्धा असेच आहे जोपर्यंत सहज शक्य आहे तोपर्यंत वाईट वर्तन किंवा सवय सोडलेली चांगली असते मुलाला त्याच्या मित्र काकांचा उद्देश सहजपणे लक्षात आला व त्याने त्याचे वागणे बदलले चांगला वागायला लागला.
मराठी बोधकथा तात्पर्य: वाईट सवयी बाळगण्यापूर्वीच त्याची निर्मूलन केले पाहिजे.
मित्रांनो मी अशी आशा करते की ह्या बोधकथा तुम्हाला आवडले असतील आणि जर या बोधकथा आवडल्या असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते
धन्यवाद