मी झाड बोलतोय झाडाची आत्मकथा मराठी निबंध | Zadachi Atmakatha In Marathi

 मी झाड बोलतोय झाडाची आत्मकथा मराठी निबंध

मी झाड बोलतोय झाडाची आत्मकथा मराठी निबंध | Zadachi Atmakatha In Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात मी तुम्हाला झाडाची आत्मकथन मी वृक्ष बोलते आत्मकथन निबंध मराठी देणार आहे या लेखनात एक झाड त्याची व्यथा व त्याच्या जीवनातील आनंद दुःख आपल्यासमोर मांडणार आहे.

विद्यार्थ्यांनो झाड हे निसर्गाने मनुष्याला दिलेले अत्यंत अनमोल गोष्ट आहे परंतु वाढत्या आधुनिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा हे महत्त्व आपल्याला समजायला हवं.

मी झाड बोलतोय झाडाची आत्मकथा मराठी निबंध | Zadachi Atmakatha In Marathi


मी झाड बोलतोय मी आकाराने खूप मोठा आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी देखील आहे माझे नेहमी आनंदी राहण्यामागील कारण आहे की मी लोकांना खूप लाभ पोहोचवतो मी मनुष्याला सावली देतो मी मनुष्याला ऑक्सिजन देतो आणि स्वतः कार्बन-डाय-ऑक्साइड ग्रहण करतो पण तरीही कधी कधी लोक माझ्याशी छेडछाड करतात मी शांतपणे रस्त्याच्या एका बाजूला उभा असतो येणारे जाणारे लोक नेहमी माझ्या सावलीत विसावा घेत असतात मी त्यांना विसावा देतो तरी देखील लोक माझ्या फांद्या तोडतात.

उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा घामाने शरीर थकते तेव्हा लोक माझ्या सावलीत येऊन बसतात. माझ्या सावलीत बसून मनुष्याला आनंद भेटतो त्यासाठी ते मला धन्यवाद देखील करतात लोकांचा धन्यवाद ऐकून मला खूप बरे वाटते पण दुसरीकडे असाही विचार करत असतो की काही लोक विनाकारण माझ्या फांद्या आणि पाणी तोडत असतात काही लोक आपल्या लहानशा स्वार्थासाठी मला नष्ट करून टाकतात मी आज खूप मोठा होऊन गेलो आहे ज्यामुळे कोणताही मनुष्य किंवा प्राणी मला सहज नुकसान पोहोचवू शकत नाही .

पण रस्त्याच्या कामाच्या वेळेस लोक मला तोडून फेकून देतात.बरेच लोक रस्त्याच्या कडेने मला पाहून माझी प्रशंसा करतात ते म्हणतात की किती मस्त झाड आहे काही लोक माझे फळ खाऊन त्यांची प्रसंचा करतात काही प्राणी माझे खाली लोंबकळलेले फांद्यांची पाने खातात. 

ते देखील माझ्यासाठी चांगलीच प्रार्थना करतात मी वातावरणाला दूषित होण्यापासून वाचवतो माझ्या मुलांमधील मातीला घट्ट करून ठेवतो माझे वय खूप जास्त आहे मी हजारो वर्षांपर्यंत असा उभार जागी राहू शकतो परंतु मला या गोष्टीची बऱ्याचदा भीतीही वाटते . 

मला वाटते की रस्त्याच्या कामामुळे जर एखादा मनुष्य आला आणि मला कापून टाकले तर हा विचार करूनच माझ्या अंगावर शहर येतात मला नेहमी या गोष्टीची चिंता सतावत असते कारण माझं अस्तित्व हे रस्त्याच्या कडेला आहे आणि रस्त्यांच्या कामामुळे अनेक झाडे तोडले जातात. अनेक मनुष्य स्वतःच्या स्वार्थासाठी आम्हाला कापून टाकतात ते या गोष्टीचा कधीही विचार करत नाही की मी त्यांच्यासाठी किती उपयुक्त आहे मला नुकसान पोहोचवणे म्हणजे निसर्गाला नुकसान पोहोचवणे आहे.

माझ्या मदतीने अनेक लोक त्यांची उपजीविका भागवतात काही लोकांचे व्यवसाय ही माझ्यामुळे सुरू आहेत लोक माझ्या फळांना तोडून बाजारात विक्रीसाठी नेतात आणि त्यांना विकून आपला व्यवसाय चालवतात माझ्या शरीराचा प्रत्येक भाग काही ना काही कामात देतो पक्षी माझ्या दाट फांद्यांमध्ये आपली घरटी करतात हे पक्षी देखील माझे पाणी तोडतात पण मी कोणालाच काही बोलत नाही मी मेलो तरी माझ्या लाकडांपासून घरी बांधले जातात प्रत्येक जीव जंतू माझा उपयोग करून घेतो पण तरीही मी प्रतिक्रिया न करता सर्व काही सहन करीत राहतो आणि जोपर्यंत या पृथ्वीवर माझे अस्तित्व आहे तोपर्यंत मी मनुष्य आणि इतर प्राण्यांची अशीच पद्धतीने सेवा करत राहील.

आणि मी मेल्यावर देखील लोक माझी लाकडी विक्रीसाठी नेत राहतील तरी मी माझे सेवा कार्य अखंड सुरू ठेवीन.

धन्यवाद


Related searches

  • झाडाची आत्मकथा निबंध
  • नदीची आत्मकथा मराठी निबंध
  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी
  • आत्मकथन निबंध मराठी 10वी
  • पुस्तकाची आत्मकथा
  • नदीची आत्मकथा निबंध
  • मी वृक्ष बोलतोय निबंध
  • आत्मकथा निबंध हिंदी

Post a Comment

Previous Post Next Post